आंबेडकरी कविता:तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली.

आंबेडकरी कविता:तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली.
●●○●●●○●●●●●●●●●●●●●●●●●
कवी : हर्षा बोले
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

तिने एकदा कविता लिहायला सांगितली
तिच्या सुंदर डोळ्यांवर
डोळ्यातल्या डबडबणा-या अश्रुवर
अश्रु ओघळणा-या गालावर
गालाखालील ओठांवर
ओठातल्या शब्दांवर,शब्दांच्या भावनांवर
तिच्या आखीवरेखीव नितंबावर
स्तनावर, योनीवर,मासिक पाळीवर
अन नवीन जन्म देणा-या गर्भधारणेवर
तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली

विचार केला मनात
डोळेवर निळशुभ्र आकाशात
स्त्री म्हणजे नक्की कोण
आई,बहिण,बायको किंवा
मुलगी ,मैत्रीण, प्रेयसी
रस्त्यावर जाणारी मादी
कि माझ्यातल बाईपण..?
समजून घ्यायला लागलो,कारण
तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली

डोक्याला ताण दिला
मला आता भरभर डोळ्यासमोर दिसु लागली
बुद्धाला जन्म देणारी महामाया,
संगोपन करणारी गौतमी,यशोधरा
आम्रपाली,मुमताज,चांदबीबी,जिजाऊ,
अहिल्या,सावित्री,फातिमा,रमाई
भारतीय इतिहासातल्या अनेक नायिका
भराभरा वाचू लागलो,कारण
तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली

शुराच्या, हिम्मतीच्या,धीराच्या
सोबत अन्याय अत्याचाराच्याही कथा वाचल्या
इथल्या जातीपातीतल्या स्त्रियांच्या
अस्तित्वाच्या व्यथा वाचल्या
विदेशातील काळा गो-या स्त्रियांच्या
संघर्षाच्या गाथा वाचल्या
वाचले स्त्रीवर लिहलेले भरभरून लेख
तिच्या संघर्षालासुद्धा वाटा फुटल्या
स्रीवाद हा शहराच्या वेशीवरच थांबल्या
गावकुसाबाहेरच्या तिच्या सौदर्यांची धींड
गावतल्या चावडीच्या बाहेर कधीच नाही पोहचल्या
मन बधीर झाल होत पण थांबलो नाही,कारण
तिने स्त्रीवर कविता लिहायला सांगितली होती

वाचत होतो बघत होतो इथल्या बातम्या
बातम्या तिच्या रक्ताच्या
रक्तातल्या किंकाळ्यांच्या अन
किंकाळ्यांचा आवाज ऐकुन
पेटून उठणाऱ्या लोकांच्या
कळल इथ किंकाळ्यांनासुद्धा जातधर्म असतो
मेनबत्तीचा भाव वधरतो,चँनेलचा टिआरपी चढतो
नाहितर एखाद्या किंकाळ्याचा
आवाज तिथेच दाबला जातो
कारण इथल्या प्रत्येक स्रीला जातधर्म असतो
आता मला काहीच सुचत नव्हत ,कारण
तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली

आता मी जरा थांबलो स्तब्ध झालो
उठून खिडकीत जाऊन उभा राहिलो
खिडकीतून दिसणारा चौकातला पुतळा
रुबाबात समोर बोट दाखवत तो
काहितरी खुनावतोय अस वाटल
चटकन मी फाऊंटणचा पेन उचलला
त्यात निळी शाई भरली
सफेद रंगाचा कोरा कागद घेतला
अन तडकन तिच्याकडे पोहचलो
तिच्या हातात टेकवून तिला
फक्त #जय_भिम म्हणालो

ती समजली,तिला कळल तिची कविता
तिलाच लिहायची आहे
इथे प्रस्थापितांच्या पेनात तिच्यासाठी शाई नाही
तिच्या अस्तित्वाची,शौर्याची,गौरवाची कविता
गावकुसातल्या,शहरातल्या झोपडीतली व्यथा
तिलाच भरभरून लिहायची आहे
होती तिने मला स्त्रीवर कविता लिहायला सांगितली
आता मात्र तिने…
स्त्रियांसोबत समाजातल्या प्रत्येक वंचित घटकावर
तिने बा भिमाच्या फोटोकडे एकटक पाहत
स्वतःच कविता लिहायला घेतली…..!

– हर्षा बोले


फोटो साभार गुगल…(कठुआ घटनावेळेचा)

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

शांति स्वरूप बौद्ध जी का दुःखद निधन !.

शनी जून 6 , 2020
Tweet it Pin it Email बौद्धाचार्य शांती स्वरूप बौद्ध जी का दुःखद निधन !. ****************** डॉ.सुरजित कुमार सिंग- दिल्ली ****************** Pin it Email https://www.ambedkaree.com/ambedkree-kavitaharshabole/#SU1HXzIwMjAwNjA बाबासाहेब के किए हुए नामकरण की गरिमा उन्होंने हमेशा कायम रखी। महाराष्ट्र के बौद्धों से यदि पुछा जाए की दिल्ली में आपका कौन सा परिवार है […]

YOU MAY LIKE ..