नागपुरात आदिवासी समाज बांधवांचा सत्ता संपादन मेळावा

काल वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागपुरात आदिवासी समाज बांधवांचा सत्ता संपादन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आदिवासी नृत्य, ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत आदिवासी बांधवांनी पारंपरिक पध्दतीने नृत्य सादर केली. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक पध्दतीने स्वागत केले.


या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय मा.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले नागपूर,गोंदिया, गडचिरोली परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून भव्य असे शक्ती प्रदर्शन आदिवासी बांधवांनी केले.सत्ता संपादनाची वाट ही आदिवासी विकासाच्या मार्गावरून जाते मात्र वेगवेगळ्या पक्षात काम करून ही दखल घेतली जात नाही .याची खंत आदिवासी समाजाला आहे .आदिवासींच्या मूलभूत गरजा आणि त्यांचा रखडलेले प्रश्न यांवर काम करणं काळाची गरज असून भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारणाची अंमलबजावणी करणे गरजेचे .


शिक्षण,नोकरी आणि जमीन हक्क याच्या वर भरपूर काम करण्यासारखे असून मुलाच्या आणि महिलांच्या आरोग्याचा समस्या ही तीव्र आहेत.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन जर आदिवासी समाज जागृत झाला तर एक फार मोठीं क्रांती घडू शकते .

राजकीय दृष्टीने सतत मूळ प्रवाहाच्या कोसो दूर असणारा हा समाज जर आपल्या पूर्णपणे ताकतीने राजकारणात उतरला आणि प्रामाणीकपणे प्रतिनिधित्व मिळाले तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अमूलाग्रह बदल होईल.


सध्या महाराष्ट्रात वांचित बहुजन आघाडी ही आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राजकीय शक्ती उदयास आली आहे काल पर्यंत जे लोक वंचित बहुजन समाजाला बेदखल करत होते ते लोक आता वंचित ने लोकसभेत केलेल्या कामगिरीवरून चकित झाले आहेत.

काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची दाणादाण उडाली असून वंचित एकमेव विरोधी पक्ष आता मान्यप्राप्त होत आहे.वंचित च्या वाटचालीत तळागाळातील सर्व मागास अन उपेक्षित समाजाचा मोठा हात असून जर विदर्भातील आदिवासी समाज वंचितच्या मागे उभा राहीला तर क्रांतिकारक बदल होईल यात शंका नाही.

या कार्यक्रमाला प्रा. हमराज उईके, डॉ निरंजनभाऊ मसराम (अध्यक्ष, गोंडवाना संग्राम परिषद ), कॉ रमेशकुमार गेडाम (अध्यक्ष, आदिवासी संघर्ष सेना ), एड. स्वाती मसराम, तरुमाय मंगलताई ऊईके (गो. ग. पा. ), संतोष बोडखे (अध्यक्ष, आदिवासी युवा पॅन्थर ), डॉ. बळीराम भुरके, नागेश धुर्वे (सचिव, तुडुम देब्बा आदिवासी समाज संघ, तेलंगणा ), भीमराव तुमराम, बळीराम कनाके, राजेंद्र मरस्कोल्हे (अध्यक्ष, अफ्रोड), हरणा मावशी पेजेवाड आदी उपस्थित होते.

वृत्तांकन :
विवेक सोनावने,औरंगाबाद
www.ambedkaree.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

आरक्षण आणि राज्यघटना हटवणे आता सहज शक्य ! : श्यामदादा गायकवाड

सोम सप्टेंबर 2 , 2019
Tweet it Pin it Email आरक्षण आणि राज्यघटना हटवणे आता सहज शक्य ! : श्यामदादा गायकवाड बदलापूर: सरकार कोणत्याही पक्षाचे येवो, राज्यकर्त्यांना देश तर संविधानानुसारच चालवावा लागतो ना, या भाबडेपणातून आणि भ्रमातून वेळीच बाहेर पडा, असे सांगतानाच आरक्षण आणि राज्यघटना या दोन्ही गोष्टी कलम 370 प्रमाणे हटवणे आता कोणत्याही क्षणी […]

YOU MAY LIKE ..