मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेने मराठी माणसाच्या हौतात्म्याच्या अपमानाबद्दल प्रज्ञासिंगचा निषेध का केला नाही? – ऍड.बाळासाहेब आंबेडकर

मराठी माणसाच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेने मराठी माणसाच्या हौतात्म्याच्या अपमानाबद्दल प्रज्ञासिंगचा निषेध का केला नाही? – ऍड.बाळासाहेब आंबेडकर

मुंबईकरांसाठी जीवावर उदार होऊन दहशतवाद्यांशी मुकाबला करून आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या पोलिसांचा अपमान करणाऱ्या प्रज्ञा सिंगचा निषेध शिवसेनेने का केला नाही? असा रोखठोक सवाल एड.बाळसाहेब आंबेडकर यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुर्ला पूर्व येथे केला.ते वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन महासभेत बोलत होते.

देशातील लोकसभा निवडणुकाच्या शेवटच्या टप्याचा प्रचार आटोपत असताना आज मुंबईत दोन ठिकाणी सभा होत्या.यात बांद्रा येथे भाजप-सेनेची सभा होती.या सभेत नेहमीची भाषणे करून शिवसेना भाजप युतीच्या नेत्यांनी २०१४ चीच टेप वाजवली.आपण पाच वर्षे सत्ता देवून काय विकास केला? कोणता विकास केला? याबद्दल कुणीही ब्र शब्द काढायला तयार नसल्याचे दिसले.

तिसरीकडे नाशिकमध्ये मनसे नेते राज ठाकरे यांनी भाजपची व्हिडीओ लावून पुन्हा पोलखोल करून भाजप8ज शिवसेनेला मतदान न करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.राज ठाकरे यांनी कोणताही उमदेवार उभा केला नसल्याने त्यांच्या भाषणाने प्रभावित झालेल्या आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या राजकारणाला कंटाळून भाजपला सत्ता देणाऱ्या जनतेला वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे पारडे अगोदरच जड झालेले आहे.

वंचित बहुजन आघाडीने समाजातील जातीपातीमधील उसवलेली सामाजिक वीण घट्ट करण्याचे काम केले आहे.इतर जातींना उमदेवारी दिल्याने त्यांना प्रतिनिधित्व देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे.यामुळे पुढील काळात इतर वंचित समाज घटकांचा विकास होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

जनतेची फसवणूक करून शिवसेना-भाजप युतीने जनतेचा भ्रमनिरस केल्याची चर्चा मैदानातच रंगली होती.आता EVM घोटाळा झाला नाही तर भाजप-शिवसेनेच्या उमदेवारांना निवडून येता येईल की नाही असा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे.

एकूणच मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानामुळे शिवसेना भाजपला मुंबईतील जागांवर पाणी सोडावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

सिद्धार्थ मोकळे यांना 'प्राउड महाराष्ट्रीयन 2019' पुरस्कार जाहीर!

बुध मे 1 , 2019
Tweet it Pin it Email विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यासाठी दैनिक दिव्य मराठीच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त देण्यात येणारा ‘प्राउड महाराष्ट्रीयन 2019’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ‘यंग पॉलिटीशीयन’ कॅटगीरी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात […]

YOU MAY LIKE ..