स्वतःच्या अनुभवातून सुरू केला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टुरिझम चा व्यवसाय ….!

कल्याण शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या संजय शिरतुरेंची गरुड भरारी.


नौकरीत असतांना वैयक्तिक official टुर्सचा स्वतःचा अनुभव संपूर्ण भारतभर काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते पूर्वोत्तरी राज्य, आणि थाईलँड, श्रीलंका, भूतान, सिंगापोर, मलेशिया, द.कोरिया, चायना, हॉंगकॉंग, जपान, दुबई, जर्मनी, घाना, युगांडा, कॅनडा, लॅटिन अमेरिका, चिली, ब्राझील, साऊथ आफ्रिका आदीं केल्यावर आपला स्वतःच्याच टूरिझम चा व्यवसाय असावा आहे सतत वाटणारे संजय दिपंकर शिरतुरे आपल्या व्यावसाय कशा प्रकारे सुरू केला आणि आता नेमके काय करत आहेत यावर नुकतेच www.ambedkaree.com शी बोलत असताना सांगितले .

कल्याण शहर हा महाराष्ट्र राज्यात आंबेडकरी चळवळीतील बालेकिल्ला याच किल्ल्यात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असलेले एक प्रमुख नाव म्हणजे संजय दिपंकर शिरतुरे यांच्या शी आम्हीं संवाद साधला .

मूळचे भुसावळ शहरात वाढलेले आणि भारतीय बौध्द महासभेचे महाराष्ट्र संस्कार विभागाचे प्रमुख राहिलेले दि.आचार्य दिपकर शिरतुरे यांचे चिरंजीव .

आपल्या शिक्षण आणि नोकरीविषयी बोलताना म्हणणे की माझे वडील – दिवंगत आचार्य दिपंकर शिरतुरे हे रेल्वे मधुन Office superintendent म्हणुन भुसावळ येथुन सेवानिवृत्त होते तसेच मान्यवर आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते सुर्यपूत्र भैयासाहेब आंबेडकर प्रथम पुरस्कार देण्यात आला होता .

भारतीय बौद्ध महासभेत महाराष्ट्र संस्कार विभागाचे प्रमुख होते. त्यांचे 14 ऑक्टोबर 2008 आश्विन पौर्णिमा भिक्खु वर्षावास समाप्तीच्या दिवशी निधन झाले. आई वडिलांनी बालपणापासून बौद्ध धम्माचे संस्कार आम्ही पाचही बहीण-भावंडांवर दिलेत.

नेमके या व्यवसायातच का आलात ?

2015 पासुन हा व्यवसाय सुरु करण्या मागे कारणही तसेच आहे. ईतर काही टुर ऑपरेटर कडुन आपल्या समाजातील बऱ्याच लोकांची फसवणुक झालेली आहे. ईतरांकडुन आपल्या लोकांची होणारी फसवणुक थांबावी तसेच खऱ्या बौद्ध देशांचे पर्यटन व्हावे आणि त्यामाध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार व्हावा तसेच ज्या देशांनी बौद्ध धम्म स्विकारला आणि त्यांचा विकास कसा झाला हे त्या देशात जाऊन प्रत्यक्ष दाखवून देणे की बौद्ध धम्म किती महान आणि उच्च कोटींचा धम्म आहे. आपली लोकं त्या देशात अनुभव घेतात आणि मग आपले आचरण बौद्ध धम्माप्रमाणे अनुसरतात. अशा प्रकारे धम्मप्रचार-प्रसार करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन हा व्यवसाय सुरु केला आहे.

आपल्या घरच्यांनी सहकार्य केले का की ते कसा सहभाग देतात ?

माझे लग्न हे आंतरजातीय पत्नी जैन धर्माची Bsc B.Ed. या व्यवसायात माझ्या पत्नी विद्याचा मोठा सिंहाचा वाटा होता. स्वताचा ट्युशन क्लास सांभासळून ती माझ्या व्यवसायाचे सर्व अकाऊंट सांभाळत होती. एक मुलगा आहे 19 वर्षांचा मैत्रेय engineering student तो देखील या व्यवसायात त्याचा सल्ला नव्या पद्धतीने देत असतो.

व्यावसायिक होत असताना वैयक्तिक दुःख बाजूला ठेऊन ही काम करायला लागते…!

7 एप्रिल 2019 रोजी पत्नीचा ब्रेन हॅमरेजने मृत्यु झाला. आणि मी माझे एप्रिल महिन्यातील भुतान, थाईलँडचे टुर्स रद्द केलेत आणि त्यामध्ये आपल्या पर्यटकांनी मला सहकार्य केले समजून घेतले त्याबद्दल ही त्यांचे धन्यवाद.

तथागत बुद्धांनी दुखमुक्तीचा मार्ग अंगीकारुन स्वतःला सावरत मी मे महिन्यात वैशाख बुद्धपोर्णिमे निमित्त 42 पर्यटकांना थाईलँडला टुर घेऊन गेलो.

सर इतक्या कठिण प्रसंगी ही आपण उभे राहिलात व त्यातून सावरत आहात ही चांगली गोष्ट आहे .

आपले शिक्षण व अनुभव संबंधित काही सांगाल का ?

शिक्षण – M A English literature, MBA 1998,करून Pulp & PapeTechnologist 2001. Mumbai.या मूळच्या अमेरिकन कॅलिफोर्निया base पेपर मिल मध्ये 18 वर्ष रिजनल सेल्स मॅनेजर या पदावर कार्यरत आहे .

