धडपडणाऱ्या मुलाच्या मागे उभा बाप माणूस- मुलाला बनविला एक यशस्वी उद्योजक

धडपडणाऱ्या मुलाच्या मागे उभा बाप माणूस – सामाजिक जान असणारा व्यवसाहिक प्रत्यक्ष कृतीतून …..मुलाला बनविला एक यशस्वी उद्योजक

सुबोध मधुकर जाधव या तरुणाची व्यवसाय करण्याची धडपड …

आपला मुलगा काहीतरी करू इच्छित आहे तयाला सहकार्य करून आपल्या सरकारी नोकरीतून त्याला पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभे करुन त्याला त्याच्या मेहनतीने अन प्रमाणिकपणाच्या जोरावर मिळलेल्या एका लहानशा दुकानाचे एक व्हरायटी शु शोरूम मध्ये रूपांतर करणाऱ्या सुबोध मधुकर जाधव आणि त्याच्या वडिलांची ही प्रेरणादायी गोष्ट.


सुबोध आणि त्यांचे वडील मधुकर जाधव यांच्या
इथपर्यंतचा प्रवास आणि त्यासाठी त्यांनी केलेली चिकाटी हे अत्यंत उल्लेखनीय अन दाखल घेण्यासारखी बाब आहे .

www.ambedkaree.com शी बोलताना सुबोध म्हणाले की या सर्व प्रवासात महत्त्वाचा भाग म्हणजे माझे व्यवसाहिक गुरू व माझे या दुकानाचे पूर्वीचे मालक लोटलीकर शेठ यांचा करण त्यांनी मला व्यवसाय कसा करावा .प्रामाणिकपणे काम केल्यावर कसे पुढे जाता येईल याचे मार्गदर्शन त्यांनी घालून दिलेली शिस्त, हे महत्त्वाचे त्यांनी मला मुलासारखे शिकविले ,घडवले माझ्यावर विश्वास दाखवला व माझ्यातील गुण ओळखून मला एक खूप मोठीं संधी दिलीं.मी जो आहे तो केवळ त्यांनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे व्यवसायातील चिकाटी ,सातत्य अन नफा तोटा यावर कधीही गोंधळ न करता आपल्या मेहनतीने व योग्य रीतीने ग्राहकांना सर्व्हिस दिली त्यांच्या कलाने व्यवसाय केला की यश येते हे त्यांनी शिकविले व आत्मविश्वास दिला

.बाबांनी पाठीमागे आधार दिलाच व मी करत असलेल्या व्यवसायाला मदत व वेळही दिला व ते देत आहेत असे ही ते म्हणाले

स्वतः आंबेडकरी चळवळीतील सक्रिय असणारे मधुकर जाधव आपण एक यशस्वी उद्योजक घडविणारे आहोत याचा काधीही बोभाटा केला नाहीय की मी एका व्यवसाहिक मुलाचा बाप आहे आणि त्याला घडविणारा मी ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एक व्यवसाहिक आहे, माझा अनुभव,माझे मत तुम्ही ऐकलेच पाहिजे असे कधीही न करता एकदम अजात शत्रू बनून आणि कायम एक विध्यार्थी बनून सामाजिक चळवळीत जमेल तसे कार्य करीत असतात.

आपला मुलाचे शिक्षण चालू होते त्याच बरोबर त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभे राहता ही आले पाहिजे म्हणून त्याला त्याची आवड बघून फूट वेअर च्या दुकानात २००६ ला काम करावयास दिले त्याची त्या व्यवसाय करण्याची पद्धत आणि व्यवसाय वाढविण्यासाठी लागणारी प्रामाणिकता व मेहनत यावर ते दुकान वाढत गेले पुढे ज्या दुकान मालकाकडे कामाला असणाऱ्या सुबोध ला त्याच्या मालकाने काही कारणास्तव हे दुकान पूर्णवेळ याच्या मेहणत आणि प्रामाणिकता पाहून चालवायला दिले .बदलापूर शहरात कात्रप रोडवर असणाऱ्या पादुका फुट्वेअर शो रूम समोर असणारे एकमेव नावाजलेले दुकान . पुढे त्या मालकाने पूर्णपणे सुबोध ला चालवाव्यास दिले व त्यानंतर त्याचा पूर्णपणे बदल केला. सुबोध ची धडपड पाहून सामाजिक चळवळीत करणारे मधुकर जाधव आपल्या मुलाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले व त्याला व्यावसायत लागेल ती मदत करू लागले.


