अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनाझेशनचे वेगवेगळ्या ठिकाणी उद्योजक सेमिनार …!

गेल्या चार वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दृष्टीने मागास आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय ,उद्योग उभे करायचे आहेत असे समजतील होतकरू आणि प्रामाणीक लोकांसाठी अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनाझेशन वेगवेगळया ठिकाणी आर्थिक चळवळीच्या माध्यमातून विविध मार्गदर्शन सेमिनार आयोजित करत असते .

व्यवसाय करायचा असेल तर भांडवल व व्यवस्थापन असावे लागते निश्चित ध्येय असावे लागते व त्यासाठी लागणारी जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असावी लागते .भांडवल आहे पण व्यवस्थापन नाहीय,भांडवल नाहीय पण प्रोजेक्ट आहे आणि इतर समस्या असतात . अस्मिताच्या सेमीनार मध्ये याच गोष्टींचे मार्गदर्शन केले जाते व कमीत कमी भांडवल यामध्येही आपण आपल्या व्यावसाय सुरू करू शकतो.

अस्मिता सेमिनारच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या तरुणांना विविध व्यवसाहिक संधी उपलब्ध करून देत आहे . त्यात TRADING, INSURENCE ADVISERS ,FINCE /LOAN CONSULTANT यासारखे विविध संधी उपलब्ध करून देण्यात येतात.नुकत्याच ठाणे पूर्व येथील मंगला हिंदी हायस्कूल येथे अस्मिता चे सहावे सेमिनार पार पडले त्यात . प्रमुख मार्गदर्शक मा मनीष रणशूर माजी सनदी अधिकारी तसेच इंडिअन नेव्ही एक्स ऑफिसर व बजाज अलयन्स इन्शुरन्स चे मुंबई ब्रांच हेड मा स्वप्नील हसबे ,CREATIVE FINSERVE PVT LTD चे CEO मा इम्रान साबळे ,गोपाळ ENTERPRISES चे मा सचिन शिर्के यांनी उपस्थित तरुणाना बहुमोल मार्गदर्शन केले .

सदर सेमिनार ची कल्पना अस्मिता चे अध्यक्ष मा. किरण तांबे आणि सचिव मा. प्रमोद जाधव यांच्या संकल्पनेतून साकार झाली असून सदर सेमिनार ला उपस्थित तरूणांना त्यांनीही प्रमुख मार्गदर्शन केले.


कार्यक्रम यशस्वी करण्यास अस्मिता च्या सर्व टीम मेहनत घेत असून पुढील विभागात अशा प्रकारच्या सेमिनार चे आयोजन करत असल्याची माहिती अस्मिता चे चेअरमन किरण तांबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले . ज्या तरुणांना आपले स्वतःचे व्यवसाय उभे करावयाचे आहेत ज्यांना मार्गदर्शन व ज्यांचे व्यवसाय नुकतेच सुरू झाले आहेत त्यांना त्याचा व्यवसाय वाढविण्यासाठी मार्गदर्शन ही अस्मिता करते असे ही ते म्हणाले.

ज्या लोकांना आपल्या विभागातील होतकरू तरुणांसाठी अशा प्रकारच्या व्यवसाहिक मार्गदर्शन सेमिनार चे आयोजन करावयाचे असल्यास अस्मिता कडे संपर्क करावा असे अस्मिता कडून आव्हान करण्यात आले आहे .संपर्कासाठी किरण तांबे – 9167885852 आणि प्रमोद जाधव -75096850978 याच्याशी संपर्क करावा .


गेल्या महिनाभर विविध विभागात ही फ्री उद्योग सेमिनार यशस्वीपणे पार पडण्यास अस्मिता चे कार्यकर्ते मा .सुमेध जाधव ,मा.भारत पवार,मा.देविदास पवार ,मा.शैलेंद्र पवार ,मा.रमाकांत नंदावडेकर आणि मा.प्रशांत जाधव हे प्रामुख्याने काम करत आहेत त्यासाठी बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन करत असून ते ही विविध प्रकारे अस्मिता च्या सेमिनार साठी योगदान देत आहेत.

एकंदर अस्मिता ही समाजात आर्थिक चळवळ उभी करत असून यशस्वी ही करत आहे .

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

जनगणना: कोकणात बौद्धांची राजकीय कत्तल!

सोम फेब्रुवारी 24 , 2020
Tweet it Pin it Email जनगणना: कोकणात बौद्धांची राजकीय कत्तल! – संदेश पवार Pin it Email https://www.ambedkaree.com/asmitamorg-2/#SU1HXzIwMjAwMjI चिपळूण: राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका एप्रिल -मे महिन्यांमध्ये होणार आहेत . या निमित्ताने राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या प्रभाग निश्चिती व प्रभागातील आरक्षणाचा कार्यक्रम पार पडला आहे . प्रभागातील आरक्षण जाहीर केल्यानंतर त्यामध्ये अनेक विसंगत व अन्यायकारक […]

YOU MAY LIKE ..