सरकार झोपले आहे आणि राज्यात दुसरे खैरलांजी घडले आहे…..!

मीडिया ही जातीय वादी आहे का……?

सरकार झोपले आहे आणि राज्यात दुसरे खैरलांजी घडले आहे…..!

पुन्हा #सिल्लोड हादरलं…
डोंगरगाव सिल्लोड येथील 32 वर्षीय दलित महिला तिच्या सात वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन गवत आणायला गेली. शनिवारपासून ती गायब होती. पीडितेच्या कुटुंबांनी मिसिंग केस पण दिली होती. आज त्यांच्या दोघीचे विहिरीत प्रेत आढळून आले. जीभ बाहेर आलेली आहे, डोळे बाहेर आलेले आहेत, गुप्तांगात काढया आढळून आलेल्या आहेत, प्रथम दर्शनी बलात्कार, फाशी आणि मग विहिरीत फेकल्याचे आढळून येत आहे. दि. 18 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 8.30 वाजता घाटी रुग्णालयात पोस्टमार्टम होणार आहे.

वंचित चे अमित भुईगळ घटनास्थळी.
आज या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे नेते अमित भुईगळ, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार, वंचितचे जिल्हा अध्यक्ष योगेश बन, वंचितच्या महिला अध्यक्षा लता बामणेताई, पीपल्स व्हाईसचे रवी गायकवाड, वंचितचे शहर अध्यक्ष संदीप शिरसाठ व वंचितचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रशासनावर दबाव आणण्याचं काम केलं. जोपर्यंत आरोपीचा छडा लावला जाणार नाही, तोपर्यंत प्रेत हातात घेणार नसल्याची भूमिका पीडितेच्या कुटुंबियानी घेतली आहे. यावेळी इनकॅमेरा पोस्टमार्टमची मागणी करण्यात आली पोलिसांनी असं करता येत नाही म्हणून विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला यावेळो अमित भुईगळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलून इनकॅमेराच पोस्टमार्टम करण्याची भूमिका सांगितली तेव्हा “होय आम्ही इनकॅमेरा करतो” म्हणून त्यांनी ग्वाही दिली आहे. सकाळी 8.30 वाजता घाटीत आंबेडकरी कार्यकर्त्यानी यावं.

सिल्लोड मधील ही दुसरी घटना असून अंधारीच्या जवळच असलेलं हे डोंगरगाव आहे. सिल्लोड तालुका दलित अत्याचारग्रस्त तालुका झाला आहे. लवकरच सिल्लोड बंदची हाक देण्याचा इशारा यावेळी सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यानी दिला आहे.

ही घटना दुसरी खैरलांजी असून मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. महाराष्ट्र्रात तालिबानी सरकार आहे का असा प्रश्न पडतो आहे. मिसिंग केस केल्यावर दलित महिला गायब आहे म्हटल्यावर पोलिसांनी खोलवर चौकशी केली पाहिजे होती. परंतु मिसिंग झाली तुम्हीच शोधा, खून झाला प्रेत तुम्हीच काढा, आणि आरोपी सुद्धा तुम्हीच शोधा अशी भूमिका या उदासीन यंत्रणेची दिसुन येत आहे. दलित महिला या राज्यात सुरक्षित नाहीत, कमजोर असणाऱ्यांवर असाच अत्याचार होत राहणार?


ही दुसरी खैरलांजी आहे या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेना जाहीर निषेध करत आहे. गृहमंत्री महाराष्ट्रात दलित सुरक्षित राहणार की नाही याच उत्तर द्या नाही तर निष्क्रिय आहे म्हणून घोषित करून राजीनामा द्या.
#JusticeForBuddhist.

सभार fB सोशल मीडियावर जोरात व्हायरल झालेल्या पोस्ट वरून

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

#आंबेडकरी #डॉट #कॉम चा एक तरुण शिलेदार काळाच्या पडद्याआड....!

मंगळ फेब्रुवारी 18 , 2020
Tweet it Pin it Email Pin it Email https://www.ambedkaree.com/sillod-budhist-women-killing/#SU1HXzIwMjAwMjE #आंबेडकरी #डॉट #कॉम चा एक तरुण शिलेदार काळाच्या पडद्याआड….! #सनदी अधिकारी सुदर्शन गांगुर्डे यांचं अपघाती निधन. फेसबुकवर जवळचा मित्र नव्हेच तो लहान भाऊ होता ……! #अचानक भेटलेला…….आवाज दिला आणि दादा तुझ्याबरोबर काम करेन म्हणूण पहिली आंबेडकरी चा कंटेंट इंग्रजीतून लिहून तयार […]

YOU MAY LIKE ..