कोरोनावर मात करेल रमजान?

कोरोनावर मात करेल रमजान?
*************************************

सागर रा तायडे -भांडुप www.ambedkaree.com

जगातील मानव जातीला कोरोनाने जमिनीवर आणून सोडले.जात धर्म,प्रांत,भाषा,वेशभूषा,गरीब श्रीमंत उच्च नीच सर्व एकाच खाटेवर झोपण्यास मजबूर केले.माणसांनी माणसावर प्रेम करावे द्वेष भावना ठेऊ नये,शक्यतो एकमेकांना मदत करावी हेच शिकविले. माणुस कोणत्याही जाती धर्माचा राज्याचा प्रांताचा असो त्यांचीशी प्रेमाने बोलावे त्यांच्या सुखदुःखाची काळजी घ्यावी, कोणताही धर्म नफरत करा असे सांगत नाही. प्रत्येक धर्माचे शांतीचा संदेश देणारे सण आहेत.त्यासाठी त्यांना त्या दिवसात चांगले काम व विचार करण्यासाठी मानसीक शारीरिक दृष्ट्या तयार केल्या जाते.हिंदू धर्मातील सहा हजार सहाशे जातींना भट ब्राम्हण लोक हिंदू म्हणून एकत्र ठेऊन आणि त्यांच्या कडून ब्राम्हणाच्या कट कारस्थानेचे दिवस म्हणजे विजय,पराजयाचे दिवस मोठ्या संख्येने सण म्हणून साजरे करण्यास लावतात.जसे कि श्रावण का पाळतात. त्या महिन्यात पोथ्या,पुराण,धर्म ग्रंथ वाचतात.काही आठवडे सोमवार कडक उपवास ठेवतात,दाढी सुध्दा करीत नाही.नंतर गटारी अमावस्या साजरी करतात.बौद्ध धम्म मानणारे लोक वर्षावास तीन महिने पाळतात.तेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म, मिलिंद प्रश्न त्रिपटक सारखी ग्रंथ सामुदाहिक पणे वाचतात.नंतर धम्माला शरण जातात पण संघाला संघटनेला शरण जात नाही. म्हणजेच पंचशिलेचे पालन करीत नाही.असाच मुस्लिम समाजातील रमजान महिना असतो.तो समाजाला,शांती समता व स्वातंत्र्य मिळवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवितो, त्यासाठी कडक उपवास म्हणजे रोजा पकडला जातो. प्रत्येक धर्माचे हे सण मोठया संख्येने साजरे केले जातात.तेच सण दरवर्षी नवीन प्रेरणा घेऊन येतात. तरुणांना धार्मिक रितीरिवाज संस्कार, सांस्कृतिक वारसा देऊन जातात.श्रावण महिना,वर्षावास आणि रमजान काय आहेत हे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना त्यांचे महत्व कळणार नाही. त्यासाठी त्यांचे त्यांना पालन करावे लागेल.


हिंदू धर्मात श्रावण पाळण्याचे सांगितले आहे. बुद्ध धम्मात वर्षावासात पंचशिलेचे पालन करायचे सांगितले आहे. महंमद पैगंबर रमजानच्या पवित्र महिन्यात काय करायला सांगतात. पाहिले इमान,दुसरा नमाज,तिसरा रोजा चौथा हज आणि पाचवा जकात या पाच कर्तव्य प्रत्येक माणसाने पार पाळले पाहिजे. श्रावण महिन्यात, वर्षावासात आणि रमजान मध्ये लहान मुलामुलींना धर्माचे संस्कार,व सांस्कृतिक कार्याची माहिती दिली जाते. चांगला नागरिक बण्यासाठी या पाच महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्याला जात,धर्म प्रांत,भाषा,वेशभूषा कोणीच अडवू शकत नाही. म्हणूनच रमजान हा केवळ इस्लाम मानणारा मुस्लिम समाज व मुसलमान हेच साजरा करू शकतात असे नाही. माणूस बनण्यासाठी पांच चांगले गुण माणसांच्या आचरणात असले पाहिजे.इथे दोन उदाहरण देतो.एक देशाचा राष्ट्रपती,दुसरा सरन्यायाधीश विचारांने अधिकारांने खूप मोठ्या पदावर विराजमान होते. पण आचाराने गुलाम झाले.कोणता आदर्श निर्माण करूच शकले नाही.धर्माचे संस्कार,शिक्षण हे वाघिणीचे दुध असते.यांनी काय सिद्ध करून
दाखविले.असो…



