मनुस्मृती आणि संविधान !! – मनुस्मृती दहनाचा वर्धापन दिन !!

मनुस्मृती आणि संविधान !! आजचा दिनविशेष- आज दि. २५ डिसेंबर, मनुस्मृती दहनाचा वर्धापन दिन !!

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून पुस्तकांवर खूप प्रेम करत होते. नंतर त्यांनी आपल्या पुस्तकांवरील प्रेमाखातर पुस्तकांसाठी राजगृह हे घर बांधले. परंतु याच पुस्तकप्रेमी विद्वानाने २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे कोट्यावधी पददलित जनतेला हीन समजणारया विषमतावादी मनुस्मृती या पुस्तकाचे दहन करून क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली होती.

काय होते या मनुस्मृती मध्ये जाणून घेऊन या भारतीचे संविधान आणि मनुस्मृती यामधील फरकातून:-

१) मनुस्मृती:- [1.31, 429, 499] निच ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र हे जन्मत: `असमान` आहेत. कारण,

ब्राम्हणोस्य मुखमासीद बाहू राजन्य कृत्य:।
उरु तदस्य यह वैश्य: पदभ्यां शुद्रो अजायत॥

अर्थ – ब्राम्हणांचा जन्म ब्रम्हाच्या मुखातून झाला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहुतून, वैश्यांचा जन्म मांडीतून आणि शुद्रांचा जन्म ब्रम्हाच्या पायातून झाला आहे.

संविधान:- [कलम 14.] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक `समान` आहेत. त्यांचा धर्म,वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या कारणावरून
भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही.


२) मनुस्मृती:-[99, 98, 1.91] कपटी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार चार वर्णातील लोकांना सरकारी नोकरी मिळविण्याचा समान अधिकार नाही.
शुद्र व्यक्ती न्यायधिश बनू शकत नाही व ब्राम्हणांशिवायशिक्ष­कीपेशा कोणीही करु शकत नाही.

संविधान:- [कलम 16] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना जात, धर्म, वंश, जन्म किंवा भाषा याची कोणतीही अडचण न आणता
सरकारी नोकर्‍या मिळविण्याचा समान संधी देते.

३) मनुस्मृती:- .[1.88, 98, 90, 130] लबाड ब्राम्हणी मनुस्मृती नुसार ब्राम्हणांशिवायअन्य कोणालाही स्वातंत्र्य नाही, व्यवसाय करण्याचेही स्वातंत्र्य नाही. प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेले,
ब्राम्हण शिक्षण घेणार, यज्ञ करणार, क्षत्रियांनी राजकारभार करावा, वैश्यांनी व्यापार करावे. आणि शुद्रांनी या सर्वांची सेवा करावी.

संविधान:-[कलम 19] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल केली आहेत. त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती,
भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, रहाण्याचा व स्थायिक होण्याचा तसेच कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क असेल.

४) मनुस्मृती:- [अध्याय 715, 716] धुर्त ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना गुलाम बनविले जाऊ शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत ब्राम्हणांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही.

संविधान:- [कलम 23] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधान सांगते की, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. कोणत्याही परिस्थितीत माणसांना विकता
किंवा विकत घेता येत नाही. किंवा त्यांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही. याचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.

५) मनुस्मृती:- [1.88, 89, 90, 91] ढोंगी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार फक्त ब्राम्हणांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही.

संविधान:- [कलम 21ए] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार या कलमान्वये शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. राज्य हे, सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यँतच्यासर्व
मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व सक्तीचे शिक्षण देईल.

६) मनुस्मृती:- [1.100, 10, 129] विदेशी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण जगातील सर्व संपत्तीचा मालक आहे. शुद्र कितीही लायक असला तरी त्याला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही.
कारण शुद्राने संपत्ती जमा केल्यास ब्राम्हणांस त्रास होतो.

संविधान:- [कलम 300 क] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही`.
कायद्याने कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपत्तीच्या अधिकारापासून परावृत्त केले जाऊ शकत नाही. त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे.

७) मनुस्मृती:- [मनुस्मृती 8.276] युरेशियन ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार शुद्राने ब्राम्हणाची निंदा केल्यास त्याची जीभ कापावी, परंतु तोच अपराध ब्राम्हणांनी केल्यास त्यास राजाने कमीत
कमी शिक्षा द्यावी.

संविधान:- परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्या दुसर्‍या व्यक्तीची निंदा, भाषा किंवा लिखीत स्वरुपात केली असल्यास
त्यास प्रचलीत कायद्यानुसार दोन वर्षाची सजा किंवा जुर्माना किंवा दोन्ही सजा दिल्या जाते.

