भारताच्या भूमीत बुद्ध आणि बुद्धच दडला आहे …..हे सिद्ध करण्याची संधी बौद्धांनी गमावली.

अतिशय दीर्घ लिहिलंय शांततेत वाचावं आणि योग्य ती प्रतिक्रिया द्यावीच ही विनंती.
___________ महेंद्र अशोक पंडागळे

आजच्या अयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद या केसचा निकाल आलाय. #रामलल्ला_विराजमान #निर्मोही_आखाडा आणि #सुन्नी_वक्फबोर्ड या तीनही याचिकाकर्त्याना १/३ जागा जागा ३०/०९/२०१० ला #ईलाहाबाद_उच्चन्यायालयाने देऊ केली असतांना,
ही याचिका पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात गेली.

पुढे अस झालं की देवाची बाजू कोणी मांडायची आणि का मांडायची हा मुद्दा पुढे आला तेंव्हा देवाचे फोटो हे 18 वर्षापेक्षा लहान दिसतात त्यामुळे त्यांची बाजू कोणीतरी मोठ्या व्यक्तीने त्यांच्या बाजूने मांडली पाहिजे अश्या आशयाला घेऊन पुढील बाजू ही रामलल्ला विराजमान च्या वतीने देवकीनंदन अग्रवाल यांनी मांडली.


तर दुसऱ्या बाजूला सुन्नी वक्फबोर्ड यांनी तिथे बाबरी मशीद आहे जे गोल घुमट तिथे स्पष्टपणे दिसत आहेत आणि त्या जागेवर आम्ही शेकडी वर्षांपासून नमाज अदा करत आहोत हे तथ्य समोर ठेवून आपली बाजू मांडत होते.

तिसरे म्हणजे निर्मोही आखाडा वैष्णव संप्रदायाचे महंत भास्कर दास यांनी 1956 मध्ये जागेच्या स्वामीत्वाची मागणी केली होती त्या आधी 1885 मध्ये महंत सुधीर रघुवीर दास यांनी रामाच्या चबूतऱ्यावर छत्री बसवण्यासाठी फैजाबाद जिल्हा सत्र न्यायालयात याचिका करून त्यात Officially पार्टी होण्यासाठी प्रयत्न केला होता त्याचाच परिपाक म्हणजे
या तीनही याचिकाकर्त्याना १/३ जागा जागा ३०/०९/२०१० ला #ईलाहाबाद_उच्चन्यायालयाने देऊ केली.

शेवटी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात आली आणि देवांच्या प्रतिमेच्या वयानुसार आणि भारतीय संविधानाच्या कलम 142 नुसार सर्वोच्च न्यायालयाला कोणताही निकाल देण्याचा जरी तो (तथ्यहीनअसेल) असा अधिकार असल्यामुळे आज या केसमध्ये त्यांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून हा निकाल दिला.

या सगळ्यात गंमतीची बाब म्हणजे #PlaceOfWorshipAct 1991 नुसार 15 ऑगस्ट 1947 च्या आधीची जी पण कोणती धार्मिक स्थळे आहेत त्यात कोणालाही कोणत्याही धार्मिक स्थळाची धार्मिकता बदलता येत नाही. तरीही हा नियम बाजुला ठेवून आज हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

खाली दिलेल्या विडिओ मध्ये अनेक बाबी अश्या आहेत ज्या आपल्याला गमतीदार आणि वेगळ्या वाटू शकतील ज्यात देवाची वय (Minor) असल्यामुळे त्यांच पालकत्व स्वीकारणं वगैरे वगैरे….
अशीच एक बाब यात आहे जी म्हणजे भगवान राम हे विवाहित असल्यामुळे त्यांच्या मंदिरात सर्वांना प्रवेश आहे परंतु केरळ मधल्या #शबरीमला या मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने संगितले असताना देखील तिथे आजवर महिलांना प्रवेश नाही कारण शबरीमला मधला देव हा नुसताच केवळ पुरुष नसून नास्तिक ब्रह्मचारी आहे आणि म्हणूनच तिथे महिलांना प्रवेश नाही.


असो आज निकाल लागला कोणाला आनंद झाला कोणाला दुःख झालं असेल परंतु या सगळ्या गडबडीत काही गोष्टी ज्या आज उलगडल्या नसल्या तरी उद्या आणि ईथुनपुढच्या काळात त्या प्रकर्षाने समोर येतीलच त्यातल्या काही गोष्टी इथे मांडतोय,

१. बाबरी मशीद तिथे असताना देखील त्याना त्या पवित्र ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने त्याच जागेवर सामावून घ्यायला हवं होतं.
Ref: खासदार असोउद्दीन ओवेसी यांच्या नुसार उत्तर प्रदेश मधले मुस्लिम इतके भिकारी नाहीत की जे 5 एकर जमीन उतरप्रदेशात घेऊ शकत नाहीत. तर मुद्दा हा त्याच जागेत सामावून घेण्याचा होता.

२. ज्या प्रमाणे निर्मोही आखड्याला ट्रस्ट मध्ये भागीदारी (सदस्यत्व) देण्याचं मान्य केलं त्या न्यायाने आणि 30/09/2010 च्या इलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार तिन्ही याचिकाकर्त्याना एकाच जागेवर म्हणजे 2.77 एकरात समाविष्ट करता आलं असत तर खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम भाई भाई भिंतीला भिंत लावून गुण्या गोविंदाने नांदले असते तेंव्हा खऱ्या अर्थाने सगळेच बोलले असते की देश जिंकला.

३. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे #अयोध्या_राम_जन्मभूमी म्हणजेच प्रभू श्रीराम यांचा जन्म इथेच झाला होता हा दावा करणारे दोन्ही याचिकाकर्ते आणि सर्वोच्च न्यायालयात रामाचा जन्म इथेच झाला होता हे सिद्ध करू शकले नाहीत त्यामुळे ह्या केसचा जो बेसिक ढाचा आहे की रामाचे असंख्य मंदिर देशात नव्हे जगात आहेत पण हीच जागा राम जन्मभूमी असल्यामुळे त्याच पावित्र्य आणि अनन्यसाधारण महत्व असल्याने ती जागा आमच्या अर्थात हिंदू (ब्राह्मणांच्या) ताब्यात द्यावी ही 491 वर्षांपासूनची मागणी 206 वर्ष उलटून गेल्यानंतरही मान्य झाली असली तरी सिद्ध झाली नाही. आणि म्हणूनच भारतीय संविधानाच्या 142 व्या कलमाचा आधार घेऊन आजचा निकाल जाहीर केला आहे.

४. क्रमांक 3चा आधार घेऊनच ज्या अर्थी 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडली गेली तेंव्हा तिचे साधे गोलघुमट ती मशीद असल्याचा ठोस पुरावा तरी देत आहे आणि म्हणूनच सुन्नी वक्फ बोर्ड येणाऱ्या काळात या मुद्द्याला घेऊन आणि मुस्लिम धर्मातील अनेक तांत्रिक बाबींना घेऊन सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी साठी जाऊ शकते अर्थात ती जाईल की नाही ते सांगता येत नसले तरी Verdict ज्या पद्धतीने आलाय आणि सुन्नी बोर्डाने सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेनुसार तसा अंदाज घेता येईल.

शेवटचं,
2.77 एकराच्या या जागेसाठी 491 वर्षांपासून सुरू झालेला हा केवळ 2 धर्मांचा संघर्ष आज 206 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने 1045 पानांच्या निकालपत्रात सरन्यायाधीश आणि अन्य 4 अश्या 5 जणांच्या खंडपीठाने निकाली काढला असून आज जवळपास पुलाखालून बरंच पाणी गेलं असल्याने आणि बाबरी मशीद पाडल्या नंतर झालेला रक्तपात आणि देशाची एकंदर परिस्थिती आज 2019 मध्ये 1992 सारखी नसून Post LPG Era मध्ये धर्मासारख्या अफूच्या गोळ्या असलेल्या गोष्टी आता Outdated झालेल्या आहेत इतकं नक्की.

आज रोजगार, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा हा आध्यक्रम झाला असून Rss आणि भाजपच्या धर्मांध उचकावू शक्तींच्या नादाला काय तर त्यांचे तोंड आणि भाषण ऐकायला सुद्धा देशातल्या मुसलमानांना तर नाहीच पण हिंदूंना सुद्धा वेळ नाहीये.

आज Rss आणि भाजपने उभे केलेले Paid बाजारू मीडियाचे कुत्रे कितीही जोरजोरात दिवसभर भुंकत असले तरी भारताच्या #सार्वभौम असलेल्या Secular जनतेला त्याचा केळं ही फरक पडला नसून मनुवादी विषमतावादी फॅसिस्ट सडक्या शक्तींना आज देशाच्या सुजाण नागरिकांनी आज अक्षरशः थोबाड फुटूस्तोवर तोंडावर पाडलं त्याबद्दल भारतीय जनतेच करावं तितकं कौतुक कमीच आहे.

ज्या अर्थाने महाराष्ट्रात भाजपला एकटं पाडून आज विरोधक एकजुटीने उभे आहेत येणाऱ्या काळात देखील हीच आणि अशीच एकजूट #भाजपला आणि त्यांची Mother Organisation असलेल्या #Rss ला कायमची घरी बसवल्या शिवाय राहणार नाही या बद्दल आज कमालीचा आत्मविश्वास वाटतोय.

टीप :
शेवटचा एक संदेश केवळ #बौद्धांना देण्यासाठी आहे तो म्हणजे,
या देशाचा आजवरचा सगळा संघर्ष हा #बौद्ध_विरुद्ध_ब्राह्मणवाद असाच राहिला आहे आणि कायम तो असाच राहील मुद्दा फक्त इतकाच आहे की आजच्या अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आपण आपला हक्क सांगण्याची आणि 2500 वर्षांपासून जगात, शास्त्रात, अभ्यासात, इतिहासात, दिसण्यात, असण्यात आणि #जमिनीतही केवळ बुद्धच दडला आहे हे जगाला दाखवून देण्याची संधी आपण ना निकालाच्या प्रक्रियेत सहभागी न झाल्याच्या निमित्ताने गमावून बसलो हे किमान मान्य करा आणि इथुन पुढे कामाला लागा इतकंच…….

आपलाच,
महेंद्र अशोक पंडागळे
07678044677.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

मुंबई केंद्रशासित प्रदेश, विदर्भ वेगळे राज्य आणि उर्वरित महाराष्ट्राचे एक राज्य असे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.

शुक्र नोव्हेंबर 22 , 2019
Tweet it Pin it Email वंचित बहुजन आघाडीचे नेते आद प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसांपासून सतत सतेचा जो संघर्ष सुरू आहे यावर लागणार वेळ हे एक प्रकारचे जनतेची फसवणूक असून केंद्र सरकारचा डाव आहे असे ही म्हणाले यावर सविस्तर लिहिले आहे . Pin it Email https://www.ambedkaree.com/budha-and-budha/#SU1HXzIwMTkxMTI मुंबई केंद्रशासित प्रदेश, […]

YOU MAY LIKE ..