हर्दखळे बौद्धजन संघ रजि मुंबई ने खाजगी कंपन्यात काम करणाऱ्या आपल्या सभासदांना जवळपास पन्नास हजारांची केली आर्थिक मदत

हर्दखळे बौद्धजन संघ रजि मुंबई ने खाजगी कंपन्यात काम करणाऱ्या आपल्या सभासदांना जवळपास पन्नास हजारांची केली आर्थिक मदत .
◆◆◇◆◆◆◆◆◆◆◆●●●●●●●◆◆◆◆●●◆●●●●●●
किरण तांबे www.ambedkaree.com
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆●●●●●●●●●●●●

कोकणातील सामाजिक विकासाचे केंद्र म्हणजे भावकी ..! आणि भावकी म्हटले की आले गट तट व विविध जुनाट परिपरा . त्यात आता बदल झालेत पण लोकांनी त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला नाहीय. कोकणात लग्न लावणे,दिवंगत माणसांचे कार्य करणे आणि गावच्या न झालेल्या विकासाच्या विषयांवर वर्षोनुवर्षे मुंबईतील सार्वजनिक गार्डनमध्ये व मैदानावर बैठका घेणारे कोकणी .

मात्र आता पिढ्या बदलत आहेत आणि तरुण कार्यकर्ते यांनी ठरविले तर आपल्या नव विचाराने क्रांतिकारक बदल व ऐतिहासिक कार्य नकळतपणे करू शकतात.

आतापर्यंत कोणतेही संघटन हे वर्गणी काढत असते त्याचे नंतर काय झाले याचा अहवाल काढून चर्चा घडतात मात्र एखाद्या छोट्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याच सदस्यांना आर्थिक मदत केल्याचे ऐकिवात नाही.

नेमके हेच कार्य कोविड 19 च्या प्रादुर्भावात ग्रामीण आणि मुंबईतील खाजगी काम करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या आपल्या सदस्यांना आर्थिक मदत केलीय .

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले निश्चित ध्येय धोरणे आखून येणाऱ्या पिढ्याना पारदर्शक विकासात्मक ,वैचारिक आणि सामाजिक जाणिवेतून घडविण्यासाठी त्यांच्या
धार्मिक,सामाजिक ,सांस्कृतिक आणि आर्थिक विकास घडविण्याचे ध्येय ठरवून अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत आपल्या सामाजिक कार्याची समाजाला दखल घेण्यास भाग पडणारी हर्दखळे बौध्दजन संघ (नोंदणीकृत)मुंबई/ग्रामीण ही भावकी संघटना. संस्थेच्या विविध तरुण तडफदार व सामाजिक क्षेत्रात विविध ठिकाणी कार्यरत असणारे तिचे सभासद यांनी आपल्या गावातील समाजासाठी विधायक कामे ह्या संघटनेच्या माध्यमातून करत आहेत.

संघटनेच्या ह्या उपक्रमाबाबत संघटनेचे अध्यक्ष मा सचिन व जाधव उपाध्यक्ष मा लक्ष्मण दा जाधव , कार्याध्यक्ष मा अंनत गुणाजी जाधव आणि सरचिटणीस मा शरद शं जाधव ,खजिनदार मा प्रमोद रत्नाकर जाधव आणि सर्व कार्यकर्ते यांनी सर्व सभासद व सल्लागार यांना आवाहन केले त्यांच्या आवाहनाला संघटनेच्या सभासदांनी पाठिंबा देत आपल्या बंधूंसाठी धम्म दान देण्याचे सुरू केले आणि त्यामुळेच हे ऐतिहासिक कार्य घडून आले .

मदतीचा पहिला टप्पा हा मुक्काम पोस्ट हर्दखळे तालुका लांजा येथील सभासदांना मदत करून सुरू करण्यात आला व त्यानंतर मुंबई येथिल सभासद यांचा विचार करून योजनाबद्ध उपक्रम राबविण्यात आला याचा संपूर्ण नियोजन सरचिटणीस शरद जाधव हे योग्य प्रकारे अध्यक्ष सचिन वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते .


त्याच संघटनेचे सल्लागार सदस्य प्रमोद रामचंद्र जाधव यांनी मांडलेलं मत

आम्हा खाजगी कंपनी मध्ये काम करणाऱ्या सदस्यांना आपण जी मदत केली त्याचे शब्दांत आभार व्यक्त करणे अशक्य आहे मदत ती किती आहे व कशी आहे हे महत्त्वाचे नाहीय पण मदत करतांना संघटनेच्या वतीन आपण राबविलेल्या।ह्या मंगल कार्याचा भविष्यात संघटनेला खूप मोठा फायदा होणार आहे .”

“संघटन नेमके कशाला हवे आणि त्याचा समाजाला उपयोग काय ? या प्रश्नांची खरी उत्तरे आपण ह्या दान कार्यातून दिलीत .”

“तथागत बुद्धाची शिकवण आणि मार्ग व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कृतिशील क्रांतिकारक विचार जर आपण अंगिकारले की छोट्या छोट्या कार्यातून कधीही न घडलेले ऐतिहासिक मोठे कार्य घडू शकते ह्या नवं संघटनेच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे .”

या साठी हा “ऐतिहासिक” निर्णय घेणारे “अध्यक्ष /कार्याध्यक्ष /सेक्रेटरी आणि त्यांचे कार्यकर्ते व सल्लागार” तसचे त्या निर्णयाच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे मान्यवर सदस्य यांना लाखमोलाच्या शुभेच्छा आणि नभूतो निर्णय घेऊन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत तो यशस्वी करणे हे जिकरीचे कार्य केले .ज्या मान्यवर सदस्यांनी या कार्याराठी मोठ्या मनाने धम्म दान दिले त्याचे ही मंगल होवो.”

“ज्या सद्यस्थितीत महापालिका कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन कोरोना युद्धात उतरून ही आपल्या बंधूप्रति त्यांनी दाखवलेली करुणा नक्कीच त्यांना यशाच्या आणि प्रगतीच्या शिखरावर नेईल.आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा.बंधुनो हे कार्य करताना आपण आपल्या तब्येतिची व परिवाराची काळजी घ्या हीच नम्र विनंती.”

प्रमोद रा जाधव हे या संघटनेचे संस्थापक सदस्य असून ते माहिती व प्रसारमाध्यम सल्लागार आहेत.त्यांच्या सारख्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मात्र टाळेबंदीत हतबल झालेल्या संघटनेच्या सदस्यांना अर्थीक मदत देऊन संघटनेने आपली सामाजिक जाणीव तीव्र असल्याचे दाखवून दिले .सोशल मीडियावर ह्या घटनेची दाखल मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहे.

शब्दांकन
किरण तांबे – बदलापूर

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

शाहु महाराज बौद्धांचे कोण लागतात?

शुक्र जून 26 , 2020
Tweet it Pin it Email शाहु महाराज बौद्धांचे कोण लागतात? *********************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com *********************** Pin it Email https://www.ambedkaree.com/hardkhalebaudhajnsangh%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%884/#SU1HXzIwMjAwNjI ऊसापोटी कायसही जन्मत असतो. तसेच दुर्दैव उदात्त विचारांच्या वेलींच्या वा चळवळींच्या वाट्यालाही येत असते. क्रांतीबा फुले,शाहू महाराज यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावविश्वातून, वैचारिक जडणघडणीतून कदापि बाद करता येणार […]

YOU MAY LIKE ..