पंचशिलेचे पालन करणारा कोणीही असु शकतो. इस्लाम मध्ये सांगितलेल्या पाच कर्तव्याचे पालन करणारा कोणीही असु शकतो.माणसाला माणसासारखे वागविण्याची शिकवण देणारा धर्म व धम्म जगात ओळखला जातो. जो माणसासोबत माणसासारखा वागत नसेल तर तो माणूस असु शकत नाही.तो ब्राम्हण असु शकतो. म्हणूनच माणसं ओळखण्यासाठी धर्माची धम्माची शिकवण मुलामुलींना लहानपणापासून दिली पाहिजे. सर्वच मुस्लिम मुसलमान नाहीत.जो मुसलमान पांच कर्तव्याचे पालन करत नसेल तर तो इस्लाम मानणारा असु शकत नाही.इस्लाम मानणारा मुस्लिम इमानदार, नमाज पडणारा, रोजा ठेवणारा,हज करून आलेला आणि न चुकता समाजाच्या उन्नतीसाठी जकात दरवर्षी भरणारा असतो. मानव प्राण्यावर नेहमी प्रेम करतो.सहानुभूती दाखवितो आणि नियमितपणे सहायता करतो.कोरोनाने सर्वानाच देवा धर्माच्या मंदिर मशिदी पेक्षा दवाखाना किती महत्वाचा आहे.त्यात डॉक्टर,नर्स,टेक्नीशयन प्रशिक्षित असले पाहिजेत. डॉक्टर नर्स एवढेच वार्डबॉय,आया,मावशा यांचे काम ही लक्षवेधी असते.त्यांच्या सकारत्मक आणि नकारत्मक विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या आचरणातून दिसून येते. कोरोनामुळे सर्व सरकारी दवाखाने रुग्णाने प्रमाणापेक्षा जास्त संख्येने भरलेले आहेत. डॉक्टर,नर्स,वार्डबॉय,आया,मावशा कामगार कर्मचारी कोणतेही कारण सांगून सुट्टी घेऊन जबाबदारी टाळत नाही.आठ दिवस घरी जाण्यास मिळाले नाही,शांततेची झोप नाही.तरी रुग्णाची मानव सेवा करीत आहेत. कारण त्यांनी कामावर लागतानाच तसे लिहून दिले असते.मी पैसे कमविण्यासाठी नोकरी करीत नाही तर समाजाला देशाला सेवा देण्यासाठी नोकरी करतो. खाजगी दवाखान्यातील डॉक्टर नर्स,वार्डबॉय,आया, मावशा यांच्या कडून आपण कोणतीही अपेक्षा ठेऊ शकत नाही.ते मिनिटाला तासाला पैसे वसूल करतात. कोरोनाने सर्वच माणसाला खाजगी आणि सरकारी यातील फरक ठळकपणे दाखवून दिला.त्याच बरोबर श्रद्धा,अंधश्रद्धा,अज्ञान आणि विज्ञान यातील महत्व शंभर टक्के पुराव्यानिशी सिद्ध करून दाखविले. म्हणूनच रमजान कोरोनावर मात करेल.
रमजान मध्ये रोजा पकडणे म्हणजे सर्व वाईट कामावर सवयीवर विजय मिळविण्यासाठी तयार करणे होय.रोजा पकडला असेल तर वाईट मार्ग पासुन दूर राहिले पाहिजेच व वाईट लोकांच्या जवळ पास थांबायला मनाई असते.रोजा जेव्हा पकडला जातो तेव्हा भूख प्यास काय असते यांची त्यांना जाणीव होते त्यामुळेच भुख्या प्यास्या माणसाला पाहून रोजा पकडणाऱ्याच्या मनात दया उत्पन्न होते. सकारत्मक विचाराचे मनात घर पक्के होते.त्यातुनच दान करण्याची इच्छा होते.त्यामुळे पुण्य लाभते,मनाची एकाग्रता लागते.उत्पन्नात मोठी वाढ होते.रोजा सुरू असतानांच वर्षभराची जकात भरला जातो.रोजा पकडणाऱ्या व्यक्तीत बद्दल समाजात आदर निर्माण होतो.खोटे बोलून फसवणूक करणे,हिंसा करणे,निंदा, चुगली करणे भ्रष्टाचार करणे यापासून वेगळे राहण्याची प्रेरणा मिळते.म्हणूनच एक महिन्याच्या रोजात या सर्व वाईट गोष्टी पासून वर्षभर दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली जाते.कुराण मध्ये अल्लाने सांगितले आहे की रोजा स्वतःला शुद्ध विचारांचा करण्याची पहिली पायरी आहे.त्यामुळे तुम्ही वाईट कामा पासुन स्वतःचे रक्षण करू शकता त्यापासुन दूर राहू शकतात. अल्ला खुदा च्या अस्तित्व मान्य करा त्यांची मनात आदरयुक्त भीती निर्माण करा.त्यामुळेच सर्व क्षेत्रातील मुसलमान अमीर,गरीब,उच्च शिक्षित अडाणी मशिदीत एक लाईन मध्ये नमाज पडायला उभे राहतात.जो जसा येईल तो तसाच लाईन मध्ये उभा राहून नमाज पडतो. त्यांच्या मनातील सर्व विकार नष्ट होऊन विनम्र पणे तो सर्वच्या मध्ये उभा राहतो तेव्हा तो फक्त पांच कर्तव्य पार पाडणारा माणूस असतो.म्हणूनचं तो रमजान घरात नमाज पडून कोरोनावर मात करेल .

