आदरणीय श्यामदादा गायकवाड आंबेडकरी चळवळीतील प्रेरणादायी पर्व.

आदरणीय श्यामदादा गायकवाड ……..! प्रेरणादायी नेतृत्व .आंबेडकरी चळवळीतील अनेक चढउतार पाहिले अनेक यातना ,दुःख साहिले व निधड्या छातीने आंबेडकरी बाण्याने चळवळीचे नेतृत्व करणारे खंबीर नेते.

अंबरनाथ -उल्हासनगर आणि सर्वांगीण ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील झुंजार आणि जेष्ठ नेतृत्व म्हणजे शामदादा गायकवाड .जनतेच्या समस्यांवर निर्भयपणे लढणार एकमेव नेते .

रमाबाई आंबेडकर हत्याकांड च्या केस मध्ये आपल्या निवडक साथीदारांना घेऊन एकाकी झुंज देत ती लढाई सर्वोत्तपरी जिंकणारा नेते.अगदी सर्व सामान्य जनतेत मिसळून ,कार्यकर्त्याच्या जीवाला जीव देत त्यांच्या साठी उभा राहणारा नेता ……नेता नव्हे ते तर मोठ्या भावाप्रमाणे कसलेल्या ,कष्टकरी, खचलेल्या मनांना उभारी देणारा आदिवासी,दलित,अल्पसंख्याक यांच्या साठी धावणारा श्यामदादा…!,जात ,धर्म,भाषा अन कसलाही आडपडदा न ठेवता सर्वसामान्य जनतेचा आवाज असणारा शयामदादा …….लिहिण्यासारखे बरेच काही…..!

दरवर्षी शहिद भागवत जाधव आणि रमेश देवरुखकर याना न चुकता अभिवादन करणारा दादा……! तमाम आंबेडकरी चळवळीत आदराचे आणि अभिमानाचे पर्व असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे दादा..!अशा या प्रेरणादायी आणि लढाऊ नेत्यांना अर्थातच दादांना www.ambedkaree.com च्या वतीने वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देत आहोत .त्यांच्या तालमीत तयार झालेले अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या बद्दल भरभरून बोलत आणि लिहित असतात दिनांक १२ नोव्हेंबर हा श्यामदादा गायकवाड यांच्या वाढदिवस ….! आंबेडकरी चळवळीतील तरुण आणि स्पष्टपणे लिहिणारे आमचे मित्र महेंद्र
पंडागळे ,उल्हासनगर यांनीं दादांबद्दल व्यक्त केलेले मत त्यांच्याच FB वॉल वरून खास www.ambedkaree.com साठी देत आहोत.

आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ पण अपडेटेड कृतिशील नेतृत्व आदरणीय श्यामदादा गायकवाड यांच्या बद्दल थोड लिहिलंय जे #Post_LPG_Era मध्ये जन्मलेल्या #नवं_आंबेडकरवादी तरुणांसाठी आहे.

“The Political leader must recognize the problem before it’s become an Emergency”
हा वाक्प्रचार ज्यांना तंतोतंत लागू होतो असे जेष्ठ वैचारिक रिपब्लिकन नेते, लढाऊपँथर, दबंग योद्धा अर्थात मा. श्यामदादा गायकवाड !

दादांबद्दल काय आणि किती लिहावं दादा दादा आहेत आज गेली 4 दशकांहून अधिक काळ ज्यांनी आंबेडकरी चळवळीस दिला, त्याला तोड नाही इतकं करून पण दादा नेहमी म्हणतात की मी जे काही करतोय ते कोणावर उपकार करत नाही हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी जीवातजीव असेपर्यंत करतच राहणार.

दादांबरोबर ज्यांनी थोडा वेळ जरी चर्चा केली असेल किंवा काही काळ त्यांच्या सानिध्यात घालवला असेल त्यांच्याच लक्षात येईल की दादा काय आहेत ते!

