६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवसओबीसी बांधवांना आत्मचिंतन करावयाचा दिवस!-राजाराम पाटील


मागासवर्गीय माणसाला त्याच्या व्यक्तिगत जीवनातील यश हे स्वतःचे वाटण्याचा गैरसमज अनेकदा होतो.परन्तु सत्य हे आहे की समस्त स्त्रिया ओबीसी एससी एसटी हे सारे मागासवर्गीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनाचे, लढ्याचे जीवन संघर्षाचे धवल यश आहे.किंबहुना ते दैवी कृपेचे नाहीच नाही, तर देव नाकारणाऱ्या संविधानिक धर्मनिरपेक्षतेचे समतेचे यश आहे. 

आंबेडकरी चळवळ संपली किंवा ही दुर्लक्ष करण्याची गोष्ट आहे ?. असे ज्या मागासवर्गीय राजकीय नेतृत्वाला विचारवन्त आणि कार्यकर्त्यांना वाटते, ते या महान भारतीय संविधांनाच्या शिल्पकार असलेल्या, महामानव डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्याशी कृतघ्न होऊन महापातक करतात.म्हणूनच ६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस ओबीसी बांधवांना आत्मचिंतन करावयाचा दिवस!


मागासवर्गीय आरक्षण विरोधक मराठा जाठ गुर्जर पटेल ब्राह्मण वैश्य यांनी पेटविलेले त्यांच्या संविधान विरोधी आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन, हे 85 टक्के मागास वर्गीयांना खडबडून जागे करणारे,त्यांची कुंभकर्णी झोप उडविणारे आंदोलन ठरले.विशेष म्हणजे आरक्षण मागणारे मराठा ब्राह्मण हे उच्चवर्णीय डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नावच घेत नव्हते उलट अट्रोसिटी हा मागासवर्गीय बांधवांना संरक्षण कवच देणारा कायदा रद्द करा, असे सांगत असणारे मराठे हे मागासवर्ग आरक्षण विरोधी आहेत हे अजूनही बामसेफच्या मा वामन मेश्राम यांच्यासारख्या अभ्यासू राष्ट्रीय नेतृत्वाला ही कळले नाही.याचा सरळ अर्थ आरक्षण संविधान आणि संविधान निर्मात्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांना यांनी नीट जाणले नाही किंवा ते उघड उघड आंबेडकरी विचाराशी म्हणजे या देशाच्या संविधान निर्मात्याशी राष्ट्रद्रोह mकरीत आहेत.


डॉ आंबेडकरांना विरोध करणारे उच्चवर्णीय मनुवादी  ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे सामाजिक न्यायाच्या तत्वाने हजारो वर्षापासून देशद्रोही आहेत हे किमान ओबीसी एससी एसटी आणि भारतीय स्त्रियांना कळायला हवे अशी माझी माफक अपेक्षा आहे.

 
मराठा आरक्षणास पाठींबा देणारे मराठा क्रांती मोर्चे, बामसेफी बहुजन क्रांती मोर्चे 200 आजी माजी मराठा ब्राह्मण आमदार,खासदारआणि गुलाम ओबीसी एससी एसटी आमदार यांनी हेच सिद्ध केले की महाराष्ट्र हे पुरोगामी नाही तर आजही अस्सल मनुवादी सरंजामी जमीनदारांचे भूमाफिया बिल्डरांचे राज्य आहे.मराठा आरक्षणास पाठींबा देताना जो निर्लज्ज पणा आमच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दाखविला आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्सल भारतीय संविधानिक राष्ट्रवादास दिलेली तिलांजली आहे.


म्हणूनच ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर झुकणारी राजकीय सामाजिक मस्तके भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक असावीत अशी माझी ओबीसी कार्यकर्ता म्हणून ६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस ओबीसी बांधवांना आत्मचिंतन करावयाचा दिवस! पाळावा अशी छोटी प्रार्थना विनंती आहे.


मी स्वतः मराठा आरक्षणास आणि ब्राह्मण आरक्षणास विरोध करतोय कारण ते देशाच्या संविधान विरोधी कृत्य आहे.सामाजिक आर्थिक,शासकीय प्रशासकीय लोकशाही भारताच्या राष्ट्र बांधणीचा प्रमुख आधार आहे.क्रांतीबा जोतिबा फुले सावित्रीमाई फुले,शाहू महाराज पेरियार रामस्वामी नायकर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या तत्वाचा सतत पुरस्कार केला.


