आत्मसन्माची ऐतिहासिक लढाई…!

“आत्मसन्माची दोनशे वर्षापूर्वीची ऐतिहासिक लढाई….!”.

जातीय अत्याचार पेशवाईत कितीही शौर्य,ताकत व सर्व काही असलेले तरीत्यांना समानतेची,माणुसकीची वागणूक दिली जात नव्हती .प्रचंड अपमान,अवहेलना व स्पर्श,सावली,पाणी याचा ही विटाळ होता असा समाज की तो छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्यात मोठया प्रमाणात होता नंतर तो पेशव्यांच्या ही सैन्यात होता पेशव्यांनी त्यांना अत्यंत हीन वागणूक दिली.

याच सैनिकांनी दोनशे वर्षांपूर्वी लढलेली लढाई. आज प्रेरणादायी झालीय. लढवाव्या महार समाज अस्पृश्य होता.पेशव्यांनी धार्मिक बंधनात जखडून ठेवले होते.जेव्हा आत्मसन्मान जागा झाला आणि तो मग रणभूमीर लखलखत्या समशेरितून उतारला ही घटना दोनशे वर्षांपूर्वीच्या एका युध्दाची….!!!

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या शूर सैनिकांना मानवंदना देण्यासाठी येत असत कारण ज्या सैनिकांनी आपली प्रथम आत्मसन्मानाची लढाई लढून येणाऱ्या पिढीला आपला स्वाभिमान जागृत करण्याची प्रेरणा दिली.


या युद्धात पाचशे महार सैनिकानी पेशव्यांच्या सैन्याची धूळधाण केली अन जातीवादी,अत्याचारी पेशवाई संपली.

कोरेगाव भिमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशवे मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. इ.स. १८०० च्या दशकांत मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांत विभागलेले होते. त्यात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे विखुरलेले कमकुवत साम्राज्य होते. ब्रिटिश साम्राज्याने ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी तह करून त्या त्या संस्थानांचा भाग आपल्या राज्याला जोडला होता.

१३ जून इ.स. १८१७ रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरून वाद झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली. व बडोदा संस्थानाचा मोठा भाग पेशवाईत समाविष्ट केला. परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यास जोडला. यामुळे मराठा साम्राज्य ब्रिटीश अधीनस्त झाले आणि पेशवे केवळ नामधारी उरले. अल्पावधीतच पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याच्या प्रयत्नात खडकीची लढाईत केली परंतु ब्रिटिशांनी तेथेही पेशव्याचा पराभव केला. ही लढाई ५ नोव्हेंबर इ.स. १८१७ रोजी झाली होती. त्यानंतर पेशव्यांनी तेथून साताऱ्याला पळ काढला आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावर ताबा मिळवला. पुणे हे “चार्लस बार्टन बर” व “कर्नल जनरल स्मिथ” याच्या नेतृत्वाखाली होते.

ब्रिटिश पेशव्यांचा पाठलाग करतच होते. दरम्यान कर्नल स्मिथ याला भिती वाटत होती की पेशवा तेथूनही निसटून कोकणात जातील व तेथे राज्य करतील, म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कुमक पाठवण्यास सांगितली. आणि एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितली. दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठलाग चुकवून निसटून जाण्यात यशस्वी झाले परंतु दक्षिणेकडून कर्नल “थेओफिलस प्रिझलर” सैन्यासह तयार होताच, ते पाहून पेशव्यांनी मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ त्यांच्यावर हल्ला करेल या भीतीने ते पुन्हा पुण्याकडे वळले. डिसेंबर इ.स. १८१७ च्या अखेरीस कर्नल बरला बातमी समजली की पेशवे पुण्यावर चालून येत आहेत तेव्हा त्याने शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले ते सैन्य पुढे सरसावले आणि त्यांची लढाई कोरेगाव भिमा या गावात झाली.


ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन “फ्रान्सिस एफ. स्टाँटन” करीत होता तर पेशवाईंच्या साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती “पेशवा बाजीराव दुसरा” करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी‘चे ५०० महार सैनिक होते, काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. पेशव्यांच्या सैनिकांत मराठा, अरब या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले.
भीमा कोरेगाव युद्धाच्या समरणार्थ उभारलेला विजयस्तंभ यावर कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहिद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (पूर्वाश्रमीचे महार), दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमुर्ती व डॉ. आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहिद सैनिकांच्या विजयस्तंभाला मानवंदना दिली जाते.

कोरेगांवच्या युद्धात २० महार सैनिक आणि ५ अधिकारी शहीद झाले. शहीद झालेल्या महारांची नावे, त्यांच्या सन्मानार्थ बनवल्या गेलेल्या स्मारकावर अंकित आहे. जे या प्रकारे आहे –
गोपनाक मोठेनाक,शमनाक येशनाक,भागनाक हरनाक,अबनाक काननाक,गननाक बालनाक,बालनाक घोंड़नाक,रूपनाक लखनाक,बीटनाक रामनाक,बटिनाक धाननाक,राजनाक गणनाक,बापनाक हबनाक,रेनाक जाननाक,सजनाक यसनाक,गणनाक धरमनाक,देवनाक अनाक,गोपालनाक बालनाक,हरनाक हरिनाक,जेठनाक दीनाक,गननाक लखनाक

या लढाईत महारांचे नेत्रत्व करणाऱ्यांची नावे खालिल आहेत –
सिधनाक,रतननाक,जाननाक,भकनाक
या युद्धात जख्मी झालेल्या महार योद्धांची नावे खालिल प्रमाणे आहे –
जाननाक,हरिनाक,भीकनाक,रतननाक,धननाक
प्रमोद जाधव
(संदर्भ विकिपीडियावरून)

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

मिलिंद एकबोटेना 'हिंदू राष्ट्रीयत्व' बहाल....! पुण्याच्या सार्वजनिक न्यास नोंदणी अधिक्षकांचा प्रताप...!

बुध जानेवारी 1 , 2020
Tweet it Pin it Email Pin it Email https://www.ambedkaree.com/bhima-koregoan/#SU1HXzIwMTkxMjM मिलिंद एकबोटेंना’हिंदू राष्ट्रीयत्व’ बहाल! पुण्याच्या सार्वजनिक न्यास नोंदणी अधिक्षकांचा प्रताप…! Pin it Email https://www.ambedkaree.com/bhima-koregoan/#SU1HXzIwMTkxMjM ■ दिवाकर शेजवळ ■ मुंबई: दि.1 जानेवारी : देशाच्या संविधानानुसार हिंदू हा धर्म आहे, राष्ट्रीयत्व नाही। असे असतानाही पुण्यातील सार्वजनिक न्यास नोंदणीच्या अधीक्षकांनी मात्र ‘समस्त हिंदू आघाडी’ […]

YOU MAY LIKE ..