हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का ? हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे.-डॉ.बाबासाहेब आंबेडकर

सर्वाना समान संधी आणि समान अधिकार मिळावेत. माणसाच्या मूलभूत अधिकार मिळविण्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडिल काशी अर्थात नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करण्यात आला.भारतीय इतिहासात या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे!!.

२ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांना प्रसिद्ध काळा राम मंदिरात प्रवेश नव्हता.अस्पृश्य हे हिंदु असून ही त्यांना हिंदूंच्या मंदिर प्रवेश नव्हता. अस्पृश्य हिंदू असूनही त्यांना हिंदूंसारखी वागणूक हिंदू धर्मीय लोIक देत नव्हते.अस्पृश्य समाजाला जनावरांपेक्षा ही हीन लेखून त्याच्यावर क्रूरपणे हिणवले जात होते.गुलामगिरी च्या ह्या बंधनाना काळा राम मंदिराच्या सत्याग्रहाने आवाहन देण्याचे कार्य हाती घेण्यात आले.

काळाराम मंदिर सत्याग्रहामधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर दादासाहेब गायकवाड व इतर सत्याग्रही, १९३०आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता.

२ मार्च १९३० ला सुरू झालेला हा लढा पुढील पाच वर्षे चालला होता त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्ममार्तंडशाहीविरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरु होता.

नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ.आंबेडकर यांनी केला होता.

ह्या सत्याग्रहाबद्दल डॉ.आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, “महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता.”

काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते.


महमानवांचे भाषण –


“आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे.”

— डॉ. बाबासाहेब आंबेडकर, २ मार्च १९३० रोजी केलेले भाषण

काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये सामील सत्याग्रही व पोलिस शिपाई इ.स. १९२९ च्या ऑक्टोबर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करुन नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले.

अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते. या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ३ मार्च १९३० रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले. २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली.

२ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरु ठेवावा असा उपदेश केला.

शब्दांकन : प्रराजा ,संदर्भ -विकिपीया-

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

बा…! पेटविलेस पाणी!

शनी मार्च 20 , 2021
Tweet it Pin it Email बा…!पेटविलेस पाणी,पेटविलेस रक्त,पेटवीलेसअनैतिकधर्मरुढींची विषवल्लीधर्मग्रंथ…! जाळलास या भुमीतलाविषम अन्यायकारकअज्ञानी कुजकटविचांरांचा गावगाडा,असमान,हीनकसअमानुष अर्थहीनकोंडवाडे,अनादीकाळाचीतोडुन बेडी,दुबळ्या, गतगात्रनिर्विकार ,निशब्दमनांना नवचेतना देतसाकारलीस नवप्रकाश किरणे,धर्ममार्तडांच्या विषवल्लीलालाथ मारत,ठोकरलीस,नाकारलीस अनझिडकारलीस क्रृरपिढ्यांनपिढ्यांचीगुलामगीरी अन्घेवु दिलासनव्या युगाचानवा श्वास, प्रबुद्धविज्ञानाचा, माणुसकीचासमतेचा ,प्रगतीचा अन्नवीन जगण्याचीअस्तित्वाची नवनिर्मितीचीप्रेरणा अखंडीत देणारा.. होयआज इतिहासाच्यापानापानात सोनेरी नोंद आहे तुच मुक्त केलेस इथल्या स्रियांना,धर्मचौकटीत बंद […]

YOU MAY LIKE ..