बुद्ध महोत्सव : काळाची गरज ओळखून टाकलेले पाऊल !-पत्रकार गुणाजी काजिर्डेकर यांचे प्रतिपादन

बुद्ध महोत्सव : काळाची गरज ओळखून
टाकलेले पाऊल !
पत्रकार गुणाजी काजिर्डेकर यांचे प्रतिपादन

कोल्हापूर. प्रतिनिधी
बुद्ध महोत्सव ही काळाची गरज असून, चक्रवर्ती सम्राट राजा अशोकांच्या कार्याला उजाळा देण्याचे काम कोल्हापुरासारख्या ऐतिहासिक नगरीतून होणे ही मोठी क्रांतिकारी घटना असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार गुणाजी काजिर्डेकर यांनी केले. धर्मप्रामाण्यवादी विचारधारा धुमाकूळ घालत असताना घराघरात, बुध्द-बाबासाहेबांच्या विचारांची पूजा करण्याचा संकल्प प्रत्यक्षात कृतीत आणणाऱ्या तमाम बंधु-भगिनींना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच या शब्दात काजिर्डेकर यांनी गौरव केला.

२००५ साली ” दैनिक मुक्तनायक ” चे संपादक देवदास बनकर यांच्या संकल्पनेतून बौद्ध महोत्सव साकार झाला. आणि आज घराघरातून बुद्ध-बाबासाहेबांच्या प्रतिमांसह विचारांची पूजा करण्याकडे कल राहिला आहे. याचाच भाग म्हणून रविवार दिनांक ८सप्टेंबर २०१९.रोजी, कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी अतिंग्रे, तर. हातकणंगले येथे बौद्ध महोत्सववाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शनपर गुणाजी काजिर्डेकर बोलत होते.
क्षया कार्याबद्दल देवदास बनकर यांचे अभिनंदन करून, धम्मचळवळीला आलेली मरगळ झटकून, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला विचार कृतीत आणण्याचे होत असलेले पाहिल्यावर लवकरच त्याचा झंझावात अन्य जिल्ह्यात पोहचल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद काजिर्डेकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केल्यानंतर देवदास बनकर यांनी बौद्ध महोत्सवाच्या आयोजनामागील हेतू व उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रममाचे सूत्रसंचालन वाय. सी. कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु. शुभांगी भीमसेन कारवेकर यांनी केले.
यावेळी परिसरातील उपासक- उपासिका आवर्जून उपस्थित होत्या. वसंतराव सूर्यवंशी, सौ. सविता संजय कांबळे, माधुरी चंद्रकांत कांबळे, रुक्मिणी नामदेव कांबळे, रेखा दिलीप कांबळे, अलका कुमार सूर्यवंशी, अंजना प्रकाश कांबळे, रुपा अजित कांबळे, कुंदा शिवाजी सूर्यवंशी, निकीता तानाजी सूर्यवंशी, ज्योती प्रकाश सूर्यवंशी, प्रतिमा अर्जुन कुरणे, भाग्यश्री प्रकाश सूर्यवंशी, संध्या भास्कर कांबळे, लक्ष्मी महावीर कांबळे, सुवार्ता शामराव ढाले, कांद्याची वसंतराव सूर्यवंशी, अमोल रमेश डोणे (कुभोज), मिलिंद वसंतराव सूर्यवंशी, विद्यमान चंद्रकांत सूर्यवंशी, भीमसेन कारवेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथेने करण्यात आली.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

सामाजिक चळवळीतील अग्रणी आद दि.एकनाथ आवाड ' यांचे प्रेरणादायी आत्मचरित्र "जग बदल घालूनी घाव " वाचण्यासारखे बरेच काही..!

शुक्र सप्टेंबर 13 , 2019
Tweet it Pin it Email सामाजिक चळवळीतील अग्रणी आद एकनाथ आवाड ‘ यांचे प्रेरणादायी आत्मचरित्र “जग बदल घालूनी घाव ” वाचण्यासारखे बरेच काही..! “मी जन्मानं एकनाथ दगडू आवाड. माझे आईबाप मांग. धर्मानं हिंदू. माझ्यावर धाडले गेलेले मारेकरीही मांग. धर्मानं हिंदू . समोर कुणीही असू दे पार्था, हत्यार उचल. मारणं- मरणं […]

YOU MAY LIKE ..