हे युद्ध कधी संपणार ?

हे युद्ध कधी संपणार ?


महानगर पालिका ,महाराष्ट्र शासन ,भारत सरकार यांची यंत्रणा ,मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री आणि संपुर्ण सरकार यंत्रणा …..!

डॉक्टर,नर्स,हॉस्पिटलमध्ये राबणारे पॅरामेडिकल चा स्टाफ,सुरक्षा कर्मचारी, सफाई कर्मचारी ,रेल्वे कर्मचारी,बेस्ट चे -एसटी चे चलक -वाहक ,अंबुलन्स चालक ,कर्मचारी रेल्वेचे मोटरमन ,गार्ड ,सफाई कामगार,इलेक्ट्रिक कर्मचारी ,पाणी खाते कर्मचारी आणि तमाम या सेवेत काम करणारे सर्व कर्मचारी वर्ग आपल्या जीवाची बाजी लावत आहेत .सरकारी यंत्रणा नागरिकांना आपली स्वतःची सुरक्षा करण्यास घरीच बसण्यास सांगितले आहे .


करोना विषाणू शी लढणारे हे सैनिक ….आपले दिवस रात्र लढत आहेत .आपल्या प्राणाची बाजी लावून उभेच। आहेत. कालच जिथे विषाणू बाधित लोकांनाउपचार करण्यास ठेवले आहे त्य कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ड्युटी वर तैनात असणाऱ्या पोलीस शिपाई याना संसर्ग झाला …!

काल पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यु मोठ्या उत्साहात घोषीत केला तसा तो यशस्वी ही झाला मात्र संध्याकाळी पाच च्या सुमारास जो देशभर धुमाकूळ घातला गेला ती गोष्ट अतिशय गंभीर आणि वेदनादायक आहे लोक एकद्या नेत्याला किती प्रमाणात बिनडोक पणे फोल्लो करतात.


काय योग्य अन काय चूक हे ही कळण्यासाठी लोक तयार नाही ज्या गोष्टी साठी कर्फ्यु लावण्यात आला त्याच गोष्टींचा संध्याकाळी लोकांनी केल्या ……!

दिवसभर केलेली मेहनत अशी बेजबाबदार पणे त्याचे मातेरे केले……अजून ही वेळ गेलेली नाहीय . भक्तांना आता कळायला हवं असेच मोदींनी ही आता पुढे येऊन असल्या फालतू घोषणा न करता लोकांना नीट आणि संयम एक देश प्रमुख या नात्याने सांगायला हवा. जे लोक सरकारच्या सूचना पळत नाहीत त्यांवर कडक कार्यवाही झाली पाहिजे .


महाराष्ट्र शासनाने ही यावर विचार करावयास माननीय मुख्यमंत्री आपल्या तब्बेतिची काळजी न करता ही नेटाने राज्यप्रमुखला साजेशी अशी परिस्थिती हाताळत आहेत त्यांचा संयमी आणि धीरगंभीर स्वभाव अधिक आश्वासक वाटतो .आरोग्यमंत्री राजेश टोपे हे ही एखाद्या सेनापती सरखे लढत आहेत स्वतःच्या आईच्या आजारपण असून ही दिवसरात्र लक्ष देत आहेत.

अशा या युद्धजन्य परिस्थिती जनतेने आपले भान विसरून चालणार नाही मात्र अंध भक्त यांच्या अतिशय मूर्ख पणाने होत्याचे नव्हते झाले तर याला जबाबदार हे अंधभक्त असणार आहेत इतिहासात त्यांच्या नावावर हे लिहिले जाईल आणि त्याचे सारे श्रेय नरेंद्र मोदींच्या घोषणाबाजीला च जाईल .

सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ही ट्विट करीत पंतप्रधान मोदींना सुनावले आहे.

जी स्थिती महाराष्ट्र राज्यात त्या ही पेक्षा भयाण स्थिती काल देशात होती सोशल मीडियावर पाहिल्यास दिसेल आपण खरेच भारतात राहतो की मूर्खाच्या देशात हेच कळत नाही .

