कल्याण येथे बँक ऑफ बरोडा च्या SC /ST वेलफेर असोसिएशने गरजूंना मदत करीत महामानवाना केले अनोखे अभिवादन ….!

कल्याण येथे बँक ऑफ बरोडा च्या SC /ST वेलफेर असोसिएशने गरजूंना मदत करीत महामानवाना केले अनोखे अभिवादन ….!
**************************************
कुमार कांबळे www.ambedkaree.com कल्याण


सध्याची परस्थिती खूप गंभीर बनत चालली आहे . अशा परिस्थिती गरीब आणि हातावर पोट असणाऱ्या वर्गाचे हाल होत आहेत. याची दखल घेत बहुसंख्य आंबेडकरी कार्यकर्ते आपल्या सार्वजनिक जयंती चा निधी हा सर्वसामान्य लोकांना मदत करण्याकरिता वापरत आहेत आणि खऱ्या अर्थाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 वी जयंती बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या विचाराने साजरी करत आहेत.

कल्याण येथे बँक ऑफ बरोडा च्या SC/ST वेलफेअर असोसिएशन BCC आणि मुंबई युनिट ने कल्याण मधील वालधुनी येथील शिवाजी नगर परिसरातील गरीब व गरजू लोकांना किराणा व इतर साहित्याचे मोफत वाटप करत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देऊन त्यांची १२९ वी जयंती साजरी केली.

बँक ऑफ बरोडा च्या SC/ST वेलफेर असोसिएशन मुंबई युनिट कमिटीने अनोखा उपक्रम करून आपले समाजप्रति योगदान दिले त्याप्रसंगी स्नेहलता कांबळे ,मनीषा मॅडम ,प्रज्ञा मॅडम आणि सचिन सर उपस्थित होते.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

मुंबईत कोरोना विरुद्ध युद्ध प्राणपणाने लढत आहेत महानगर पालिका कर्मचारी आणि प्रशासन .....!

मंगळ मे 5 , 2020
Tweet it Pin it Email मुंबई मुंबईत कोरोना विरुद्ध युद्ध प्राणपणाने लढत आहेत महानगर पालिका कर्मचारी आणि प्रशासन …..! *************************************** गीतेश पवार-www.ambedkaree.com Pin it Email https://www.ambedkaree.com/bankofbarodast-scwelfareassociationkalyanhelpinghand/#SU1HXzIwMjAwNTA बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आणखी एका कामगारांचा कोविड-19 ने मृत्यू किंवा मुंबई महापालिकेच्या कामगारांना कोरोना व्हायरसची लागणं…….. ह्या हेडलाईन खाली रोज प्रिंट मिडिया आणि सोशल मिडियाच्या […]

YOU MAY LIKE ..