भारतीय बौद्धमहासभेच्या देवगड तालुका उत्तर विभाग शाखेचे उद्घाटन

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे महिला धम्म प्रशिक्षण शिबीरासह,
देवगड तालुका उत्तर विभाग शाखेचे उद्घाटन..

सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी )
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत उपासिका महिला धम्म प्रशिक्षण शिबीर मुटाट, कासार्डे व चेंदवण येथे ३१ मे २०१९ ते ९ जून २०१९ या कालावधीत संपन्न झाले. तिन्ही धम्म प्रशिक्षण शिबीरादरम्यान भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री भिकाजी कांबळे यांनी आवर्जून भेटू देऊन, उपक्रमाचे कौतुक केले. तर, समारोप कार्यक्रम दिनी मुटाट येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्द अंतर्गत देवगड उत्तर विभाग तालुका शाखेचे उद्घाटन करण्यात आले असून, सिद्धार्थ साळुंके यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात धम्म चळवळ व्यापक करण्याचा सर्वांनी संकल्प केला. मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्तीनिमीत्त संजय जाधव यांचा जिल्ह्याच्यावतीने सत्कारही करण्यात आला.

महाबोधी बुध्द विहार मुटाट येथील धम्म प्रशिक्षण शिबीरामध्ये धम्म गाथांचे अर्थ, धम्माचे जीवनातील महत्व, बुध्द धम्माची शिकवण, बुध्दांचे तत्त्वज्ञान आदी विषयांवर १० दिवसीय धम्म प्रशिक्षण शिबीरामध्ये केंद्रिय शिक्षीका ज्योती जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर ९ जून २०१९ रोजी सांगता समारोहामध्ये भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ कदम, सरचिटणीस भाऊ कासार्डेकर, पर्यटन विभाग सचिव जनीकुमार कांबळे, केंद्रिय शिक्षक, बौद्धाचारी संजय जाधव, देवगड तालुका मुंबई सरचिटणीस ए. डी. साळुंके, कुणकवण गावचे विजय नाडणकर इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सदर समारोप कार्यक्रमाला केंद्रिय शिक्षक विजय हरकुळकर, भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षा, केंद्रिय शिक्षीका सुषमा हरकुळकर, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते कृष्णा साळुंके, प्रेमा नाडणकर, सुरेश कुणकवणकर, दिनेश कुणकवणकर, राजेंद्र साळुंके, विनय साळुंके यांच्यासह अनेक मान्यवर उपासक, उपासिका उपस्थित होते.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

मुंबईत आपत्तीजनक स्थिती -मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.

मंगळ जुलै 2 , 2019
Tweet it Pin it Email आज 2 जुलै 2019 रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे .रोजच घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणारे मुंबईकर आता त्यांची लाइफ लाईन असलेली मुंबई लोकल सेवा बंद झाल्याने ,रस्त्यावर वाहतूक कोंडीनं थांबले आहेत. जबाबदार फडणवीस सरकार ने शासकीय सुठ्ठी जाहीर केलीय. पाणी तुंबललेले […]

YOU MAY LIKE ..