आंबेडकरी नेत्यांमध्ये अगदी बोटावर मोजण्या इतके नेते मी पाहिलेत जे इतक्या सूक्ष्म पद्धतीने समाजाचं आणि व्यक्तींचं निरीक्षण आणि अभ्यास करत असावेत इतकं करून दादा थांबत नाहीत तर त्या व्यक्ती बद्दलच अचूक, मार्मिक, विश्लेषण फक्त दादाच करू शकतात त्यांची शैली आणि विडंबन किती परफेक्ट आहे याबद्दल बोलायची गरजच नाही ते आजही सर्वश्रुत आहे. अश्या असंख्य गोष्टी दादांबद्दल कधीही सांगता येतील.

त्यांचा 40 वर्षापेक्षा अधिकचा काळ चळवळीत गेला असला तरीही आमच्या सारखे नवे आणि आमच्याहून हि नवखे अश्या कार्यकर्त्यांची नावे दादांना नेहमी पाठ असतात.
दादांसाठी आमची हि तिसरी पिढी पण, या तिसऱ्या पिढीबरोबरची दादांची आणि आमची नाळ अजूनही तितकीच

घट्ट जुळलेली आहे आणि ती सदैव कायम असेल या बाबतीत माझ्या मनात तरी तिळमात्र शंका नाहीच.

अभ्यासात नेहमी अव्वल असलेले दादा CHM कॉलेज ते सिद्धार्थ कॉलेज व्ह्या या Law कॉलेज अश्या मेरिट मधून प्रवास करत पुन्हा आपल्या ठाणे जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या सर्व लहान मोठ्या गावात त्यातील छोटे, मोठे रस्ते, पायवाटा इतके फिरलेत आणि इतके लोकांमध्ये परिचित आहेत की, आजच्या स्वतःला अध्यक्ष म्हणून घेणाऱ्या चमकेश नेत्याला त्यातले 20% गाव आणि त्याचे रस्ते पण माहित नसतील.

ठाणे जिल्हा तर दादांचाच आहे परंतु मुंबई मध्ये आजही दादांचा वयक्तिक, सामाजिक आणि नैतिक असा जबरदस्त दबदबा आहे आणि त्यांचं ते “दादापन” त्यांनी अतिशय मेहनतीने, नितीमत्तेने आणि धाडसाने जपलंय आजही मुंबईतील चळवळ आणि त्यांची समीकरणे दादांशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत.

माता रमाई नगर मधील हत्याकांडा नंतर कोणाचीच तिथे जाण्याची हिम्मत नव्हती अश्या वेळेस दादा तिथे गेले लोकांना भेटले आणि आजतागायत ती केस दादा लढत आहेत. आज घराणेशाही आणि वारसा सांगणार्यानी किती Actrocity च्या केसेस लढल्यात आणि इतकी वर्षे चिवटपणे झुंज दिली असे उदाहरण दाखवा. (रोहिथ वेमुला केस मध्ये अजून एकही साधी अटक नाही).


इतकेच नाही तर जवखेड, सोनई, खर्डा आणि अजून कित्येक केसेस आजही दादा लढत आहेत.
हे एका बाजूला असतांना स्वतःच्या दोन्ही भावांच्या खुनाच्या केस मध्ये दादांनी खुन्याना जन्मठेपेपर्यंत पोहोचवलं आहे स्वतःवर असेलेल्या 30 च्या वर केसेस मध्ये दादा निर्दोष सुटलेले आहेत आणि या सर्व प्रक्रियेत तुरुंगवास भोगलेले दादा, केस जिंकलेले दादा, दोषींना शिक्षा होईपर्यंत लढा देणारे दादा सगळ्यांपेक्षा (तथाकथित नेत्यांपेक्षा)नक्कीच वेगळे आहेत.

सर्वोच्च न्यायालयातील एखाद्या नामांकित वकिलाला लाजवेल असा युक्तिवाद, धाडस, चिकाटी आणि आत्मविश्वास आज दादांच्या नावावर आहेत.

हे सर्व तर आहेच पण दुसऱ्या बाजूला गेली 32 वर्ष अविरतपणे सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक वसा घेऊन आणि वेगवेगळे Secular प्रयोग करून ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी अशी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती पण दादांचीच कल्पना आणि 35 वर्षांपासून परिवर्तनाचा अखंड वसा चालवणारे दादाच !

