जातीय मानसिकता संपणार कधी?

कारोनाच्या महामारीच्या काळात अख्खे जग संकटात आहे.देशात सर्वत्र हाकार उडालाय,महाराष्ट्र राज्यातील असा एकही जिल्हा तालुका नाहीय कितीथे कारोना पसरला नाहीय. या संकटाचा सामना सर्वसामान्य जनता ,सरकार आपल्यापरीने करीत आहे .कित्येकांना आपल्या जीवलगना गंमवावं लागलेय,कित्येक लोकांचे संसारात उध्वस्त झालेत तर कित्येक लोक बेकारीची खाईत ढकलले गेले. अखा देश च्या सांस्कृतिक,सामाजिक आणि आर्थिक खूप हानी झालीय अजून ही कारोना संकट संपलेले नाहीय.त्यातच नवनव्या त्याच्या प्रजाती नव्याने समोर येत आहेत व पुन्हा पुन्हा ह्या आजाराचे बळी वाटत आहेत.

जातीय मानसिकता संपणार कधी?

मात्र ही गोष्ट घडत असून ही महाराष्ट्रातील काही जातीय लोक आपल्या जातीय मानसिकतेतून बाहेर येत नाहीये.गेले कित्येक दिवस महाराष्टात अनेक जातीय अत्याचार वाढत आहेत कधी अंतर जातीय लग्न केल्याने तर कधी सार्वजनिक विहीरीवर पाणी पिल्याने -तर कधी देवळात देवदर्शन घेतल्याने तर एखाद्या दबलेल्या अब्रुचे लचके तोडल्याने कित्येक लोकांचे संसार ह्या जातीय मानसिकने उध्वस्त केले आहे व होत आहेत.हजारो पिढ्यांची मानसिकता अजून बदलत नाहीय हेच या फुले शाहू आंबेडकर यांचे उठसुठ नाव घेणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रतात घडत आहे .

अन्याय झाला की दलित,बौद्ध नेते आपल्यापरीने आवाज उठवण्याची काम करतात त्यांच्या आवाजाने तिथली प्रशासन व्यवस्था जागी होते मात्र पुन्हा तीच घटना आणखीन दुसऱ्या ठिकाणी उपन्न होते .

हे आणखीन किती दिवस चालणार ?

कोणत्याही सरकारला याचे काहीच का भान नाहीय.ज्या प्रशासन सेवेतील लोक काम करतात त्यांना काहीच का वाटत नाहीय कारण त्यांना ह्याची होत नाहीय का ?

काल परवा पुन्हा एकदा परभणीच्या खेरडा गावात कोण्या एका माजोर जातीयवादी पाटलाने महार असा उल्लेख करत वस्तीत पाणी देण्यास मज्जाव केलाच उलट आई बहिणिना माझ्याकडे आणा असे म्हणत अब्रुला हात घातला. आया बहिणी जाहिरपणे उघड्या करणाऱ्या ह्या मानसिकतेला कोणती शिक्षा करावयास हवी? की असल्याना उभा महाराष्ट्र डोक्यावर घेणार आहे काय?

काय आहे हे प्रकरण ?

Fb वर हा व्हिडीओ पोस्ट झाल्यावर त्या परभणीच्या खेरडा गावात बौद्ध वस्तीला पाणी हवे असल्याचे बोलत आहेत मात्र त्यावेळी पाटील नावाचा हा व्यक्ती ग्रामपंचायतचा सदस्य असून तो पाणी देण्यास मज्जाव करत आहे उलट जातीवाचक बोलून महिलांच्या अब्रु वर बोलत आहे. कुणी तरी हा विडिओ काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.





पँथर सेनेचे लढाऊ पँथर दिपक भाऊ केदारे यांनी हे प्रकरण धसास लावून धरले आहे सोशल मीडिया वरून हे प्रकरण आता व्हायरल झालेय महाराष्ट्रांतील तमाम आंबेडकरी बण्याचा तरुण ह्या नामर्द लोकांना जाब विचारू शकतो असे मात्र कायद्याच्या चौकडीत असणाऱ्या सर्व शक्यता संपल्यानंतर त्यासाठी आता रान उठवला हवे. असे कित्येक आंबेडकरी तरुण म्हणत आहेत.त्यांनी ह्या प्रकरणात दोषी असणाऱ्या पाटलाला मोक्का लावावा अशी पत्रकार परिषदेत मागणी केली आहे अन्यथा भीमसैनिकाचा उद्रेक होईल असे म्हटले आहे

.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4196212253770472&id=100001452166403

प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जातीयवाद संपवू शकतील का?

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आहेत ज्या प्रबोधनकार ठाकरे यांना तमाम आंबेडकरी समाज आपले आदर्शवत मानतो त्यानी अख्खे आयुष्य सामाजिक समतेसाठी अर्पण केले त्यांच्या वारसा असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकारी मंत्री महोदयांनी ह्या प्रकरणात लक्ष घालावे असे वाटते. असे ही लोकांना वाटत आहे कारण खेरडा येथील माजोर पाटील हा शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता आहे..ही घटना घडल्यावर। दुसरीकडे असेच आंबे झाडावरून काढल्याने एका मुलाला अमानुष मारहाण करण्यात आलीय .

जातीय मानसिकता संपणार कधी?

मात्र मूळ मुदा अजून महाराष्ट्र ह्या जातीय मानसिकतेतून बाहेर पडत नाहीय.शहरातील मानसिकता थोडीबहुत बदलली असली तरी ह्या मानसिकतेची पाळेमुळे ग्रामीण व्यवस्थेत आहेत आणि तीच व्यवस्था बदलत नाहीय.राज्य सरकार कोणत्याही पक्षाचे ,आघाड्यांचे असो जातीय अत्याचार होण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. हे फार घातक आहे .जेव्हा सहनशीलता संपेल तेव्हा विद्रोहाची ठिणगी पडेल त्यावेळी पेठणारा महाराष्ट्र बघण्या अगोदरच अशा मानसिकतेला वेळीच ठेचून काढा.असे ही आंबेडकरी जनतेचे म्हणणे आहे.ह्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी आघाडीवर असणारे युवा नेतृत्व लढाऊ दीपक केदारे आणि सहकारी ह्यांचे आंबेडकरी तरुण मनापासून अभिनंदन करीत आहेत.

-प्रमोद रा जाधव www.ambedkaree.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

१० वी -१२वी नंतरच्या देश विदेशातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध संधी-ऑनलाइन वेबिनार

शुक्र जून 11 , 2021
Tweet it Pin it Email कारोना महामारीत समाजातील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान झालेय आता शासनाने दहावी-बारावी च्या परीक्षा रद्द केल्या व सर्वाना पास केलेय .सर्वांनाच विविध क्षेत्रात आपले करियर कार्याचे आहे मात्र याची सविस्तर माहिती मिळत नाही यासाठी पुढे कशी वाटचाल करायची ,विविध कोर्सेस ,विविध स्कॉलरशिप तसेच देश विदेशात शैक्षणिक […]

YOU MAY LIKE ..