आरक्षण आणि राज्यघटना हटवणे आता सहज शक्य ! : श्यामदादा गायकवाड

आरक्षण आणि राज्यघटना
हटवणे आता सहज शक्य !
: श्यामदादा गायकवाड

बदलापूर: सरकार कोणत्याही पक्षाचे येवो, राज्यकर्त्यांना देश तर संविधानानुसारच चालवावा लागतो ना, या भाबडेपणातून आणि भ्रमातून वेळीच बाहेर पडा, असे सांगतानाच आरक्षण आणि राज्यघटना या दोन्ही गोष्टी कलम 370 प्रमाणे हटवणे आता कोणत्याही क्षणी सहज शक्य आहे, असा इशारा ज्येष्ठ रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड यांनी येथे दिला।

रविवारी बदलापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचा तर्फे राजाभाऊ ढाले यांना आदरांजलीपर एक परिसंवाद पार पडला। त्यात ते बोलत होते।

कलम 370 हटवण्यासाठी जम्मू काश्मीरच्या विधानसभेतील ठराव बंधनकारक होता, असे सांगून गायकवाड म्हणाले की, त्या राज्यात विधानसभा अस्तित्वात नसताना संसदेत ठराव करून कलम 370 हटवले गेले। हा सारा प्रकार घटनाविरोधी असला तरी तो आता बहुमताच्या जोरावर रेटून नेला जाईल।

कलम 370 च्या बाबतीत जसे घडले तसेच दलित, ओबीसी, आदिवासी यांचा संविधानिक अधिकार असलेल्या आरक्षणाबद्दलही नजीकच्या काळात घडेल। आरक्षण आणि संविधान दोन्हीही हटवले जाणे आता मुळीच अशक्य नाही, असे त्यांनी सांगितले।


जगाच्या इतिहासात प्रत्येक हुकूमशहा हा लोकशाही मार्गानेच सत्तेवर आलेला आहे, याचा विसर आपल्याला पडता कामा नये ,असेही गायकवाड म्हणाले।

प्रत्येक वक्त्याला स्वतंत्र विषय देण्याची कल्पकता या परिसंवादात कार्यक्रमाचे संयोजक अरुण केदारे आणि महेंद्र नवगिरे यांनी दाखवली होती। ज्येष्ठ पँथर- रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड हे ‘आंबेडकरी समाजासमोरची आजची आव्हाने’, प्रा डॉ विठ्ठल शिंदे हे ‘दलित पँथरचा कार्यकाल’ तर ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे ‘दलित पँथर आणि पत्रकरिता’ या विषयावर बोलले। या कार्यक्रमात दलितांवरील दमनशाहीच्या विरोधातील न्यायालयीन लढाईत सदैव तत्पर आणि सक्रिय राहिलेले ऍड बी जी बनसोडे यांनीही विचार मांडले। तसेच ज्येष्ठ आंबेडकरी कवी गायक प्रभाकरजी पोखरीकर यांनी काव्यातून पँथरच्या संघर्षाच्या आठवणी जागवल्या।

या कार्यक्रमाला पँथर शहिद भागवत जाधव यांचे बंधू सुमेध जाधव, साप्ताहिक ‘आम्रपाली ‘ चे संस्थापक संपादक रा. सो. नलावडे,दलित मुक्ती सेनेतील आनंदराव सोनावणे, शिवाजी मस्के, गणराज्य अधिष्ठानचे कोषाध्यक्ष सतीश डोंगरे आदी जेष्ठ कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते।

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

काल ONGC प्लांट ला लागलेली आग , ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू......! सरकारची उदासीनता

मंगळ सप्टेंबर 3 , 2019
Tweet it Pin it Email काल ONGC प्लांट ला लागलेली आग ,५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू……! सरकारची उदासीनता काल उरणमधील ONGC प्लांटला भीषण आग लागली आणि यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 3 गंभीर आहेत.मुंबईला पुरविण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा (crude oil) हा सर्वात मोठा प्लांट आहे. पत्रकार जयश्री […]

YOU MAY LIKE ..