८) मनुस्मृती:- [8. 359] आर्य ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण स्त्री बरोबर कोणी व्यभीचार केल्यास त्यास मृत्यूदंड द्यावा परंतु ब्राम्हणाने क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांच्या स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास फक्त रु. 500 पण सौम्य दंड करावा.

संविधान:- मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल.आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही कोणत्याही स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास पाच वर्षाची शिक्षा व जुर्माना किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातात.

९) मनुस्मृती:- [11.127, 129.30, 10.381] भट ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हणाच्या हत्येची शिक्षा फक्त मृत्यूदंड आहे. परंतु ब्राम्हणाने कोणाची हत्या केल्यास त्याला मृत्यूदंडाची
शिक्षा करता येत नाही कारण ब्राम्हण हत्येपेक्षा मोठा अपराध पृथ्वीतलावर नाही. त्यामुळे राजाने ब्राम्हण वधाचा विचारही मनात आणू नये.

संविधान:- परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल. आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार हेतु पुरस्पर हत्या केली असल्यास त्याच्या या कृत्याला मानव हत्त्या समजून त्यास मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास या शिक्षा दिल्या जातात.

आपली राज्यघटना जगात वंदनीय आहे. आपल्या राज्यघटनेमुळे राजेशाही, सरंजामशाही नेस्तनाबूत झाली. राज्यघटनेमुळे सर्व समाज व बहुजनांमध्ये आमूलाग्र बदल झाला. एकेकाळी मनुस्मृतिनुसार सती जाणारी स्त्री आज देशाची पंतप्रधान अथवा राष्ट्रपती बनू शकते. ही व्यवस्था बदलण्याचे काम राज्यघटनेमुळे झाले आहे. सामाजिक सुधारणा व सामाजिक परिवर्तन ही राज्यघटनेची देणगी आहे. संविधानामुळे राणीच्या पोटी जन्माला येणारा राजा मतपेटीतून जन्माला येऊ लागला.परंतु स्वातंत्र्याचे सुराज्य झाले नाही. कारण त्यांच्या पोटात मनुस्मृती व ओठात संविधान या बाजिंदेपणामुळे राष्ट्रीय विकास झालाच नाही. राजकीय व प्रशासनव्यवस्थेमुळे सामान्यांच्या विकासात अडथळे येत आहेत. त्यामुळे राजकारण व प्रशासन व्यवस्थेतही त्या दृष्टिकोनातून बदल घडायला पाहिजेत.

मनुस्मृतीचे समर्थक असणार्‍यांच्या मनातून मनुस्मृती अजूनही जात नाही. त्यामुळे देशात रोज अनेक अविपरीत घटना घडत असतात. त्यासाठी भारतीय संविधानाची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे . तरच या देशात स्वांतत्र्य, समता, बंधुता, न्याय व विज्ञान या पंचसूत्री वर आधारित भारत निर्माण होईल.

मनुस्मृतीने स्त्रिया आणि शुद्र ह्या दोघांना जनावरापेक्षा खालची वागणूक द्यावी हे लिहिले आहे, आजही शिकल्यासवरलेल्या स्त्रिया मुली मासीक पाळीत स्वयंपाक घरात जात नाहीत, देवळात जात नाहीत, आजही वयाच्या तिशीत विधवा झालेल्या मुलीना अगदी घाणेरडी स्थळे येतात, मात्र घटस्फोटीत मुलाला जॉब चांगला असला तर प्रथम वधु मिळते, पण मुलीना घटस्फोटीत किंवा विधुर हेच पर्याय असतात. कौमार्याचा इतका बावू करून ठेवलाय कि बास. मुलगी झाली तरी स्त्रीला दोष, वाईट घडलं तरी तीच पांढर्‍या पायाची असं सांगते मनुस्मृती. बहुजनांना न्याय द्यायचा असेल तर भारतीय संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी गरजेची आहे. वरिष्ठ नोकरशहा हा कनिष्ठांना व सामान्यांना हीनतेची वागणूक देत आहे. सोशल वर्णाश्रमाची मनुवादी व्यवस्था पद्धती प्रशासनामध्ये आहे. पोटात मनुस्मृती व ओठात संविधान या वृत्तीमुळे राष्ट्रीय विकास झालाच नाही.शासन व्यवस्थेत वरिष्ठ नोकरशहा हे नियंत्रित कार्यसंस्कृतीचाअवलंब­ करतात. त्यामुळे प्रशासनात व या कार्यसंस्कृतीत बदल घडवला पाहिजे. राजकीय नेतृत्वाने हे ध्यानात घेऊन बदल घडवले पाहिजेत. ‘भारतीय संविधान आणि शासनव्यवस्था किती जवळ, किती दूर?’ हे बहुजनांनी समजून घेतले पाहिजे.

