पत्रकार संघात 31 जानेवारीला मूकनायक राष्ट्रीय सन्मान सोहळा

पत्रकार संघात 31 जानेवारीला मूकनायक राष्ट्रीय सन्मान सोहळा..!.


मुंबई,दि 24 (प्रतिनिधी)भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या मूकनायक या पहिल्या पाक्षिकाची शताब्दी येत्या 31 जानेवारी (शुक्रवार) रोजी महाराष्ट्रासह देशभरात साजरी होणार आहे. त्यानिम्मित संध्याकाळी 5 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात मूकनायक राष्ट्रीय सन्मान 2020 हा शानदार सोहळा पार पडणार आहे.


या सोहळ्याचे आयोजन मुंबई मराठी पत्रकार संघ आणि राजस्थानातील ‘प्रभात पोस्ट’ या बहुजनवादी चळवळीतील लोकप्रिय साप्ताहिकातर्फे करण्यात आले आहे। त्याची घोषणा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि प्रभात पोस्टचे संपादक राजकुमार मल्होत्रा यांनी केली आहे. या सोहळ्याला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे दिगग्ज नेते आणि बडे मंत्री प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले.

मूकनायक राष्ट्रीय सन्मान सोहळ्याची संकल्पना ही राजकुमार मल्होत्रा आणि माजी प्रधान महासंचालक (आयकर) के सी घुमरिया यांची आहे, असे वाबळे यांनी स्पष्ट केले.तर, या सोहळ्यात बहुजन, आंबेडकरी चळवळीतील जवळपास 30 साहित्यिक, विचारवन्त, पत्रकार, कलावन्त, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याना मूकनायक राष्ट्रीय सन्मान या पुरस्काराने गौरविण्यात येईल, असे प्रभात पोस्टचे संपादक राजकुमार मल्होत्रा यांनी जाहीर केले। मानकरयांमध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यातील नामवंतांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील मानकरी

ज वि पवार, प्रा दामोदर मोरे,प्रा लक्ष्मण गायकवाड, हिराताई बनसोडे,उर्मिला पवार,संभाजी भगत, प्रा प्रज्ञा दया पवार, दिवाकर शेजवळ,सुनील खोब्रागडे,डॉ सरोज आगलावे,चंद्रकांत सोनावणे, डॉ प्रकाश राहूले,सुनील झोडे, एस आर पगारे

इतर राज्यांतील मानकरी

एच एल दुसाद लखनौ,
हरदान हर्ष जयपूर
डॉ लालसिंग फरीदाबाद
वीरभद्र कारकीढोली सिक्कीम
अशोक भटनागर जयपूर
प्रभाकर ढगे गोवा
जयप्रकाश कर्दम दिल्ली
पी शिवकामी तामिळनाडू
डॉ आमना मिर्झा दिल्ली
टी कुट्टीमनी कर्नाटक
किशोरीलाल मीना

राजा ढाले, नामदेव ढसाळ यांचा मरणोत्तर गौरव..!.


दलित पँथरच्या ऐतिहासिक चळवळीचे मोहरे कालकथीत राजा ढाले आणि पद्मश्री नामदेव ढसाळ यांना मूकनायक राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने मरणोत्तर गौरवण्यात येणार आहे, असे मल्होत्रा यांनी घोषित केले। ढाले, ढसाळ यांच्या कुटुंबियांना तो पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

बाबासाहेबांचे 94 वर्षीय सहकारी सोहळ्याचे आकर्षण.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एके काळचे सहकारी आणि तत्कालीन पत्रकार के सी सुलेख यांचाही या समारंभात सन्मान करण्यात येणार आहे.ते सध्या 94 वर्षांचे आहेत.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

ऐतिहासिक धम्मभूमी विकासाच्या प्रतीक्षेत.....!

बुध जानेवारी 29 , 2020
Tweet it Pin it Email “देहूरोड धम्मभूमी विहार निर्माण अभियान” Pin it Email https://www.ambedkaree.com/muknayak-sanman/#SU1HXzIwMjAwMTI डॉ.बाबासाहेबांचे स्वप्न साकार झालेच पाहिजे…धम्मभूमी विहार पुनर्निर्माण झालेच पाहिजे…..! २५ डिसेंबर १९५४ म्हणजेच नागपूर येथील धर्मांतर धम्मदीक्षेच्या दोन वर्ष पूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देहूरोड, ता. मावळ, जि. पुणे येथे स्वतंत्र भारतातील पहिल्या बुद्धमुर्तीची स्थापना केली.”हि स्थापना करताना […]

YOU MAY LIKE ..