शिवाजी नाट्य मंदिरात वंचित बहुजन आघाडीचा युवा मेळावा सपन्न.

दादर:
आज दादर शिवाजी नाट्य मंदिरात वंचित बहुजन आघाडीचा युवा मेळावा मोठ्या संख्येने सपन्न झाला .


युवा नेतृत्व सुजातभाई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी मंदिर, मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रांताध्यक्ष अशोकराव सोनोने, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील, राज्य प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे यांच्या उपस्थिती होते.

या मेळाव्यात खास आकर्षण होते ते युवा पिढीचे नेतृत्व सुजात आंबेडकर यांचे.सुजात भाईंनीही तरूणाईला नाराज केले नाही. अपेक्षेप्रमाणे सुजात भाईंनी उपस्थितीत युवकांची मने जिंकली. देशात भाजप आरेसेसने जी गोरगरीब, बहुजन, मुस्लिम, दलित,आदिवासी, शेतकरी,विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी सुरू केली आहे त्याचा पर्दाफाश करत कडाडून हल्ला चढवला. देशातील प्रश्न, महाराष्ट्रातील प्रश्न यावरही मार्मिकपणे बोट ठेवून उपस्थितीत तरूणाईचे लक्ष वेधले.


अनेकांना माहीत असेल की, वंचित बहुजन आघाडीला टेक्नॉस्वावी करत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत वंचित बहुजन आघाडीचा प्रचार आणि प्रसार करण्यात सुजात भाईं मोठा रोल अदा करत आहेत. अतिशय कल्पकतेने वंचित बहुजन आघाडीची भूमिका सोशलमिडीयाच्या माध्यमातून घराघरात पोहचविण्याचे काम सुजात भाई आपल्या खास टिमला सोबत घेऊन करत आहेत.

जिंदादिल पत्रकार म्हणून आपल्या करीअरला सुरुवात करणारे सुजातभाई जसे पत्रकार आहेत तसेच ते उत्तम वक्ते ही आहेत. विरोधाकांवर बेमालूम आणि सहजतेने “कोटी” करण्यात त्यांच्या हातखंडा आहे असेच म्हणावे लागेल.

आजच्या मेळाव्यात सुजात आंबेडकरांच्या भाषणातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला तरूणांना कशापध्दतीने सामोरे जायचे आहे व वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणण्यासाठी तरूणांनी कशाप्रकारे काम करायचे आहे याचा एक प्रकारे रोड मँपच ठरवून दिलेला आहे.
सुरेश शिरसाट दि.11.9.2019

Vanchit Bahujan Aaghadi
#Maharashtra_With_Ambedkar

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

सरकार मागासवर्गीयांचे किती मुडदे पाडणार आहे? " उपरा "कार लष्मण माने कोणत्या मस्तीत वावरत आहेत?

शुक्र सप्टेंबर 13 , 2019
Tweet it Pin it Email सरकार मागासवर्गीयांचे किती मुडदे पाडणार आहे? ” उपरा “कार लष्मण माने कोणत्या मस्तीत वावरत आहेत? अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील दोन दशकांत मागासवर्गीयांच्यावर विविध कारणास्तव हल्ले झाले. बलात्कार, विनयभंग, विटंबनेच्या घटना याचा विचार करता हा जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिला असून, जातीयवादी मानसिकतेचा […]

YOU MAY LIKE ..