मूळचा लेखनाचा, चित्रकलेचा, नाटके लिहून दिग्दर्शित करण्याचा आणि राज्य नाट्य स्पर्धेत जिंकण्याचा आणि हरवण्याचा पिंड असणाऱ्या दादांच्या वाचनाबद्दल काय बोलावं ??
दादा मराठी, हिंदी वाचतात पण इंग्रजीची जाडजूड पुस्तक वाचतात आज आपले किती नेते इंग्रजी पुस्तके वाचतात ?
दादा ज्या लेखकांची नावे सांगतात त्यांची नावे आपल्या कोणत्या नेत्यांनी किमान ऐकली असतील अशी मला तरी शंका आहे.

दादांचा जागतिक पातळीवरचा सामाजिक, सांस्कृतिक राजकीय अभ्यास आमच्या सारख्या तरुणांना थक्क करतो.
एका बाजूला चीन अमेरिकेवरची पुस्तके वाचतांना समोर स्वामीनगर च्या झोपडपट्टीतून तक्रार घेऊनआलेले तामिळ कुटुंब त्यांच्या भाषेत बोलतांना व त्यांचे प्रश्न त्यांच्याच भाषेत सोडवनारे दादा खरच मला तरी ग्लोबल वाटतात.

नामांतराच्या लढ्यातील दादांचे योगदान सर्वश्रुत आहेच पण,

माजी प्रधानमंत्री व्ही.पि.सिंग यांच्या बरोबर दादांनी केलेलं वरळी सि लिंक च मच्छीमारांचे आंदोलन असो,
1992 ला बाबरी मशीद पाडल्याच्या विरोधात ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये “धर्मांधता विरोधी मंचाची” उभारणी करून दहा हजार समर्थकांना घेऊन केलेलं जेलभरो आंदोलन असो,
झोपडपट्टीत राहणार्यांना हक्काची घरे मिळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी काचेरीवर काढलेला महामोर्चा असो, खैरलांजी झाल्यावर उल्हासनगर येथे झालेल्या डेक्कन क्वीन जाळीत प्रकरणात आपल्या निरपराध पोरांना सोडवण्यासाठी केलेली धडपड असो किंवा मग आताच्या एक मराठा लाख मराठा या घोषणेने कधी नव्हे इतकी जातीय तेढ भावना राज्यात तयार होत असतांना आजिबात न डगमगता “एक भारतीय 125 कोटी भारतीय ” अशी हाक देऊन ठाण्याचा लाखोंच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे दादा खऱ्या अर्थाने आमच्या नजरेत Angry Young dynamic Militant आहेत.

आजवर दादांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल पाहता बरेच चढ उतार असले तरी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून मला नव्हे तर प्रत्येकाला दादांबद्दल आदर आहे आणि तो कायम राहणार यात कोणालाही शंका नाहीच. दादांची परखड वृत्ती सर्वांना माहीत असूनही दादांचे भाषण म्हणजे शाब्दिक, बौद्धिक, विनोद आणि गंभीरता अशी मिक्स पर्वणीच त्यामुळे दादा बोलणार आहेत आणि दादा आज भाषणात आम्हाला हि बोलतील हे माहित असूनही दादांचे भाषण चुकवलेला व्यक्ती दुसराच कोणीतरी असावा. दादांच्या पक्षात आपण नाही आपण दादांबरोबर राहून शिकून दुसऱ्या पक्षात जातो तरीही “दादा मी त्या पक्षात जातोय काही मदत लागली की येईन आशीर्वाद द्या, मार्गदर्शन करा आणि लक्ष असुद्या” असे म्हणणारे हजारो आहेत पण त्यांच्याहुन मोठे दादा आहेत जे त्यांना सदैव मदत करतात आणि इथून पुढे हि करतील इतक्या दिलदार मनाचा हा खराखुरा नेता कुठेच सापडणार नाही.


