डाॅ_पायल तुम्ही लढायला पाहिजे होते- जातीवादी मानसिकतेला बळी.

डाॅ_पायल तुम्ही लढायला पाहिजे होते.

डाॅ_पायल_तडवी, अत्यंत मेहनतीने शिकलेली, गंभीर व्यक्तीमत्व असलेली, एमडी, गायनॅकाॅलाॅजी च्या दुसरया वर्षाची, नायर हाॅस्पिटलची निवासी डाॅक्टर. त्यांचे पती सलमानही डाॅक्टर. घर जळगावचे.

सकाळच्या गायनॅकच्या दोन आॅपरेशन ड्यूटीज करुन आपल्या होस्टेल रूममध्ये गेली, ती जीवनाला कंटाळून आयुष्याचा निरोप घेण्यासाठीच. सायंकाळी ७:००ला तीला गायनॅकचा काॅल गेला. पण, कोणतेही उत्तर मिळाले नाही. वेळ पाहून दरवाजा उचकटून आत प्रवेश केला तर #भविष्य घडण्या अगोदरच एक भविष्य उदध्वस्त झाले होते.

तिन वरिष्ठ स्त्री डाॅक्टर आहुजा, खंडेलवाल, माहिरे तीला व्हाॅटसॅप ग्रुपवरती जातीवाचक कमेंट करुन सातत्याने हीनवत होत्या. तिला पेशंटसमोर तीच्या स्कीलविषयी कमेंट करुन अपमानीत करत होत्या. तिला डिलिव्हरी करु दिली जात नव्हती.

या_सर्व_हरॅसमेंटचे_कारण होते,”तू एसटी कोट्यातून आली त्यामुळे तुझ्याकडे गुणवत्ता नाही” या बाबी चौकशीतून पुढे आलेल्या आहेत. या सततच्या जातीय मानहननेच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली.

सातत्याने जाती व जातीच्या #कलंका (stigma) वरुन केले जाणारे मानहनन यावर उपाय काय? का असेच हजारो निष्पाप जीव ती परिस्थिती टॅकल न करता आल्यामुळे जीवन संपवणार.

जातिव्यवस्थेच्या जाचकते (tyrany)ची दोन परिमाणे आहेत. एक आहे #शोषण (exploitation); दुसरे आहे

#पीडन(subjugation+oppression+suffering),. वर्गीय जाचकतेमध्ये असते फक्त शोषण. सभोवतालची सामाजिक स्थिती मात्र आहे जात-वर्ग. त्यामुळे जाचकतेचा आशय (content) अनाकलनीय बनतो.

जातीतील प्रतिनिधीत्वातून प्राप्त झालेली संधी व त्यातून आलेली सधनता जातीच्या सामाजिक पृष्ठभूमीपासून तोडायला मदत करते, त्यातून तो वर्गीय समाजात जातो. त्यामुळे जातीचे शोषणपीडन संपते. हा आहे आभास.

वास्तवात तो जातीच्या वर्गस्तरामध्ये जातो. त्यामूळे जातीची सामाजिक पृष्ठभूमी वर्गस्तराला चिटकून राहतेच. वर्गाचे शोषण वाट्याला आले तर ते टॅकल करण्याची त्याची क्षमता आहे. परंतू इथे जात-वर्ग चरित्राचे #शोषण-#पीडन आहे आणी ते अधिक अनाकलनीय बनल्यामूळे ते टॅकल करणे अशक्यप्राय बनते. ‘तो’ जातीचा कलंक #स्टिग्मा तुम्हाला पीडा देण्यास पुरेसा आहे, तुम्हाला निराश करण्यास पुरेसा आहे.

काॅ_शरद_पाटील म्हणतात, जात-वर्ग चरीत्रातील हे जातीय पीडन, वर्गीय शोषणाचीही संख्यात्मकता वाढवते आणी जाचकतेला अनेक पटीने जाचक करते. त्यामुळे जातिव्यवस्थेचा हा माॅनस्टर नष्ट केल्याशिवाय शोषण-पीडन वर्गस्तरामध्येही पिच्छा सोडणार नाही.

उपाय_काय?
“शूद्रातिशूद्रांनी विद्रोही राहणेच श्रेयस्कर!”,शपा

#आशिया_सदर्न
पोस्ट साभार
आशिया सदर्न या पेज वरून

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निदर्शने

सोम मे 27 , 2019
Tweet it Pin it Email डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निदर्शने डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निदर्शने वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वात आदिवासी समाजाच्या डॉ.पायल तडवी यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी आज मुंबई येथे नायर […]

YOU MAY LIKE ..