मशिदीत सर्व सामान असतात सर्वनां सामान स्वातंत्र्य अधिकार असतात.हिंदूंच्या मंदिरात असे पाहण्यासाठी मिळेल काय?. ब्राम्हण सर्व श्रेष्ठ, जास्त पैसे देणारा दानशूर समाजसेवक मग तो किती भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारा असो तो मोठा भक्त ठरतो.हिंदू धर्मात वर्णाला महत्व आहे. ब्राम्हण बनिया सर्व श्रेष्ठ असतात बाकी क्षेत्रिय, शूद्र,अतिशूद्र शूरवीर, कलाकौशल्य निपुण्य असले तरी ते समता, स्वातंत्र्य व अधिकारांचे हकदार नसतात.देशाचा राष्ट्रपती सुद्धा नाही. हेच संस्कार व सांस्कृतिक शिक्षण लहानपणा पासुन शिकविले असल्यामुळे मोठे झाल्यावर ही मुलं मुली उच्च पदस्थ अधिकारी झाल्यावर लोकशाही, मानव अधिकार किंवा माणसाला माणसासारखे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्यात नसतो.त्यामुळेच त्यांना देशातील सर्व मुसलमान गुन्हेगार वाटतात.जे व्यभिचार,चोरी, मारामारी, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतात ते अल्ला ने सांगितलेल्या पांच कर्तव्य मानणारे नसतात.म्हणूनच ते स्वतः बरोबर मुस्लिम समाजातील पांच कर्तव्य इमानदारीने पार पाडणाऱ्या समाजाला बदनाम करतात.

रोजा पकडणारा एका वर्षी रोजा पकडला तर जिवंत असे पर्यत रोजा पकडतो.आरोग्य ठीक नसेल शरीर साथ देत नसेल तरी तो नमाजाच्या वेळी जिथे असेल तिथे डोळे बंद करून हात जोडून आपले कर्तव्य पार पाडतो.आजूबाजूला कोणतेही वातावरण असु द्या त्याला त्यांच्या कर्तव्यापासून कोणीच रोखू शकत नाही. म्हणूनच रमजान महिन्यातील रोजा हा कोणा विषयीही मनात कटुता न ठेवता सार्‍यांप्रती प्रेमभावना व्यक्त करण्याचे हे दिवस असतात. कोरोना महासंकट असतांना रमजान आला.काही ब्राम्हण पेशवे दंगल कशी घडविता येईल यांचे नियोजन करीत आहेत. भिम जयंती ने त्यांचे सर्व मनसुभे उधळल्या मुळे त्यांचे लक्ष रमजान वर केंद्रित केले आहे. परंतु मुस्लिम समाज घरात नमाज पडून रोजा सोडून कोरोनावर मात करण्यासाठी संघटित आहे हे तो दाखवून देणार आहे.

‘प्रेम दिल्याने वाढते’ असे म्हणतात. त्यामुळे या सणाच्या माध्यमातून विविध धर्मीयांमध्ये प्रेम वाढीस लागावे, अशी अपेक्षा असते. डिजिटल इंडिया, स्मार्टफोनच्या आजच्या वातावरणात ती आता काळाची गरज ठरू पाहत आहे. यातूनच विश्‍वबंधुत्वाची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे. रोजे म्हणजे फक्त उपवास किंवा उपाशी राहणं नव्हे तर या काळात रोजेदाराने काही मानसिक आणि व्यावहारिक नियम पाळणेही बंधनकारक असते.रमझानच्या काळात डोळे, कान आणि तोंडाचा चुकीचा वापर वर्ज्य आहे. म्हणजेच वाईट ऐकणे, बघणे किंवा बोलणे या तिन्ही गोष्टींना या काळात मनाई असते. रोजा म्हणजे रोखणे. परंतु या काळात केवळ तहान-भूक या गोष्टींवरच नियंत्रण आणले जाते असे नाही तर अनेक चुकीच्या गोष्टी कायमस्वरूपी दूर फेकण्याची प्रेरणा देऊन जाणारा महिना किंवा वार्षिक उत्सव असतो. आता त्यात चांगले घेणारा चांगलेच घेणार!. वाईट विचार करणाऱ्या माणसाला तुम्ही किती चांगले सांगा तो या कांनाने ऐकणार व दुसऱ्या कांनाने सोडून देणार. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वता पासुन करावी लागते. मग श्रावण महिना असो की वर्षावास असो. रमजान महिन्यातील रोजा तो स्वतःला करावा लागेल. तेव्हाच त्यांचे महत्व समजून घेता येईल.

