जन्म मुकनायकाचा….!

तमाम शोषितांचा आवाज होऊन “मूकनायक” ची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली.आंबेडकरी पत्रकारिच्या सुवर्णयुगाची ती क्रांतिकारक सुरुवात होती . पुढे बाबासाहेबानी बहिकृत भारत ,जनता,प्रबुद्ध भारत सारखी वातर्मनपत्रे सुरू केली व आपला बहुजनांचा आवाज जगात निनांदून सोडला!!!.

आपला मीडिया आपला आवाज!!!.
आज ही दिन दुबळ्या लोकांनाच आवाज कुठेच दिसत नाहीय!! बाजारात अनेक मीडिया धनदांडग्या लोकांच्या हातात आहेत.अनेक आंदोलने आणि सामान्य माणसांच्या प्रश्न वाऱ्यावर सोडले जात आहेत आणि लोकांना केवळ भडकून जे हवे तसे करण्यात आजचा मीडिया आघाडीवर आहे.त्यावेळी बाबासाहेबानी जी लेखणी उचलली ती जनतेचा आवाज बनून त्याबद्दल हा खास लेख!!!

#Mooknayak101

काय करू आता धरूनिया भीड। निःशंक हे तोंड वाजविले॥
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण। सार्थक लाजून नव्हे हित॥

हा तुकोबाचा श्लोक उपमथळा म्हणून घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी सुरू केलेलं #मूकनायक हे या देशातील तमाम बहिष्कृतांच पाहिलं मुखपत्र ठरलं व बाबासाहेब मूक्यांचे मूकनायक झाले…!

पहिल्या अंकातील संपादकीय मनोगतात बाबासाहेब या देशातील विषमतेचे दाहक वास्तव विशद करतात. हा देश म्हणजे केवळ विषमतेचा माहेरघर कसे आहे, बहिष्कृत वर्गात कश्याप्रकारे माणुसकीचा संचारच होत नाही हे बाबासाहेब दर्शवतात. हे लिहित असताना बाबासाहेब कुठेही एकांगी, आपल्यावर झालेल्या अन्यायाने अक्रोषित किंवा कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह असलेले वाटत नाहीत. लेखक म्हणून ते नेहमीच तटस्थपणे सत्य वस्तूस्थिती मांडणारे आणि ती बदलून समता धिष्टीत समाज निर्माण करण्याची ओढ असलेलेच वाटतात. त्यानंतर या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचवण्यासाठी, तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग सुचवण्यासाठी वर्तमानपत्र कसे गरजेचे आहे. परंतु त्यावेळी निघत असलेले वर्तमान पत्र कसे विशिष्ट जातींचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिताची त्यांना परवा नाही. म्हणून मूकनायक कसे हे वृत्तपत्र काढण्याची गरज पडली असे बाबासाहेब या पहिल्या संपादकीय मनोगतात लिहतात. यातून 1920 सालीच बाबासाहेबांच्या विचारांची दिशा किती स्पष्ट आणि सर्वांगीण होती हे लक्षात येते. 101 वर्ष आधी लिहिल्या गेलेले हे मनोगत आजही जसेच्या तसे लागू होते.

  • मुकुल निकाळजे

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

'गोदी मीडिया' ही संभावना पत्रकारितेच्या अधोगतीची निदर्शक: नाना पटोले

मंगळ फेब्रुवारी 2 , 2021
Tweet it Pin it Email मूकनायक शताब्दी सांगता सोहळा ‘गोदी मीडिया’ ही संभावना पत्रकारितेच्याअधोगतीची निदर्शक: नाना पटोले मुंबई, दि 1 फेब्रुवारी: आपल्या लोकशाहीचा डोलारा हा कायदेमंडळ, प्रशासन, न्यायसंस्था आणि मीडिया या चार स्तंभावर तरलेला आहे. त्यातील प्रत्येकावरील जबाबदारी आणि कर्तव्ये यांची पदोपदी जाणीव चारही स्तंभांनी ठेवण्याची गरज आहे, असे सांगतानाच […]

YOU MAY LIKE ..