मनुस्मृतीने स्त्रीदास्याचा सातत्यानेच पुरस्कार केलेला आहे आणि त्याचा प्रभाव जनमानसावर टिकून आहे. मनुस्मृतीच्या प्रभावामुळे आजच्या विज्ञान युगामध्येदेखील स्त्रियांवर पाशवी अन्याय अत्याचार होताना दिसून येतात. मनुस्मृतीचा अभ्यास करून, तिची निरर्थकता पटल्यानंतर भारतातील ज्या विद्वानांनी मनुस्मृतीला कचराकुंडीचा रस्ता दाखविला त्या विद्वानांपैकी प्रबोधनकार ठाकरे हे एक आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ” मनुस्मृती हा ब्राह्मण्याचा एक दैवत ग्रंथ होऊन बसला आहे. कोणत्याही आत्मविश्वासू , स्वावलंबी आणि अतुल पराक्रमी राष्ट्राला गुपचूप हतबल करून त्याच्या पायांत गुलामगिरीच्या अभेद्य श्रृंखला ठोकायच्या असतील तर त्याला नित्य मनुस्मृतीचे डोस ढोसण्यास द्यावे. हटकून ते राष्ट्र नामर्द, परावलंबी आणि पतीत झाल्याशिवाय राहणार नाही.” प्रबोधनकारांच्या वरील उद्गारावरून देशाभिमान, राष्ट्राभिमान आणि राष्ट्रभक्तीचा डांगोरा पिटणार्‍यांच्याडोळया­त अंजन घातले जाईल काय ! खर्‍या अर्थाने आपल्या राष्ट्राला नामर्द, पतीत आणि परावलंबी बनवायचे नसेल तर देशातील स्वाभिमानी वीरांनी प्रथमत: मनुस्मृतीला गाडून टाकणेच आवश्यक आहे. प्रबोधनकारांचे हे विचार आजही प्रेरणादायी आहेत. निधर्मी समाज आणि निधर्मी राज्य ह्या तत्त्वाला प्रबोधनकारांनी मान्यता दिलेली आहे.थोडक्यात प्रबोधनकारांच्या सामाजिक विचारांमध्ये वर्तमान काळाच्या गरजांची पूर्तता करण्याची क्षमता आहे.

मनुस्मृतीने ज्या वर्गाच्या आणि जातीच्या हितसबंधाचे रक्षण केले, त्या वर्गाचा जळफळाट होत आहे. मनुस्मृती आणि भारताची राज्यघटना ही दोन ध्रुवाची दोन टोके आहेत. मनुस्मृती विषमतेचा पुरस्कार करते तर भारताची राज्यघटना समतेचा पुरस्कार करते त्यामुळे मनुस्मृतीच्या समर्थकांना भारताची राज्यघटना सोसवत नाही. ती त्यांच्या डोळयात कुसळाप्रमाणे एकसारखी सलत आहे. म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. भारतीय संविधान आणि मनुस्मृती यातील फरक लक्षात घेवून बहुजन समाजाने आपला शत्रु कोण व मित्र कोण आहे हे ओळखावे. आता मनुस्मृतीप्रमाणे नव्हे, तर भारतीय संविधान याप्रमाणे आपली वाटचाल सुरू ठेवावी. मनुस्मृती दहनाचा इतिहास आठवावा. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.


स्त्री मुक्ती दिनाला … मनूस्मृती दहन दिनानिमित्त क्रांतिकारी सलाम… विषवल्ली रोवणाऱ्या मनूस्मृतीची विषारी रोपटे मुळासकट उपटून काढत संवैधानिक प्रशासनाचा पाया रचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन ..!

लेखक- श्रीराम पवार प्रबोधन टीम या ब्लॉग वरून सभार

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

वंचित चे केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू

गुरू डिसेंबर 26 , 2019
Tweet it Pin it Email Pin it Email https://www.ambedkaree.com/indianconstitutionandmanusmruti/#RkJfSU1HXzE1Nzc मुंबईत होणाऱ्या एनआरसी-सीएए कायद्याविरोधी वंचित बहुजन आघाडी, समविचारी संघटनांच्यावतीने दादर येथे धरणा आंदोलनाची सुरुवात झालीय लाखो लोकांची गर्दी जमा झालीय तरुणांची उपस्थिती लक्षणीय असुन महिला वर्ग ही आघाडीवर आहे . वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सर्वेसर्वा आद बाळासाहेब आंबेडकर यांनी धरणे […]

YOU MAY LIKE ..