दादा खूप वर्षांपासून कामगार संघटना चालवतात त्यांच्या युनियन बऱ्याच ठिकाणी आहेत आणि ते हे किचकट काम पण मन लावून करतात आजही रिक्षा, फेरीवाले यांच्या पासून ते कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी महापालिकेपर्यंत त्याचा पसारा आहे असे असूनही आजही नाका कामगार असो, फेरीवाला असो, रिक्षावाला असो, सफाई कामगार असो की पालिका आयुक्त असो दादा आजही सर्वाना वेळ देतात सर्वांचं म्हणणं ऐकतात आणि त्यावर काम करतात हे सगळं असूनही आणि या वयातही दादांची मेमरी अफलातून आहे त्यांना कधी, कोणाला कुठे भेटलो होतो, काय संदर्भ होता सगळं लक्षात राहत आमच्या सारख्यांचे जन्मवर्ष सुद्धा लक्षात राहतात याच मला आजही कोड आहे.

परंतु या सर्वात दादाच मोठेपण मावणार नाहीच नाका कामगार आणि सफाई कामगार आणि इतर सर्व कष्टकरी जनतेची नस नस ओळखणारे दादा ज्योतिबांची आणि बाबासाहेबांची चळवळ या सर्व कष्टकरी लोकांना बसवून आणि नीट समजावून सांगतात आपण फक्त आंबेडकरी चळवळीवर तासनतास गप्पा मारतो हा असा तो तसा पण आजवर आपण तरी कुठे बसलोय नाका कामगारा बरोबर ? फेरीवाल्या बरोबर, आपल्या तामिळ बांधवाबरोबर, रिक्षावाल्याबरोबर !
आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात आपण बसलोय 10Mb चा स्पीड असलेला Wifi घेऊन आणि 25 हजाराचा 4G फोन घेऊन चालू आहे चळवळ फेसबुक वरून नाका तोंडातून फेस येऊस्तोवर whatsapp वर खटा खटा बटन दाबून धमक्या, फुसकी आवताने, असं करू, तस करू, सीना नही फौलाद है आंबेडकर कि औलाद है !!!

आज दुश्मन दारावर उभा ठाकलेला असतांना माणसांशी समोर बसून त्यांना समजावून सांगून क्रांतीलढा उभा करण्याची वेळ आलेली असतांना आपण कोणते यान, कोणते सेटलाईट कोणत्या हवेत उडवतोय ?
याचे नेमके भान नेहमी दादांकडे गेल्यावर होते तुम्ही कितीही update असा हा अवलिया तुमच्या आणि त्यांच्याही कुंडल्या खिशात घेऊन बसलाय आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला
“पुढचे धोके ओळखा !
वेळीच सावध व्हा !!!”
आणि लढा असं सांगतोय आपण सर्वांनी या यौध्याच्या अनुभवाचा, लढण्याचा, चिकाटीचा, शौर्याचा, बुद्धीचा उपयोग चळवळ अधिक बळकट करण्यासाठी करून घेऊया आणि ताकदीने येणाऱ्या काळात शत्रूंशी दोन हाथ करूयात याच आशवादासह माझं दादांबद्दलच्या मनोगतास तात्पुरता स्वल्पविराम देतो आणि तूर्तास येथे थांबतो.
जयभीम । जयभारत ।

टीप : #भीमा_कोरेगाव ची केस आदरणीय श्यामदादा आणि त्यांचीच टीम लढत आहे हे सांगायचं राहील.
तसेच आताच झालेली खर्ड्यातली बाळू पवार ची केस आणि संबंधित बरच काम दादा, Keshav Waghmare, लक्ष्मण गायकवाड आणि इतर मंडळी लढत आहेत.

बाकी सविस्तरपणे लवकरच…..

महेंद्र अशोक पंडागळे
07678044677

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

आजचा दिन विशेष आज तारीख १३ नोव्हेंबर १९२९ रोजी पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह.

बुध नोव्हेंबर 13 , 2019
Tweet it Pin it Email आजचा दिन विशेष आज तारीख १३ नोव्हेंबर १९२९ रोजी पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह. पर्वती मंदिर सत्याग्रह अमरावती नंतर पुण्यातील ‘पर्वती टेकडीवरील मंदिर’ अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम एम जोशी, ना ग गोरे, र […]

YOU MAY LIKE ..