हुजर्‍यांचा लवाजमा नाही, बाऊनर्स वगैरे तर नाहीच नाहीत. कुठलीच वी.आय.पी ट्रीटमेंट नाही-चिन्मय मांडलेकर

काल नागपूर विमानतळावर फ्लाईट ४० मिनिटं लेट. वेटिंग एरियात बसायला ही जागा नाही. ताटकळत उभा असताना, खंद्यावर सॅक, त्याच्या साईड पॉकेटमध्ये पाण्याची बाटली, साधा शर्ट, पॅन्ट अशी ही व्यक्ति दिसली. आधी वाटलं “आयला! हा माणूस सेम टू सेम प्रकाश आंबेडकरांसारखा दिसतो”. पण फोनवर बोलतानाचा त्यांचा आवाज ऐकून कळलं “अरे, प्रकाश आंबेडकरच आहेत.” महाराष्ट्राच्या राजकारणातलं गेल्या काही वर्षातला महत्वाचा नेता. पण बरोबर हुजर्‍यांचा लवाजमा नाही, बाऊनर्स वगैरे तर नाहीच नाहीत. कुठलीच वी.अाय.पी ट्रीटमेंट नाही. एअरपोर्टवर बसायला ही जागा नसताना जवळ जवळ ४० मिनिटं ताटकळत उभे होते. अर्थात लोकं भेटत होती, फोटो काढत होती. आमची भेट झाल्यावर मनमोकळ्या गप्पा मारत उभे राहिलो. राजकीय भुमिका पटो न पटो, पण माणसाचा साधेपणा कमाल आहे! आज सामान्य पक्षीय पदाधिकारीदेखील लवाजमा घेतल्याशिवाय फिरत नाहीत, तिथे हा पक्षप्रमुख सामान्यासारखा पाठीवर सॅक मारुन रांगेत उभा राहतो हे विलक्षण आहे. बाय द वे, ज्या एअरपोर्टवर हे झालं त्या एअरपोर्टला यांच्याच आजोबांचं नाव आहे.
तरीही No VIP treatment! #Respect.

चिन्मय दीपक मांडलेकर
Chinmay Deepak Mandlekar
Balasaheb Ambedkar

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

बाबासाहेबांचा राजगृह बनतोय समग्र क्रांतीचा केंद्रबिंदू

रवि डिसेंबर 15 , 2019
Tweet it Pin it Email Pin it Email https://www.ambedkaree.com/chinmay-mandlekar/#RkJfSU1HXzE1NzY नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील #राजगृह या घराबाहेर मुंबईकरांनी एकत्र येऊन निदर्शने केली. – यावेळी फिल्म निर्माते महेश भट्ट हे सुद्धा उपस्थित होते. Pin it Email https://www.ambedkaree.com/chinmay-mandlekar/#RkJfSU1HXzE1NzY Pin it Email https://www.ambedkaree.com/chinmay-mandlekar/#RkJfSU1HXzE1NzY Pin it Email https://www.ambedkaree.com/chinmay-mandlekar/#RkJfSU1HXzE1NzY […]

YOU MAY LIKE ..