तृतीय पंथीय असल्या कारणाने वंचितच्या प्रवक्त्या दिशा शेख याना TV9 ने नाकारले

ज्याने समाजाला दिशा द्यावी आदर्श निर्माण करावा मात्र तोच जर कर्मठ अन खुळचट विचाराने भरकटलेले असतात .नेमके असेच मीडिया चे झाले आहे या मीडियात करणारे
पत्रकार आणि त्यांचे संपादक यांनी तर हद्द केली आहे .

वंचित कडून याचा निषेध करण्यात आला यो खालील प्रमाणे

TV 9 महाराष्ट्र कडून वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांना आपल्या न्यूज चॅनेल कडून, त्या तृतीयपंथी असल्यामुळे Exit Poll च्या चर्चेमध्ये सहभागी होण्यास नाकारण्यात आल्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. तसेच या प्रकरणात TV 9 ने सार्वजनिकरित्या आपल्या न्यूज चॅनेल वरती जाहीर माफी मागावी अशी आमची आग्रही मागणी आहे.

दिनांक 19 मे रोजी, रात्री 8 ते 9 या वेळेसाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्या न्यूज चॅनेलकरिता पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्या दिशा पिंकी शेख या येणार असल्याचे कळवले होते. त्यानुसार आपल्या चॅनेलकडून दिशा यांना संपर्क करण्यात आला होता. मात्र संपर्क करणाऱ्या आपल्या समन्वयकाला दिशा यांचा आवाज ‘पुरुषी’ असल्याचे जाणवले. त्यानंतर सदर समन्वयकाने तुमच्या नावावरून मला तुम्ही महिला आहात असे वाटल्याचे सांगितले. यावर दिशा यांनी आपण ट्रान्सजेंडर महिला असल्याचे सांगितले. हा फोन संपल्यानंतर आपल्या ( TV9 ) समन्वयकाकडून वंचित बहुजन आघाडीच्या मीडिया समन्वयकाला फोन करून आम्हाला प्रवक्ता बदलण्यास सांगितले. मात्र त्यास वंचित बहुजन आघाडीने नकार दिल्यानंतर आपल्या समन्वयकाने ( TV 9 ) दिशा शेख यांना कार्यक्रम रद्द केल्याचे खोटे सांगितले व त्यामुळे येण्याची गरज नसल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात कार्यक्रम रद्द झालेला नव्हता. LGBT ही माणसंच आहेत आणि त्यांनाही नागरिकांचे सर्व अधिकार मिळायला हवेत ही आमची आग्रही भूमिका आहे. समाजातला एक अतिवंचित घटक असलेल्या तृतीयपंथीयांना न्याय देण्यासाठी त्यांच्यातील नेतृत्व विकसित करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यांनाही प्रतिनिधित्व मिळायला हवे ही आमची भूमिका आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या या चळवळीत सहभागी झालेल्या सर्वच वंचित घटकांबद्दल माध्यमांचा दृष्टिकोन दूषित असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. Tv9 मराठीने आज दिशा शेख यांना नाकारून LGBT कम्युनिटीचा प्रतिनिधींत्वाचा हक्क डावललेला आहे.त्यांनाही राजकीय समज असू शकते ही गोष्टच जणू tv 9 चॅनलला मान्य नाही असे दिसते. या घडलेल्या निंदनीय प्रकाराबद्दल जोवर tv9 चॅनेलकडून जाहीर दिलगिरी व्यक्त केली जात नाही तोवर वंचित बहुजन आघाडीचा एकही प्रवक्ता या चॅनेलच्या चर्चासत्रात सहभागी होणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय प्रयोगाबद्दल माध्यमांची दुटप्पी भूमिका आम्ही अनुभवली आहे. मात्र तृतीयपंथी आहे म्हणून एखाद्याचा हक्क माध्यमांकडून डावलला जात असेल तर ते वंचित बहुजन आघाडी खपवून घेणार नाही.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

तथागत भगवान बुध्दांची शिकवण एक अमुल्य ठेवा

बुध मे 22 , 2019
Tweet it Pin it Email या जगातील सर्व दुःख दूर करण्यासाठी किंवा ते संपूर्ण नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी विविध मार्गाचा अवलंब करुन पाहिला यासाठी महत्वाचे म्हणजे त्यांनी संपूर्ण घरादाराचा त्याग करुन आपल्या राज्यांतील दुःख, त्याग, व गरीबी का आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या पृथ्वीतलावर त्यांना असे जाणवले […]

YOU MAY LIKE ..