सावित्रीची लेक…..! डोंबिवलीतील आद. भैैसारे

सावित्रीची लेक…..!

तथागत बुद्धाने महिलांना आपल्या भिख्खू संघात स्थान देऊन पहिलं स्त्रिया चा हक्काचे स्थान निर्माण करू दिले .
पुढे तोच वारसा जिजाऊ ,अहिल्या अन त्यांनतर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून तमाम स्त्रियांचा उध्दाराचा मार्ग दिला . पुढे भारतीय संविधानात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीं त्यांना कायदेशीर अधिकार मिळून दिले आणि खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रिया मुक्त झाल्या .

शिक्षण,आरोग्य, कला ,संस्कृतिक विविध क्षेत्रात आज भारतीय स्त्री अभिमानाने आपली ओळख निर्माण करत आहेत.

यातच जाती च्या उतरंडीत खालच्या जातींतील स्त्रीयांचा संघर्ष फार उत्तबोधक आहे .

आंबेडकरी चळवळीतील स्त्रिया या खूप इतिहास निर्माण करणाऱ्या आहेत .त्या बऱ्याच कष्ट ने आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहचल्या आहेत .

त्याकाळी स्त्रियाना मिळणारी वागणूक आणि सामाजिक विषमता या दोन्ही समाजविघातक प्रवृत्तीविरोधात त्यांना लढावे लागते. त्यांच्या या संघर्षशील जगण्याची आपण या विभागात नोंद घेणार आहोत

गेल्या काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथे सध्या वास्तव्यास असणाऱ्या आंबेडकरी चळवळीत लहानाच्या मोठ्या झालेल्या मूळच्या गोंदिया येथिल असणाऱ्या आद भैैसारे ताई यांची एक प्रेरणादायी गोष्ठ.
वडील सरकारी नोकरीत असल्याने बऱ्याच ठिकाणी लहानपण गेले ,कमी वयात लग्नाच्या बेडीत अडकलेल्या आणि आपली व्यक्तींक जबाबदारी पार पाडत आपले राहिलेले शिक्षण तब्बल ३२ वर्षा नंतर पूर्ण करीत त्यानी वयाच्या ५४ व्या वर्षी B A पूर्ण केले .
म्हणतात ना शिक्षणाला वयाची अट नसते असते ती इच्छाशक्ती. लग्नानंतर PNB METLIFE साठी नोकरी करीत आपल्या तीन मुलांना मोठे करत त्याना योग्य प्रकारे घडवले आज त्यांची मोठी मुलगी MNC मधे मोठ्या हुद्यावर MD म्हणून तर मोठा मुलगा MS करून US मध्ये स्थिर झाला तर दुसरा इंजिनिअर असून NEW Zealand मध्ये मोठ्या पदावर काम करत आहे.

एक स्त्री म्हणून स्वतःतील सामर्थ आणि आपलीज्ञानातील आवड कायम ठेवली आपल्या जीवनात कितीही अडचणी आल्या त्यावर मात करत आपलें कार्य पुढे ठेवण्याची हिंमत त्यांनी बाळगली आज ही त्या PNB METLIFE मध्ये काम करतात. इन्शुरन्स ची IRDA ची परीक्षा मोठ्या मार्कने त्या पास झाल्या .

लहानपणापासून अभ्यासात हुशार असूनही घरच्या परिस्थितीमुळे आपले शिक्षण अपूर्ण राहिले .पुढे संसारात अनेक वेळा कठीण प्रसंग आले त्यातून मार्ग काढत त्या संघर्ष करत राहिल्या आंबेडकरी स्त्रीयमधला शिक्षणा बदल असलेला जागृतीचा अंगार त्यांनि कायम ठेवत ठेवला त्या इतरांना ही शिक्षण घेण्यासाठीं प्रेरित करतात.


स्त्रियांसाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला लढा खूप मोलाचा आणि प्रेरणादायी आहे .स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणारे आणि तोंडात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणारे कित्येक पुरुष स्वतः मनुवाद जोपासत असतात स्त्रियांच्या मान ,अपमान करणे ,लग्नानंतर बायको म्हणजे मुले जन्माला घालायचे मशीन समजून त्यांना वागवले जाते ,तिच्या शिक्षणाचा आदर न करता तिच्यावर वासनेची बाळंतपण ठोकले जाते तिला पुढे करियर ,तिला मोठे करायची हे तर दूर पण तिच्या भावनांचा ही आदर शिकलेल्या लोकांकडून हीन केला जात नाही . लग्नानंतरही मिळालेला जोडीदार जुन्या मनुवादी प्रवृत्तीचाच अनुयायी असतो. ग्रामिण असो की शहरात पुरुषांच्या आजवर अहंकारी स्वभावाच्या कित्येक सावित्रीच्या लेकीं असल्या लोकामुळे समाजापासून वंचित आहेत मोजक्याच स्त्रिया यावर आवाज उठवतात आणि आपल्या विकास करत असताना आपण पाहतो.

त्यांना संगीत ही आवडते ,त्यात त्या रमतात ही असे ही त्या म्हणल्या

भैसारे मॅडम www.ambedkaree.com शी बोलालताना म्हणाल्या की मी खूप या पुरुषी मनुवादा ला विरोध केलाय आणि तमाम समाजातील स्त्रियांनी ही तो विरोध करावा एकीकडे फुले आंबेडकर सांगणारे आमचे लोक घरातील स्त्रियांशी मात्र मनुवाद जोपासत असतात मग कशी होईल सामाजिक क्रांती . त्या आजूबाजूच्या लोकात ही जागृती करत असतात. स्त्रियांनी केवळ चूल ,मूल आणि केवळ घरकाम करावं असे नाही तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात ही पुढे जावे असे त्यांना वाटत आहे कारण स्वतः जो संघर्ष करून आज त्या खंबीरपणे उभ्या आहेत.छोटी मूलं ते मोठ्या व्यक्ती सह सर्वाना बौद्ध साहित्य शिकवने,१०/१२वी त चांगल्या गुणांनी उतीर्ण विदयार्थ्यांना व बक्षिसे देणे, गरजूंना वहया , पुस्तकं, पेनांचे वाटप करणे, पौर्णिमेला वेगवेगळ्या घरात वंदना घेणे, आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती साजरे करणे ह्यासारखे उपक्रम आमच्या मंडळातर्फे केली जातात.त्यात कार्यक्रमात सहभागी घेणे लोकांना सहकार्य करणे आदी काम त्या आजही करत असतात.

त्यांचा उत्साह बघून आंबेडकरी समाजातील ह्यासारख्या असंख्य सावित्री समाजासाठी कार्य करत आहेत म्हणूनच वेगवेगळ्या क्षेत्रात आंबेडकरी अनुयायी आघाडीवर आहेत.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

नागपुरात आदिवासी समाज बांधवांचा सत्ता संपादन मेळावा

सोम सप्टेंबर 2 , 2019
Tweet it Pin it Email काल वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागपुरात आदिवासी समाज बांधवांचा सत्ता संपादन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आदिवासी नृत्य, ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत आदिवासी बांधवांनी पारंपरिक पध्दतीने नृत्य सादर केली. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक पध्दतीने स्वागत केले. Pin it Email https://www.ambedkaree.com/savitrichi-lek-bhaisare/#SU1HXzIwMTkwOTA या मेळाव्यात […]

YOU MAY LIKE ..