थोर तुझे उपकार महात्मा!!

थोर तुझे उपकार महात्मा!!!

थोर तुझे उपकार महात्मा ,थोर तुझे उपकार,
जन्म घेवुनी झिजलासी तु करण्या परोपकार.

शेंणशिंतोडे कर्मठांची,झेललासी दगडमाती,
उध्दारण्या बहुजन शुद्रादीशुद्र भारतज्ञाती.

कसब ब्राम्हणाचे,गुलामगीरी,अखंड,आसुड शेतकर्‍यांचा,
सत्यशोधण्या मानवतेचे विनाश केला धर्मांध विषमतेचा.

दिले ज्ञान अंधकार करण्या,दूर दुरितजनांचा,
कोटी कौटी हृदयात चेतला ज्वाला विद्रोहाचा.

कोण शिवाजी ? कोणता राजा ?काय कुणाला ज्ञात ?,
तुच शोधलेस मुळतयाचे, पवाडे अखंडित स्वराजाचे गात.

वेद पुराण फेकले तु, तू खुले केले बंद पाणी,
विद्रोहाचे मुळ तु समतेचा अन ममतेचा मेरुमणि.

आज करितो विनम्रपणे प्रणाम तव स्मृतीस,
नसे तोड जगती महात्मा तव महान कार्यांस..!.

——प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

आगरी कोळ्यांची एकविरा मातृसत्ताक संस्कृती!

रवि नोव्हेंबर 29 , 2020
Tweet it Pin it Email सागरपुत्र आगरी कोळी कराडी भंडारी स्त्रिया शेती आणि मासेमारीच्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत.किंबहुना घराघरात मातृसत्ताक स्त्रीसत्ताक विचारधारा आजही पहायला मिळते.साऱ्या देशात आणि महाराष्ट्रात स्त्री अत्याचारांच्या कथा आणि व्यथा ऐकायला येत असताना मनुस्मृतीच्या विरोधातील सत्य सुन्दर संविधानिक जगणे हजारो वर्षे जेथे पाहायला मिळते. ती […]

YOU MAY LIKE ..