महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक मडकेबुवा.

महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक मडकेबुवा.

मडकेबुवा (बाबासाहेबांचे अंगरक्षक) यांचे संपूर्ण नाव गणपत महादेव जाधव परंतु ‘मडकेबुवा’ म्हणून प्रसिद्ध होते.

‘मडकेबुवा’ नाव पडण्याचे कारण म्हणजे ते आधी माळकरी बुवा होते व भगवी वस्त्रे वापरीत. ते उत्कृष्ट मेकॅनिक होते त्यामुळे एका गोऱ्या साहेबाने त्यांना १९२८ साली आफ्रिकेला नेले व बॉयलर मेकर म्हणून ४०० रु. दरमहा नोकरीवर लावले. पण गोऱ्या लोकांबरोबर न पटल्याने १९२९ मध्ये ते भारतात परत आले व मडकी विकण्याचा धंदा सुरु केला म्हणून ‘मडकेबुवा’ म्हणून प्रचलित झाले. अशिक्षित परंतु प्रचंड संघटन कौशल्य आणि आपले नेते डॉ. आंबेडकर व त्यांनी चालविलेल्या चळवळीवर पराकोटीची प्रखर निष्ठा असलेला निधड्या छातीचा धडाडीचा, करारी नेता होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ऑफिस असलेल्या दामोदर हॉलला लागून असलेल्या चाळीतील पहिल्या मजल्यावर मडकेबुवांचे बिऱ्हाड होते. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी मडकेबुवांचा #स्नेह जुळला. सुरुवातीच्या काळात म्हणजे १९३४ साली राजगृहात राहायला जाण्यापूर्वी याच दामोदर हॉलच्या ऑफिसात बसून बाबासाहेब आपल्या समता प्रस्थापनेच्या व दलित मुक्तीच्या चळवळीच्या रोजच्या रोज बैठकीतून व चर्चेतून मोर्चेबांधणी करीत, त्यात अर्थातच मडकेबुवाही #उत्साहाने भाग घेत असत. मडकेबुवा जरी अशिक्षित होते तरी त्यांची #विचारसरणी #अत्यंत_प्रगल्भ व #पुरोगामी होती. ते मराठीत सही करायला शिकले होते पण तीदेखील गिरवून करीत असत. त्यांची रहाणी अत्यंत साधी पण टापटीप असे. डोक्यावर मखमलीची नक्षीदार काळी टोपी, तलम धोतर व पायात मोजे व बूट असा थाटाचा पेहराव ते करीत.


मडकेबुवांची आंबेडकरी चळवळीवरील #निष्ठा, #त्याग नि धडाडी प्रत्येक कसोटीवर तावून सलाखून निघालेली होती. पुणे करारापूर्वी गांधीजींच्या आमरण उपोषणाने साऱ्या देशाचे लक्ष बाबासाहेबांवर केंद्रित झाले होते. बाबासाहेब आपल्या कोट्यावधी बांधवांच्या हक्कांवर पाणी सोडायला नव्हते.

गांधीजींची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. बाबासाहेबांना धमक्यांची पत्रे, तर येत होत्या; पण बाबासाहेब न डगमगता आपल्या नित्य कार्यात मग्न होते. त्यांच्या जीविताला फार मोठा धोका होता. अशा बिकट प्रसंगी मडकेबुवा बाबासाहेबांना न कळत त्यांच्या पाठीशी #सावलीसारखे वावरत असत. प्रत्येक बिकट प्रसंगी बाबासाहेबांच्या जीविताचे रक्षण करण्याचे कार्य मडकेबुवांनी आपल्या जीवाची बाजी लावून लावून केले. त्यामुळेच ‘बाबासाहेबांचे बॉडीगार्ड’ म्हणून ते प्रसिद्ध होते. मुंबईत बाबासाहेबांची सभा वा कोणताही कार्यक्रम असला म्हणजे मडकेबुवा अध्यक्ष किंवा स्वागताध्यक्ष असणार हे ठरलेलेच असायचे ! १९३४ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापलेल्या मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे ते स्वतः अध्यक्ष तर मडकेबुवा सहचिटणीस होते. बाबासाहेबांशी असलेली मडकेबुवांची जवळीक अनेकांच्या डोळ्यात खुपत असे. परंतु मडकेबुवांनी बाबासाहेबांच्या मनात जे #अढळ_स्थान निर्माण केले होते ते आपल्या त्यागाने व निःस्वार्थ कार्याने निर्माण केले होते. त्यांच्याबद्दल म्युनिसिपल अधिकारी, कार्यकर्ते व नेते यांना आदरयुक्त दरारा वाटत असे. बाबासाहेबांवरील निष्ठेने व अंगीकृत निःस्वार्थ कार्याने त्यांचा तसा दरारा इतरांना वाटत असे.

  • Tweet it
  • Pin it
  • Email
  • Team - www.ambedkaree.com

    We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

    Next Post

    शिवाजी नाट्य मंदिरात वंचित बहुजन आघाडीचा युवा मेळावा सपन्न.

    बुध सप्टेंबर 11 , 2019
    Tweet it Pin it Email दादर: आज दादर शिवाजी नाट्य मंदिरात वंचित बहुजन आघाडीचा युवा मेळावा मोठ्या संख्येने सपन्न झाला . Pin it Email https://www.ambedkaree.com/madke-buva-great-body-gard-of-dr-babasahebambedkar/#SU1HXzIwMTkwOTE युवा नेतृत्व सुजातभाई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी मंदिर, मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी भारिप बहुजन महासंघाचे […]

    YOU MAY LIKE ..