आंबेडकरी चळवळीतील दक्षणेतील सेनानी काशी कृष्णा यांचे विशाखापट्टनम येथे निधन.

विशेषतः सौदी अरेबियात व दक्षिण भारतात आंबेडकरी विचार कृतीतून पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले.आज सकाळी त्यांच्या कॅन्सर उपचारादरम्यान त्यांची जीवनयात्रा संपली.दुबईत कित्येक वर्षे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन चे ते कार्य करत होते व त्याच माध्यमातून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असत.

त्यांच्या दुःखद निधनाची माहिती मिळताच प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्रा हरी नरके यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली ती www.ambedkaree.com वर देत आहोत.

आंबेडकरी चळवळीचे समर्पित सेनानी काशी कृष्णा, दुबई/विशाखापट्टनम यांचे निधन- प्रा. हरी नरके

आंबेडकरी चळवळीची दक्षिण भारत आणि सौदी अरेबियातली धगधगती मशाल, कृतीशील लढवय्या, समर्पित सेनानी, मित्रवर्य कृष्णा यांचे आज सकाळी आजारपणाने निधन झाले. आठवड्यापुर्वीच त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले. ते अविवाहीत होते. कृष्णा यांचे वय ६२ वर्षे होते. ते विशाखापट्टनचे रहिवासी होते. गेली ३० वर्षे त्यांनी दुबई व आबुधाबी येथे उच्चपदावर काम करीत असताना आंबेडकर इंटरनॅशनल मिशनचे काम घराघरापर्यंत पोचवले. १६वर्षांपुर्वी त्यांनी आंबेडकर जयंतीच्या भव्य कार्यक्रमाला मला दुबईला प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमाला १५०० भारतीय उपस्थित होते. त्यानंतर डिसेंबर २००९ ला त्यांनी हैद्राबादला जागतिक आंबेडकर विचार परिषदेचे भव्य आयोजन केले होते. मूकनायक या बाबासाहेबांच्या पेपरच्या शताब्द्धीच्या निमित्ताने नऊ महिन्यांपुर्वी त्यांनी विशाखापट्टनला जागतिक पातळीवरील मूकनायक शताब्धीमहोत्सव आयोजित केला होता.

तरूणवयात कृष्णा मुंबईत नोकरी करीत असताना दलित पॅंथरच्या प्रमुख नेत्यांच्या संपर्कात आले व ते पॅंथरचे क्रियाशील सदस्य बनले. पुढे नोकरीनिमित्त ते दुबईला गेले. तिथे त्यांनी चळवळीचे काम अतिशय तळमळीने, मेहनतीने आणि वाहून घेऊन केले. शेवटच्या श्वासापर्यंत ते चळवळीच्या भवितव्याबद्दल झटत आणि बोलत असत.

मी चळवळीत अनेक लोकांना जवळून पाहिले परंतु असा नि:स्वार्थ आणि ध्येयवादी नेता, कार्यकर्ता बघितला नाही. त्यांच्या बहिणीचे सासरे हे बाबासाहेबांसोबत काम करीत असत. ते आंध्रप्रदेशातील शेड्युल कास्ट फेडरेशनचे प्रमुख नेते होते. ते अनेक टर्म बाबासाहेबांच्या विविध पक्षांचे आमदारही होते.

-प्रा. हरी नरके,
०१/११/२०२०

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

७ नोव्हेंबर १९०० ऐतिहासिक क्रांतीदिन.

शनी नोव्हेंबर 7 , 2020
Tweet it Pin it Email संपूर्ण भारतवर्षात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचा एक ही थेंब न सांडता आपल्या बुद्धीच्या जोरावर हजारो पिढ्यांची सामाजिक गुलामगिरी नष्ट करुन सामाजिक क्रांती केली त्या महामनव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम शाळा प्रवेश दिन ७ नोव्हेंबर १९०० ला महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये साजरा केला जातो. […]

YOU MAY LIKE ..