आपल्या गो करोना च्या घोषणाबाजी करणाऱ्या ना रामदास आठवले साहेबांवर हसणारे सारे लोक ……..काल स्वत: मूर्खांसारखं करत असल्याने आठवले साहेबांविषयी आदर वाढला……!

हे युद्ध सुरु आहे …….विज्ञानाच्या जीवावर आपण हे जिंकू शकतो किती तरी भयानक स्थितीतून जग बाहेर आले आहे त्यावर ही उपाय शोधले होते आता ही असे होईल जगातील शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत तो दिवस आपल्या सर्वांच्या हिताचा ठरेल पण सध्या तरी सरकार ,जागतिक आरोग्य संघटना यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे हेच जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचे आहे .हे सर्वानी लक्षात घेतले पाहिजे .अंधश्रद्धा ,दैवत यांचा धाव करून काहीही होणार नाहीय शेवटी विज्ञान च जिंकणार आहे बुद्ध म्हणतात प्रश्न आहे तर उत्तर ही आहेच थोडा वेळ थांबावे लागेल. मात्र आपण संयम शील असले पाहिजे .
लढणाऱ्या ह्या समस्त उपेक्षित सैनिकांना……!

बंधुनो
आम्ही घरी आहोत…..आपल्या सूचनांचे पालन करीत शांत आहोत पण आमच्याच परिवारातील तुम्ही सर्वजण आपल्याला कामात देश सेवेत व्यस्त आहात तरी काम करताना आपली स्वतः ची काळजी घ्या. अशी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनती आहे .
आणि हो जे कुणी अति उत्साही पणे बाहेर फिरत असतील त्यांनी अजून ही आपल्या वागण्याला मुरड घालून शांत पणे घरी बसावे अन्यथा इटली सारखी स्थिती निर्माण होईल .याचे भान असूनद्या.


नुकतात FB महानगर पालिका सफाई कामगारांचा ,नर्स ,डॉक्टर यांचा व्हिडीओ व्हाययर झाला आणि माझ्या डोळ्यात पाणी आले…….

कारण आपले बरेच लोक ,रेल्वे व मुंबई महानगर पालिके सफाई कामगार म्हणून काम करतात .पिढ्यानपिढ्या ते हे करत आहेत .सतत दुर्लक्षित असलेला हा वर्ग कधी ही कुणाकडे हात पसरत नाही ……महानगर पालिका जे देईल ते घेतो…….नोकरी आहे म्हणजे जीवन सुरक्षित आहे हे समजून अनेक यातना तोंड देत ते जगतात …!
मुंबईत पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्याचा निचरा असो की गटार ,गल्ली साफ सफाई असो गणेश विसर्जन असो ,की होळी,दसरा असो ही दिवाळी,महापरिनिर्वाण दिन असो की आणखीन सण जनता आनंदाने साजरे करत असते त्यातून होणारे घाण ,अस्वच्छता ती ते आनंदाने कर्तव्ये समजून संपूर्ण मुंबई दिवसरात्र जागून ते साफ करतात मात्र कोणत्याही सुरक्षा कवच न वापरता …….! ते सतत दुर्लक्षित असतात.

आता या परिस्थितीत देशासाठी व मुंबईतील तमाम नागरिकांसाठी लढव्ये सैनिक आहात परंतु तुम्ही आमच्या साठी लाखमोलाचे आहात देशासाठी व मुंबईकरासाठी काम करतांना स्वतःची काळजी घ्या ….!



–तुमचा
प्रमोद रामचंद्र जाधव

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

आंबेडकरी गझल- वस्तीत माणसांच्या....

रवि मार्च 29 , 2020
Tweet it Pin it Email वस्तीत माणसांच्या….. Pin it Email https://www.ambedkaree.com/when-the-war-is-finish/#SU1HXzIwMjAwMzI गझल हा काव्यातील सर्वात कठीण आणि गंभीर प्रकार आहे .आंबेडकरी लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचा ह्या विषयातहातखंडा होता …..गझल ही वृत्तात लिहिली जाते आणि ते ज्याला जमले तो मास्टर…..! आंबेडकरी कवी वसंत वाघमारे यांनी गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्यात […]

YOU MAY LIKE ..