भावनेच्या आहारी न जाता, आपला संयम न सोडता घटनेच्या मार्गानेच हाही लढा जिंकायचा आहे-आद प्रकाश आंबेडकर.

भावनेच्या आहारी न जाता, आपला संयम न सोडता घटनेच्या मार्गानेच हाही लढा जिंकायचा आहे.


१४ एप्रिल, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आत्ताच्या आव्हानात्मक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, नाविन्यपूर्ण पद्धतीने आणि अत्यंत संयमाने आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपण सर्वांनी साजरी केली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आंबेडकरी युवकांनी प्रथमच ‘ऑनलाईन भीम जयंती २०२०’ च्या माध्यमातून आपली कल्पकता आणि तंत्रज्ञानावरील प्रभुत्व दर्शविले. आपण फुले आंबेडकरी समाजाची प्रगल्भता आणि सामाजिक बांधिलकी सर्व देशाला दाखवून दिली

आपल्या सामोर कोरोना मुळे निर्माण झालेली आव्हाने खूप मोठी आहेत. कोरोना पसरण्या बरोबरच लॉक डाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या लाखो कुटुंबाच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि हा प्रश्न लॉक डाऊन नंतरही विक्राळ रूप धारण करेल अशी शक्यता दिसते. आज ह्याची जबाबदारी शासनाबरोबर आपली पण आहे. मी आधी विनंती केल्याप्रमाणे, आंबेडकर जयंती साठी जमा केलेला निधी आपापल्या भागातील दुर्बल घटकांना जगविण्यासाठी वापरूयात.


कोरोना बरोबरच राजकीय पातळीवर सुद्धा आव्हानात्मक परिस्थिती आहेच. भीमा कोरेगाव येथील आंबेडकरवाद्यांवरील हल्ल्याला मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे जबाबदार असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगूनही त्यासाठी मानव अधिकार कार्यकर्त्यांना दोषी धरून अटक करण्यात आली. त्यासाठी खोटे पुरावे रचले गेले. ह्यातच डॉ आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलाखा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एन आय ए च्या स्वाधीन झाले .

भाजप सरकार हे सातत्याने एका बाजूला आपल्या अस्मितेच्या प्रतीकांवर हल्ला करून ती मोडीत काढण्याचा आणि दुसर्‍या बाजूला आपल्या उपजीविकेची साधने हिरावून घेत आहे. हा लढा दीर्घकालीन आहे आणि तो ही आपल्याला नंतर लढावाच लागणार आहे. राज्यघटना आणि न्यायालयावर आपला विश्वास आहे आणि तो विश्वास कायम ठेवूनच आताच्या महाकठीण परिस्थितीवर लक्ष केंद्रित करूया.

१४ एप्रिल हा दिवस भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान आहे. भारतातील सर्वच स्तरातील नागरिकांच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारा आनंद निर्माण करणारा हा दिवस. त्यामुळे हा दिवस कायम एक आनंदाचा सोहळा म्हणूनच साजरा केला गेला पाहिजे. राजगृहावर काळे फडके फडकावल्याचा मुद्दा सोशल मिडिया आणि प्रसार माध्यमांतून जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला गेला. त्याला कुणीही वेगळ्या प्रकारे विचारात घेऊ नये किंवा कोणत्याही प्रकारे काळा दिवस असल्याचे मानता कामा नये.

बाबासाहेब म्हणाले तसे आपल्याला “भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही” विरोधी- विशेषतः आताच्या संदर्भात फ़ॅसिस्ट शक्तीच्या विरोधात खुप विचारपूर्वक लढत द्यावी लागेल. या शक्तींच्या कायम विरोधात उभ्या राहिलेल्या देशभरातील आंबेडकरी शक्तीला, तरुणांना भावनिक बनवून, भडकविण्याचे प्रयत्न केल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक सुरु आहेत आणि गेल्या काही दिवसात ते अधिक प्रखर झालेले दिसत आहेत. ही आपल्या सर्वांच्या परीक्षेची वेळ आहे. म्हणून कोरोना विरुद्धच्या लढ्यावर संपुर्ण लक्ष देत या ब्राह्मणी-फ़ॅसिस्ट शक्ती आणि भांडवली शक्तींविरुद्धची लढाई संविधानाच्या आणि संसदीय राजकारणाच्या चौकटीत तीव्र करत तुरुंगातील आनंद तेलतुंबडें आणि इतर सर्व मानव अधिकार कार्यकर्त्याना अडकवण्या-या सामाजिक-राजकीय शक्तींना हरवू या.


मात्र फुले-शाहू-आंबेडकरवादी शक्तींनी कधिही भावनेच्या आहारी न जाता, आपला संयम न सोडता घटनेच्या मार्गानेच हाही लढा जिंकायचा आहे. कोणत्याही प्रकारच्या भावनिक आवाहनांना आणि कोणत्याही भावनात्मक प्रचाराला बळी पडू नये. वंचित बहुजन आघाडीची भूमिका किंवा कृती कार्यक्रम हा पक्षाच्या अधिकृत वेबसाईट, बाळासाहेब आंबेडकर फेसबुक पेज (official with blue tick) आणि पक्षाच्या लेटरहेड वर जाहीर केला जाईल.

अॅड प्रकाश आंबेडकर

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

क्रांतिकारी विचारांची भिम जयंती घराघरात साजरी झाली.

शनी एप्रिल 18 , 2020
Tweet it Pin it Email क्रांतिकारी विचारांची भिम जयंती घराघरात साजरी झाली. Pin it Email https://www.ambedkaree.com/advprakashambedkar-anandteltumbade/#SU1HXzIwMjAwNDA Pin it Email https://www.ambedkaree.com/advprakashambedkar-anandteltumbade/#SU1HXzIwMjAwNDE कोरोना महामारीचे राष्ट्रीय संकट यावेळी एप्रिल महिन्यात आल्यामुळे अनेक लोकांना गुरु शिष्याची जयंती साजरी करण्याची संधी मिळणार नाही अशी शंका होती.११ एप्रिल महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले, १४ एप्रिल विश्वरत्न डॉ […]

YOU MAY LIKE ..