बहण मा.मायावतींना पितृशोक….!

बहण मा.मायावतींना पितृशोक….!

उत्तरप्रदेश च्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या सुप्रीमो बहिण मा.मायावती यांचे वडिल प्रभुदयालजींचे ९५ व्या वर्षी दुःखद निधन झाले .ते दिल्लीत आपल्या परिवारा समवेत रकाबगंज येथे राहत होते .गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपुर गावचे मूलनिवासी असणारे मायावतीचे वडील सरकारी नोकरी व मुलांच्या शिक्षणासाठी दिल्लीत राहावयास आले . मा मायावती व त्यांच्या भाऊ बहिणीचं शिक्षण हे दिल्लीतच झाले.

आपल्या मुलीला शिक्षण देऊन आईएएस अधिकारी करायचे होते मात्र बसपाचे संस्थापक मा कांशीराम यांच्या सहवासात आल्यानंतर राजकारणात राहून कित्येकवर्षे मुख्यमंत्री झाल्या.

भारत सरकारच्या डाक-तार विभागात सर्वसामान्य पदावर कार्यरत असणाऱ्या प्रभु दयालजी यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विलक्षण प्रभाव होता त्यांचे विचार आपल्या परिवारापर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले व त्यातुनच मग आंबेडकरवादी मायावती घडल्या.

माननीय मायावतींनी आपल्या वडिलांच्या आंबेडकरवादी असण्याच्या प्रेरणेने पुढे १९७७ च्या सप्टेंबरमध्ये दिल्लीच्या कांस्टीट्यूशन क्लबमध्ये मा राजनारायण यांच्या सभेत हरिजन शब्दाला प्रखर विरोध करू शकल्या.पुढे आंबेडकरी विचाराचे पक्के अनुयायी असणाऱ्या प्रभुदयालजी नी तथागत बुद्धाना शरण जाऊन त्यांनी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली.

एक सच्चा प्रामाणिक दूरदर्शी आंबेडकरवादी असणाऱ्या प्रभुदयाल जी लोकांना सातत्याने प्रेरणा देत असत. मा मायावतीच्या त्यांनी सर्व आकांक्षा पित्याच्या नात्याने पूर्णकरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अकाली जाणणे मायावतींना दुःखद आघात झाला आहे.

काँगेसच्या महासचिव मा प्रियांका गांधी वादरा यांच्या सहित देशातील प्रमुख राजकीय नेत्यांनी आपले दुःख व्यक्त करीत दि प्रभुदयाल जी ना आदरांजली व्यक्त केल्या आहेत.

अदारांजली

प्रखर आंबेडकरी असणाऱ्या माननीय दिवंगत प्रभुदयाल जी ना त्यांच्या स्मृतीस www.ambedkaree.com च्या वतीने विनम्र अभिवादन आणि अदारांजली अर्पण करीत आहोत.

प्रमोद रामचंद्र जाधव

(संदर्भ आणि छायाचित्रे आवाज इंडिया च्या fb पेज वरून सभार.)

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा.. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

बुध नोव्हेंबर 25 , 2020
Tweet it Pin it Email कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको असे आवाहन मुख्यमंत्राी उध्दवजी ठाकरे यांनी करताचं, भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनीही प्रत्येकांनी स्थानिक ठिकाणी शासनाच्या आदेशाचे अन् नियमांचे पालन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, […]

YOU MAY LIKE ..