त्याच दरम्यान त्यांना समाजातील ही अशा धडपणार्या मुलांची जाणीव झाली त्याच्या अडीअडचणी या जवळून अनुभवता आल्या .पण व्यवसायातुन उभे राहणारे आर्थिक सामर्थ्य ही अनुभवता आले मग त्यासाठीं मग आपल्या अवतीभवती अशा धडपणार्या मुलांसाठी काही करता येईल का यावर विचारचक्र सतत डोक्यात होते असे मधुकर सांगता ना म्हणाले की आपल्या कोकणातील तरुण मुंबईत कमी पगाराच्या आणि हलक्या कामाच्या नोकरी करतात त्यातून त्यांची अवस्था एकदम गुदमरून जाते यावर काही उपाय मिळतो का वेगवेळ्या लोकांना भेटून अन संपर्क करून आपल्या मानातिल ही बाब कित्येक वर्षांपासून चालू होती पण त्याला वेग व्हाट्स च्या माध्यमातून आला .त्यानी काम चालूच ठेवले अन आपल्या सहकाऱ्यांनी एक संस्था उभी केली त्या सहकारी तत्वावर उभ्या असलेल्या अस्मिता चे खरे

सहसंस्थापक असलेले मधुकर जाधव आपल्यातील व्यवसाहिक नवी पिढीत निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत.

www.ambedkaree.com ने नुकतीच अचानक त्यांच्या बदलापूर च्या शांती फूट वेअर शोरूम ला भेट दिली अन नंतर उलगडला त्यांचा प्रवास .राजापूर येथील शेजावली या खेडेगावात प्राथमिक अन राजपुरात माध्यमिक शिक्षण घेऊन पुढे मुंबई महानगर पालिकेत नोकरी करत आपल्या मुलाला अर्थात सुबोध ला त्याचा मालकाने दिलेले शानदार फुट्वेअर चे दुकान त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच दुकानाचे मोठे नावाजलेले फुट्वेअर चे शोरूम उभा केलाय आज बाटा, पॅरोगोनअकॅशन ,नायकी……आदि सारखे ब्रँड च्या बिग रिटेलेर म्हणून बदलापूर कात्रप रोड वर एकमेव नावाजलेले दुकान म्हणून ओळखले जाते .

समोर पादुका सारखा मोठा शोरूम असून ही यांच्या कॅडे ग्राहकांचा कल जोरदार असतो.अर्थात ते म्हणतात याला जास्त मेहनत आणि पूर्णपणे वाहून घेतले ते सुबोध ने आज जे काही यश आहे ते सुबोध चे त्याच्या मेहनतीने ते त्याने केले त्याला मार्गदर्शन अन लागेल ती मदत केली .

एका आंबेडकरी तरुणाला प्रत्यक्ष उद्योजक घडविणारे मधुकर जाधव पूर्वी भेटायचे चर्चा व्हायचा त्यांची समाजाविषयी असलेली तळमळ आणि तरुणांना व्यवसाहिक बनविण्यासाठी असलेली धडपड यावर त्यांच्या विषयी आदरपूर्वक मानसन्मान वाटायचाच पण काल त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर एक उद्योजक घडविणारा कृतिशील पिता पाहिल्यावर त्यांच्याप्रती आदर आणखीनच वाढला .

कालच्या धावत्या भेट केवळ मोजून 3 मिनिटांचीच कारण दुकानाच्या आत ग्राहकांची भरपूर गर्दी होती अन त्या गर्दीत त्यांना अडचण करणे योग्य नव्हे .
जास्त न बोलता आम्ही निघालोच …..!
मधुकर जाधवांशी खास मुलाखत पुढील वेळी सविस्तरपणे….!

-चळवळी करणारे हात जेव्हा स्वतः कृतिशील असतात…..!.

प्रमोद रामचंद्र जाधव
www.ambedkaree.com

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

कलासक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर........!

रवि जून 23 , 2019
Tweet it Pin it Email डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना विविध कलांची उत्तम जान होती. बाबासाहेब…..! Pin it Email https://www.ambedkaree.com/shanti-foot-wear-badlapur-subodh-mdhukar-jadhav/#SU1HXzIwMTkwNjI ते वयाच्या बारा – तेराव्या वर्षी उत्तम तबला वाजवत. स्थानिक भजनीमंडळात आपल्या तबला वादनाची चुणुक ते वेळोवेळी दाखवत. एकदा गल्लीतल्या भजनाच्या कार्यक्रमाला तबला वाजवणारा माणूस आला नाही त्यावेळी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

YOU MAY LIKE ..