आपण व्यवसायाची सुरुवात केल्यावर कोणकोणत्या टूर आयोजित केल्या यावर म्हणतात..

व्यवसाय 2015 पासुन राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रीय टुरिझम क्षेत्रात “पॅकेज टुर्स” हा स्वतः चा व्यवसाय सुरु केला. विशेषकरुन बौद्ध धम्मातील लोकांकरिता हा व्यवसाय सुरु केला आणि त्याबरोबरच कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांकरिता सुद्धा हा व्यवसाय सुरु आहे.

कोण कोणत्या ठिकाणी आपण टूर घेऊन जाता थोडे सविस्तर सांगा …!

डोमेस्टिक “पॅकेज टुर्स” मध्ये उत्तरभरातातील बौद्ध स्थळे सारनाथ, बुद्धगया, लुंबिनी, कुशीनगर, राजगिर, नालंदा, श्रावस्ती, वैशाली व काठमांडु ई. स्थळांचा जवळपास 26 वर्ष पासून जात आहे.
इतर धार्मिक लोकांबरोबर च्या डोमेस्टिक टुर्स मध्ये सिक्कीम, दार्जिलिंग, सिमला, कुलु मनाली, काश्मीर राजस्थान, गोवा आणि दक्षिण भारत ई. टूर्सचा अनुभव.
तसेच”आंतरराष्ट्रीय पॅकेज टुर्स” मध्ये श्रीलंका, थाईलँड, सिंगापूर, मलेशिया, भुतान, मॅनमार, ई. बौध्द देशांमध्ये दर दोन महिन्यांत पॅकेज टुर्स आयोजित केली जाते. तसेच व्यावसायिक आणि पिकनिक करिता जनरल लोकांसाठी वरील ‘पॅकेज टुर्स” चे आयोजन केले जाते.

व्यवसाय विस्तार करण्यासाठी काही खास योजना ?

टुर पॅकेज विषयी – पॅकेज मध्ये समाविष्ट विमानाचे रिटर्न तिकीट, व्हिसा, इंशोरन्स, 3/4/5 स्टार राहण्याची व्यवस्था, अमेरिकन ब्रेकफास्ट, इंडियन रेस्टॉरंट मध्ये दुपारचे आणि रात्रीचे भोजन, पॅकेजनुसार साईटसीन, शॉपिंग, फिरण्यासाठी A/C लक्झरी बस, रोज पिण्याचे शुद्ध पाणी बोटल्स, कल्याण ते मुंबई एअरपोर्ट पिकअप ड्रॉप ई.
पुढील टुर्स –
बुद्धगया सारनाथ धम्मसहल – 30 ऑक्टोबर, 25 डिसेंबर 2019.
सिमला-कुल्लु-मनाली
15 जानेवारी, 15 फेब्रुवारी 2020.
थाईलँड – 11 ऑगष्ट, 10 सप्टेंबर, 10 ऑक्टोबर, 13 डिसेंबर 2019.
श्रीलंका – 10 ऑगष्ट, 28 ऑक्टोबर, 14 डिसेंबर 2019.
भुतान – 3 सप्टेंबर, 9 ऑक्टोबर, 8 नोव्हेंबर, 14 डिसेंबर 2019.
मॅनमार – 2 सप्टेंबर, 14 सप्टेंबर 2019.

पुढील काळात लवकरच जनरल लोकांकरीता हॉंगकॉंग, चायना, युरोप, दुबई, जपान, अमेरिका, कॅनडा, आफ्रिकन सफारी ई. टुर्सच्या आयोजनाचा उपक्रम राबविण्यात येईल.
वरील “पॅकेज टुर्स” करिता “दि बुद्धिस्ट धम्मा टुर्स” आणि “VIDYA WORLD TOURISM” या दोन फर्मची निर्मिती करण्यात आलेली आहे.असे ही ते म्हणाले ….!

आपणास देशातील आणि बौद्ध देशातील बौध्द स्थळे पहावयास असतील संपर्क करा संजय दिपंकर शिरतुरे 9768642236,7304744223

Emails :sanjayshirture22@gmail.com,
buddhisttours22@gmail.com,
vidyaworldtourism22@gmail.com

शब्दांकन : शीतल प्रमोद जाधव,कल्याण
www.ambedkaree.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

"अॅड.बाळासाहेब आंबेडकर आरएसएस- बीजेपीचे हस्तक असल्याचा तथ्यहीन आणि राजकीय आरोप अमान्य" -प्राचार्य म.ना.कांबळे,

रवि जुलै 7 , 2019
Tweet it Pin it Email ” अॅड.बाळासाहेब आंबेडकर आरएसएस- बीजेपीचे हस्तक असल्याचा तथ्यहीन आणि राजकीय आरोप अमान्य” प्राचार्य म.ना.कांबळे, अध्यक्ष, फुलेआंबेडकर विद्वत सभा वंचित बहुजन आघाडीची स्थापना वंचितांची सत्ता निर्माण करण्यासाठी झाली, परंतू सत्तेसाठी व स्वार्थासाठी आंबेडकरी विचारांशी तडजोड कदापिही केली जाणार नाही ही ठाम भूमिका अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांची आहे. […]

YOU MAY LIKE ..