विध्यार्थी दिन

7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा ७ नोव्हेंबर हा दिवस राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा होत आहे

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सर्वाधिक उच्च शिक्षण घेतले त्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन शिकावे यासाठी मागील दोन वर्षांपासून राज्य सरकारने 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला.शासकीय निर्णयानुसार (7 नोव्हेंबर रोजी सर्व शाळा काॅलेजमध्ये हा दिवस साजरा केला जाणार आहे. जे लोक करणार नाहीत त्यांची लेखी तक्रार आपल्याला जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडे करता येईल.)

सरकारने सहजासहजी हा निर्णय घेतलेला नाही. साता-याचे लेखक पत्रकार अरूण विश्वंभर यांनी सतत 14 वर्षे पाठपुरावा केला होता.


७ नोव्हेंबर १९०० या दिवशी बाबासाहेबांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक, सातारा येथील शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भिवा होते. या शाळेच्या रजिस्टरला ‘१९१४’ या क्रमांकासमोर आजही त्यांची स्वाक्षरी असून, हा ऐतिहासिक दस्तावेज शाळा प्रशासनाने जपून ठेवला आहे.
सभार :JNP न्युज

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

वंचितांचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी घेतली राज्यपालांची भेट .

गुरू नोव्हेंबर 7 , 2019
Tweet it Pin it Email गेल्या २४ सप्टेंबर ला झलेल्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक निकालाने महाराष्ट्र राज्यात मोठा पेच निर्माण केला आहे. सत्ते साठी सेना-बीजेपी यांच्यात कलगी तुरा चालू आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते पडद्याआड मोठी समीकरण करत आहेत .त्यात महाराष्ट्रातील जनतेचे खुले हाल पाहायला मिळत आहेत. योग्य वेळी […]

YOU MAY LIKE ..