सागरपुत्र आणि कवी गायक. –राजाराम पाटील -उरण  प्रसिद्ध नेत्यांचे भाषण आणि प्रसिद्ध कवि गायकांचे गाणे कायमस्वरूपी कोणते आठवणीत राहते.कोणत्याही नेत्याचे एक तास भाषण ऐकून डोक्यात ठेवणे अवजड आहे,पण तेच गाणे असेल तर उठता बसता ते आपल्या तोंडात गुणगुणल्या शिवाय राहत नाही. एवढे कौशल्य त्या कवि गायकांच्या गाण्यात असते. म्हणूनच आगरी […]

“बिहारचे पलटू चाचा”. ■ दिवाकर शेजवळ ■divakarshejwal1@gmail.com अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणाला नितीशकुमार यांच्या राज्यात ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ असा रंग चढवला जात आहे. त्यामागे राज ठाकरे यांच्या मनसेने काही वर्षांपूर्वी मुंबईसह काही शहरांमध्ये उत्तर भारतीयांविरोधात घडवलेल्या उद्रेकाचे उट्टे काढण्याचे इरादे मुळीच नाहीत. त्यामागे आहे बिहारमधील जदयु- भाजपची सत्ता आगामी […]

भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान.! ३ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय लोकसभेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून भारताचे राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद  यांनी शपथ दिली . अस्पृश्य समाजातील पाहिले कॅबिनेट मंत्री .केंद्रीय कायदेमंत्री म्हणून पुढे 29 ऑगस्ट १९४७ ला डॉ बाबासाहेबांची भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून […]

मुलींना आत्मनिर्भर बनवा, घेऊ द्या आकाशात उंच भरारी. जस्टीस फॉर वैष्णवी…. अशा आशयाची बातमी वाचताच अंगात कापरं भरलं.. विचार आला की, आता कोणत्या वैष्णवीचा गळा घोटला गेला… कोणत्या वैष्णवीच्या स्वप्नाचा भंग केला.. कोणत्या वैष्णवीला हे सुंदर जग सोडून जावं लागलं.. काल्पनिक लिहीत नाही पण खरंच जस्टिस फॉर वैष्णवी.. या आशयाची […]

कालिना कॅम्पसची साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी करा! ■ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी ■ आंबेडकरी लोक संग्रामचे निवेदन ================= मुंबई,दि,३० जुलै २०२०: देशाच्या सीमा ओलांडून जगभरात पोहोचलेले महाराष्ट्राच्या मातीतील उत्तुंग साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दीची सांगता शनिवारी (१ऑगस्ट) होत आहे. त्याचे औचित्य साधून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सांताक्रूझ […]

ताराबाई शिंदे – स्त्री जातीचा हुंकार… काल आणि आज.   सत्यशोधक समाजाच्या तालमीत वाढलेल्या ताराबाई शिंदे 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना नामक छोटासा ग्रंथ लिहिला होता. ताराबाई शिंदे यांचे वडील बापूजी हरी शिंदे सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष होते . ताराबाई यांच्या कुटुंबावर सत्यशोधक चळवळीच्या विचारांचा वारसा होता . बापूजी शिंदे यांनी आपली […]

कोरोना लॉक डाऊनने जगण्याची नवीन शिकवण दिली. -सागर रामभाऊ तायडे  असंघटित नाका कामगारांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठेसाठी १९८२ पासुन शहरातील नाक्यावर कामासाठी उभे राहणाऱ्या कामगारांना संघटित करून न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतांना अनेक अनुभव आले. सकाळी सात वाजता पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणताही कामगार नाक्यावर उभा राहिला तर त्याला शंभर […]

आरक्षण Reservation म्हणजे नक्की काय?.राजर्षी शाहूमहाराजानी ते का दिले?. ************************************* -सागर राजाभाऊ तायडे -भाडुप,मुंबई ************************************** ज   आरक्षणामुळे देश ढवळून निघाला आहे.समतावादी व्यवस्था लोकशाहीच्या मार्गाने सत्तर वर्ष राज्य करीत असतांना विषमतावादी व्यवस्था मनुस्मृतीच्या मार्गदर्शक तत्वाने आरक्षण आरक्षण करीत राजकीय सत्ता स्थानी स्थिर झाली.त्यामुळेच आरक्षण हा विषय प्रत्येक समाजात खुपच जोर […]

“वारणेचा वाघ जर सिंहाच्या कळपात आला असता तर”.. …. वाटेगाव , वारण्याचं खोरं आणि माटुंगा लेबर कॅम्प ह्याच माझं पहिल्यापासून नातं. माझं आजोळ कराड जवळ विंग, आईच्या आईच (आजीच) माहेर वाटेगाव. माझ्या आईच्या मामाला सगळे वाटेगावकरच म्हणायचे. लहानपणी बहुतेक वेळा आम्ही वाटेगावला जायचो. वारणा खोरे डोळे भरून पहायचो. त्यावेळी समजल […]

मुक्ती कोण पथे? -डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही परिषद मी केलेल्या धर्मांतरच्या घोषणेचा विचार करण्याकरिता मुद्दाम बोलवण्यात आलेली आहे हे तुम्हास कळून चुकले आहेच.धर्मांतरचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे .इतकेच नव्हे,तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्याच्यावर अवलंबून असल्या कारणाने तो विषय मला अत्यंत महत्त्वाचाही वाटतो.हे महत्त्व तुम्हा सर्वांना […]