रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाची स्थापना आणि सुवर्णकाळ.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकास उद्देशून लिहीलेल्या “खुल्या पत्रावर” आधारीत “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची” स्थापना नागपूर मुक्कामी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी झाली.

पक्ष स्थापनेचा ठराव खासदार अॅड.बी.सी. कांबळे (मुंबई)यांनी मांडला. या ठरावाला पाठिंबा म्हैसूर प्रदेश शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी आमदार आरमुगम यांनी दिला. रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यासाठी “शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे” अखेरचे अधिवेशन ३ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमिवर भरले आणि त्याच ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. मद्रास (तामीळनाडू) मधील वयोवृध्द नेते आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एक अत्यंत निकटचे सहकारी श्री. एन.शिवराज यांना पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.

सांसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाची आवश्यकता असते या दृष्टीनेच या पक्षाची काँग्रेसला प्रभावी विरोधी पक्ष म्हणून स्थापना करण्यात आली.रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेच्या वेळी सात ते आठ लाखाचा समुदाय जमला होता. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होत असताना १८८५ साली केवळ ७२ सदस्य एकत्र आले होते.


१९५७ मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीने लोकसभेच्या निवडणूका लढविण्यात आल्या.त्यावेळी ८ खासदार निवडून आले. बॅ. राजाभाऊ खोब्रागडे राज्यसभेवर होते. संसदे मध्ये ९ सदस्य होते.त्यावेळी जनसंघाचे ४, कम्युनिस्ट पक्षाचे २७, हिंदू महासभेचा १,प्रजासमाजवादी पक्षाचे १९, काँग्रेसचे ३७१,सदस्य होते. तो काळ रिपब्लिकन पक्षाचा “सुवर्णकाळ”होता.


पुन्हा एकदा देशातील पीडित शोषित लोकांचा आवाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्हावा आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार व्हावे यासाठी आंबेडकरी जनतेने वाटचाल करावी असे वाटते.
बाबासाहेबांच्या जनतेला आम्ही अवाहन करितो की, त्यांनी याच पक्षाची सेवा करावी.


-प्रभाकर जाधव – राष्ट्रीय उपाध्यक्ष
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(कांबळे)

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

हाथरसच्या घटनेच्या निमित्ताने समाजाच्या भूमिकांना आव्हान !..

सोम ऑक्टोबर 12 , 2020
Tweet it Pin it Email हाथरस चा आक्रोश ऐकू येतोय का? की ! आपल्या गावात, आपल्या घरात घडल्यावर संवेदना जागृत होतील! बातमी म्हणून वाचली,पाहिली आणि केलंय दुर्लक्ष! पण परिणाम दूरगामी होत आहेत, हे ही ध्यानी असू द्या! हाथरस या उत्तरप्रदेशातील छोट्या गावात १४ सप्टेंबर २०२० ला एका एकोणीस वर्षीय मुलीवरील […]

YOU MAY LIKE ..