आपण सर्वांनीच ६ डिसेंबरला या तत्वाचे स्मरण करून पुढील जीवनात त्यांच्या आचरणाचा संकल्प करायला हवा.मागास वर्गाचे आरक्षण उच्चवर्णीयांना देण्याची विषमतावादी अन्यायकारी कुबुद्धी आमच्यात चुकूनही कधी निर्माण होऊ नये यासाठी मन आणि बुद्धीस सतत तेजाने तळपत ठेवणारे बाबासाहेबांचे पुस्तक रुपी विचार आम्ही वाचले पाहिजेत.
राखीव जागांचे तत्व ही विशिष्ट वर्गासाठी सवलत नसून भारतीय प्रजासत्ताक लोकशाहीला परिपूर्ण करण्यासाठी स्वीकारलेले सामाजिक न्यायाचे घटनात्मक धोरण आहे.या बाबीचा विसर अनेकांना पडत चालल्याचे आज सर्वत्र दिसत आहे.किंवा मागासवर्गीय न्यायासाठी प्रसंगी राजे, देव देवळे आणि धर्माचाही विरोध कवटाळण्याचे बाबसाहेबासारखे धाडस धैर्य आमच्यात नाही.


 मंडल आयोगाच्या निर्णयाने 52 टक्के ओबीसी करिता 27 टक्के राखीव जागांचे तत्व मर्यादित स्वरूपात स्वीकारले आहे. अनुसूचित जाती जमाती 22.5 टक्के याकरिता 22 टक्के राखीव जागा आहेत.म्हणजेच (52 टक्के अधिक 22.5 टक्के) एकूण 49.5 टक्के जागा मागास वर्गीयांसाठी राखीव आहेत.उर्वरित 26 टक्के समाजघटकांसाठी 51 टक्के सरकारी नोकऱ्या हे विषम प्रमाण आहे.


ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळाले नसताना त्यात मराठ्यांना आरक्षण द्या असे म्हणणारे राष्ट्रविरोधी आहेतच परन्तु ओबीसींचे नेते म्हणवून घेणारे,त्यात राजकीय फायदे घेणारे अधिक देशद्रोही आहेत. ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण ध्या अशी मते ९९ टक्के ओबीसींचे नेतेच मांडतात याला काय म्हणावे?.ओबीसींच्या नेतृत्वाचा हाच बोगसपणा सर्वत्र आढळतो.शेतकरी प्रकल्पग्रत मच्छिमार लढायांमध्ये वर्तमान नेतृत्व अशा आत्मघाती भूमिका घेत असल्यामुळे ब्राह्मण मराठा राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुबंई ठाणे रायगड अर्थात कोकणाला अक्षरशः लुटले आहे. 


ओबीसी समाजाचे नेतृत्व करतो असे दाखवायचे आणि उच्चवर्णीय शत्रूंना अनुकूल भूमिका घेऊन स्वतःच्याच भावंडाना फसवून करोडपती व्हायचे हा सध्याच्या दलाल नेतृत्वाचा पायंडा घातला गेलाय. यातून तयार झालेले आमचे हजारो कोटींचे भांडवलदार शेठजी झालेले नेते मराठा आरक्षण किंवा सिडको,सागरी सी लिंक,नवी मुंबई विमानतळ,नैना प्रकल्प एसआरए क्लस्टर आणि भूमाफिया बिल्डर यांच्याबाबत अर्थपूर्ण सहमतीची भूमिका घेत आहेत.करोडोंचे ठेके घेत आहेत.त्यांच्या आर्थिक सपन्नतेचा फायदा मागासवर्गीयांना न होता उच्चवर्णीयांना होतोय. 
ओबीसी आरक्षणाच्या लढ्यातील कार्यकर्ते वकील यांना मदत न करणाऱ्या या शेठजीना त्यांची जागा दाखवायची वेळ आलीय.यात आजही ओबीसींची ससेहोलपट चालू आहे.नेतृत्वाच्या प्रामाणिक पणाचा, पंचशीलाचाआदर्श समस्त मागासवर्गीय समाजात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला होता.मागास वर्गीयातील शेवटच्या दऱ्याखोऱ्यातील आदिवासी कोळी बांधवाना न्याय देण्याची नीती ही बाबासाहेबांनीच या देशाला दिली.तोच आदर्श आगरी नेते आदरणीय नारायण नागु पाटील आणि त्यांचे चिरंजीव ऍड दत्ता पाटील यांनी चालविला.लोकनेते दि बा पाटील यांनी सिडको विरोधात आंदोलन याच आदर्शाने चालवले.
आज प्रचंड पैसा साधने प्रसार माध्यमे ओबीसी शेतकऱ्याच्या विरोधात आमचेच सर्वपक्षीय ओबीसी नेते वापरतात. म्हणूनच ओबीसी चळवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालविणे हीच ६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस ओबीसी बांधवांना आत्मचिंतन करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली वाहने होय.

राजाराम पाटील..8286031463.उरण रायगड

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

महापरिनिर्वाण दिन आंबेडकरी "काव्यांजली"

रवि डिसेंबर 6 , 2020
Tweet it Pin it Email ।। तो सूर्यही कधीचा .. ।। -वसंत वाघमारे जगण्यात दंभ का रे, आयुष्य विराम आहेकर कुशल कर्म थोडे, बाकी हराम आहे || पळती कुठेवरी हे, सोडून ज्ञान वाटापाईक हो भिमाचा, ते ज्ञान धाम आहे || व्यवहार थांबले अन, असहाय जीव झालेकैसे विकास होई, विपरीत काम […]

YOU MAY LIKE ..