जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा.. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको असे आवाहन मुख्यमंत्राी उध्दवजी ठाकरे यांनी करताचं, भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनीही प्रत्येकांनी स्थानिक ठिकाणी शासनाच्या आदेशाचे अन् नियमांचे पालन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे पोस्टकार्ड डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी या पत्त्यावर पाठवावे असे आवाहन जाहिर पत्रकाव्दारे आंबेडकरी अनुयायांना केले आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभिर्य ओळखून भीमजयंती ज्याप्रमाणे संपन्न झाली त्याचप्रमाणे, आपल्या कृतीतून जागृत विचारांची प्रगल्भता आंबेडकरी अनुयायी नक्कीचं दाखवून युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना घराघरातून विनम्रतापूर्वक अभिवादन अर्पण करतील.

महापरिनिर्वाण दिनाच्या साठीनंतरही महाराष्ट्रासह सार्‍या देशभरातून तसेच परदेशातूनही लाखो आंबेडकरी, आंबेडकरवादी अनुयायी आपल्या लाडक्या थोर नेत्याचे भावपुर्ण दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी, आदरांजली, मानवंदना देण्यासाठी, विनम्र नतमस्तक होण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी मोठ्या शिस्तीने, संयमाने चैत्यभूमीवर येत असतात. प्रतीवर्षी त्यांच्यात विक्रमी वाढ होत आहे अन् होतच राहणार.. चैत्यभूमीवरील अफाट भीमसागर पाहून अरबी समुद्रालाही लाज वाटेल अशी त्याची भव्यता असते. चैत्यभूमीवर गर्दीचे नवे उच्चांक प्रतीवर्षी प्रस्थापित होत आहेत. महापरिनिर्वाण दिनी प्रतीवर्षी चैत्यभूमीवर प्रचंड भीमसागर लोटला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाची जागतिक महामारी असल्यांने, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भावनिक न होता बाबासाहेबांना प्रत्येकजण घराघरातूनचं विनम्रतापूर्वक अभिवादन करुन, जगासमोर वैचारीक आदर्श ठेवतील. कारण प्रतिकुल, संकटकालीन परिस्थितीत संघर्ष करण्याचे जसे धाडस आंबेडकरी समाजाकडे आहे तशी मोठी सहनशीलता अन् संयमही आहे. संकट काळात भावनिक न होता, बाबासाहेबांनी ‘जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा’ हा संदेश आचरणात आणला पाहिजे.

चैत्यभूमी ही उर्जाभूमी आहे. त्यामुळे कसल्याही संकटाची पर्वा न प्रतीवर्षी चैत्यभूमीवर भीमसागर उसळतो. ६ डिसेंबर २०१७ रोजी ओखी वादळाशी आंबेडकरी अनुयायांनी मोठा संघर्ष केला आहे. त्यामुळे काही जातीवादी बांडगुळांना ते सहन होत नाही. काही वर्षापुर्वी चैत्यभूमीवरील अफाट भीमसागराला उपद्रवी गर्दी, भीमसैनिकांची गर्दी उत्स्फुर्त नसते त्यांना इच्छेविरुद्ध राजकीय पक्ष पिटाळत असतात, दादरकरांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते, दादरकरांनी मुंबईतून काढता पाय घेतला, परिसरातील रुग्णालयांनाही शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या लागतात अशी अनेक खोडसाळ, निराधार वृत्ते काही वृत्तपत्रांतून प्रसिध्द झाली होती. त्यातच, यावर्षी कोरोनाची जागतिक महामारी आहे. भारतासह जगभरात लाखो लोकांनी आपला जीव गमविला तर, लाखोंचे संसार उध्वस्त झाले आहेत, आर्थिक व्यवस्था कोलमडली. दुश्मनावर येऊ नये असा आम्ही सुध्दा तो कोरोनाचा जीवघेणा प्रादुर्भाव अनुभवा आहे. त्यामुळे तुमच्या कुटुबासाठी जसे महत्त्वाचे आहात तसे आंबेडकरी चळवळीसाठीही महत्त्वाचे आहात. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतांनाच, दिवाळी नंतर कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यात अजून वाढ झाली तर, महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी समाजांने चैत्यभूमीवर गर्दी केल्यांने कोरोना संख्येत वाढ झाली असे कोणी म्हणणार नाही याची खबरदारी आंबेडकरी समाज नक्कीच घेऊन, कोरोनाचा जीवघेणा प्रादुर्भाव टाळण्याचाही नक्कीच प्रयत्न करेल. अन् भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब अन् मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी केलेल्या आवाहनानुसार यावर्षी बाबासाहेबांना प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न जाता घराघरातून विनम्रतापूर्वक अभिवादन करतील अन् पुढच्या वर्षी दुप्पटीने चैत्यभूमीवर जाऊन विनम्रतापूर्वक अभिवादन करण्याचा निर्धारही करतील यात शंकाच नाही.

- मिलिंद कांबळे,चिंचवलकर ९८९२४८५३४९

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

संविधान मानणारे जागृत आहेत काय ?

गुरू नोव्हेंबर 26 , 2020
Tweet it Pin it Email डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान गौरव दिन भव्य स्वरुपात देशभर साजरा होत आहे.फुले,शाहू आंबेडकर विचारधारा मानणारे आणि जाणणारे लोक,  समाज मोठा उत्सव साजरा करणारे आहेत. काही संस्था संघटना एकत्र येऊन भव्य गौरव यात्रा,रैली काढत असतात. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेला एक प्रश्न विचारला होता.मुठभर […]

YOU MAY LIKE ..