०६ डिसेंबर २०२० प्रज्ञासूर्यास पञ लेखनातून अभिवादन!

जि.प.उच्च प्राथमिक शाळा-ढोके दापिवली येथे संविधानाचे शिल्पकार,राष्ट्रनिर्माते,ज्ञानाचे प्रतिक(Symbol of knowledge)स्ञी उध्दारक,कामगार नेते,थोर अर्थतज्ज्ञ,शेतकऱ्यांचे कैवारी,राजकीय मुत्सद्दी,प्रकांडपंडीत, संसदपट्टू, आजन्म विद्यार्थी,बोधीसत्व,विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजन केले होते.

शाळेचे शिक्षक मा आनंद सोनकांबळे यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र लिहून अभिवादन केले.

अभिवादनच्या प्रारंभी बाबासाहेबांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री.धनंजय गायकर यांनी पुष्पहार अर्पण केला.शाळेचे मुख्याध्यापक श्री.शंकर झाडबुके सर यांनी मेणबत्ती प्रज्वलित केली.समाजसेवक श्री.अशोक भोईर यांनी अगरबत्ती सुंगधित करुन पुष्प वाहीले.व अभिवादन केले.

अभिवादनाचे प्रास्तविक व बाबासाहेबांच्या जीवनावर शाळेच्या उपशिक्षिका सौ.अनघा सोनकांबळे मॕडम यांनी आपले विचार प्रकट केले.शाळेचे उपशिक्षक श्री.आनंद सोनकांबळे सरांनी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केल्याप्रमाणे महामानवाला अभिवादन शाळेच्या विद्यार्थीनींच्या वतीने माऊलीची माया होता माझा भिमराया या गीताने झाली.शाळेतील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आपले विचार प्रकट करुन पुष्प वाहीले व विनम्र अभिवादन केले.

दादर येथील चैत्यभूमी ला कोरोना संकटामूळे जाणे शक्य नसल्याने फिजिकल डिस्टनसिंग नियम पाळत गावचे पालक,व्यवस्थापन कमिटी,मुख्याध्यापक,शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थ्यांनी एकञित चैत्यभूमी विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक मुंबई येथे पोस्टकार्ड रवाना करण्यासाठी पञलेखनातून बाबासाहेबांना लेखणीच्या विचारांतून अभिव्यक्त होत अभिवादन केले.

सर्वांचे विचार या पञलेखनातून वाचावयास मिळाले.हा अभिनव अनोख्यापध्दतीने अभिवादन उपक्रम अंबरनाथ तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतून प्रथमच राबविला गेला.

-किरण तांबे -www.ambedkaree.com बदलापूर

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

जगाला दिशा देणारा महामानव आपल्या देशात, आपल्या राज्यात झाला ही खरोखर अभिमानाची बाब आहे!!-मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे

रवि डिसेंबर 6 , 2020
Tweet it Pin it Email मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे कोनशिला अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एका ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आज संपन्न झाले. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य याला चालना देणारे हे संशोधन केंद्र जागतिक पातळीवर अभिमान वाटेल अशा पद्धतीने उभे करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी […]

YOU MAY LIKE ..