वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूर लोकसभा मतदार संघ 2019 प्रमुख उमेदवार अड आंबेडकरांकडे किती आहे मालमत्ता

वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूर लोकसभा मतदार संघ 2019 प्रमुख उमेदवार अड आंबेडकरांकडे किती आहे मालमत्ता ? आणि इतर काही…..

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

या अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची ४१ लाख ८१ हजार १८९ रुपये, त्यांच्या पत्नी अंजली यांच्या नावे ७३ लाख ८६ हजार २७३ रुपये आणि मुलगा सुजातच्या नावे ९ लाख ५५ हजार ४५४ रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हा प्रलंबित नाही. त्यांच्याकडे एकही वाहन नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

सुशीलकुमार शिंदे

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उत्पन्नात चार वर्षांत २१ लाखांनी तर त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांच्या उत्पन्नात ९६ लाखांनी वाढ झाली आहे. उमेदवारी अर्जासोबत शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३७ लाखांची देणी असल्याचे म्हटले आहे.
शिंदे यांच्या नावे एक ट्रॅक्टर व एक फॉर्च्युनर कार, एक जनरेटर आहे, तसेच पत्नीच्या नावे एक ट्रॅक्टर व एक टेम्मो, दोन जनरेटर आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे शिंदे यांच्या नावे १८.७५ (आज बाजारभाव किमत: १ कोटी ४८ लाख) तर पत्नी उज्वला यांच्या नावे ७.७५ एकर (किमत: ५५ लाख ८५ हजार) शेती आहे. तसेच पत्नी उज्वला यांच्या नावे कोलड (जि. रायगड) येथे फॉर्म हाऊस व एरंडवडे (पुणे) येथे फ्लॅट आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्या नावे अशोकनगर येथे घर व मुंबईत पॉली हिल येथे फ्लॅट, दिल्लीत मुनरिका विहारमध्ये फ्लॅट आहे. शिंदे कुटुंबियांकडे ९५५ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.

शिवाचार्यांच्या नावे पावणे तीन
लाखांची मालमत्ता

भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या नावे सहा लाख ४६ हजार ७९ रुपयांची जंगम तर दोन कोटी ७२ लाख २४ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

सभार : महानायक ऑनलाइन

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

One thought on “वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सोलापूर लोकसभा मतदार संघ 2019 प्रमुख उमेदवार अड आंबेडकरांकडे किती आहे मालमत्ता

Comments are closed.

Next Post

आर पी आय चे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस अड गौतम भालेराव याचे निधन-परभणी जिल्ह्यातील एक लढावू व्यक्तमत्व काळाच्या पडद्याआड

गुरू मार्च 28 , 2019
Tweet it Pin it Email आर पी आय चे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस अड गौतम भालेराव याचे निधन-परभणी जिल्ह्यातील एक लढावू व्यक्तमत्व काळाच्या पडद्याआड भावपुर्ण अदरांजली रिपाईचे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस अॅड. गौतम भालेराव यांचं नुकतच हृदयविकाराच्या झटक्याने गंगाखेड येथे निधन झाले. मृत्यू समयी ते ६२ वर्षाचे होते. आंबेडकरी चळवळीतील एक लढाऊ […]

YOU MAY LIKE ..