रोजा पकडण्याच्या काळात गरीब, निराधार व्यक्तींची मदत करण्याला मोठे महत्त्व असते. आपण जो आहार घेतो तोच आहार या व्यक्तींनाही दिला जायला हवा म्हणून रोजा एकटा माणूस कधीच सोडत नाही. तो सर्वाना सोबत घेऊन सोडला जातो. या काळात प्रत्येक मुस्लीम धर्मीयाने सदाचारी वर्तन ठेवणे बंधनकारक आहे.म्हणूनच तर समाजातील सर्व घटकांना गोरगरीब कष्टकरी फेरीवाले, रिक्षावाले सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक रोजा सोडण्याचा टेबल लावतात.येणारे जाणारे त्यांच्या कडे कौतुकाने पाहतात.कारण हा रोजा घराच्या चारभीतीच्या आत होणारा व्यक्तिगत सण नाही.तर समाजाला योग्य मार्ग दाखविणारा राष्ट्रीय पातळीवर संस्कार देणारा सण आहे. कोरोना च्या संकटामुळे तो आता सार्वजनिक ठिकाणी साजरा करता येणार नाही.कारण सर्वचेच रस्त्यावर चे धंदे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.

या काळात खोटे बोलणे, बदनामी करणे, एखाद्याच्या पाठीमागे त्या व्यक्तीबद्दल अनुद्गार काढणे, खोटी शपथ घेणे आणि लोभ धरणे या गोष्टींमुळे रोजाचे फळ मिळत नाही. उपवासा सोबतच मानसिक आचरण शुद्ध ठेवणं रमजान काळात गरजेचे असते. हा अत्यंत पवित्र, समाजाचे कल्याण करणारा, सहसंवेदना जागवणारा, सुख-शांती-समाधानाचा संदेश देणारा, वाईट कर्मांपासून दूर ठेवणारा दानधर्माचे महत्त्व अधोरेखित करणारा रमझानचा महिना आणि ईद-उल-फित्रचा सण मुस्लीम धर्माचे पालन करणार्‍या प्रत्येकासाठी मानवतेची अनोखी शिकवणच आहे. म्हणूनच रमजान म्हणजे काय ?. प्रत्येक माणसाला माहिती असणे आवश्यक आहे.


आपला धर्म चांगला व इतरांचा वाईट ही भावना कोणत्याही माणसात असता काम नये. भारतात सर्व धर्माचा आदर केला जातो म्हणून तो जगात सर्वधर्मसमभाव मानणारा देश म्हणून ओळखल्या जातो.सहा हजार सहाशे जातीत पोटजातीत धर्मात विभागलेला हा माणूस म्हणून भारतात गुण्यागोविंदाने राहतो, जगतो काही अपवादत्मक लोक समाजाच्या शांतीला सुरुंग लावुन आग लावण्याचे काम करतात. पण ते त्यात काही प्रमाणात यशस्वी होतात पण ते जास्त दिवस टिकत नाही.म्हणूनच आपल्या आजूबाजूला कोणत्या धर्माचा माणूस राहतो तो त्या धर्माच्या शिकवणी नुसार वागतो का?. जो धर्माच्या शिकवणी नुसार वागत नसेल तर तो सर्वाना मानसिक शारीरिक त्रास देण्यासाठी त्रासदायक काम करून आपले उपद्रवमूल्य दाखवुन सार्वजनिक वातावरण दूषित करीत राहील.त्या एका व्यक्तीमुळे सर्व समाज बदनाम होतो.असा व्यक्ती पासून सावध राहावे ही काळजी आजच्या काळात सर्व समाजाने घेतली पाहिजे.दक्षता घेतली तर कोरोना माणसावर मात करणार नाही,म्हणूनच कोरोनावर मात करेल रमजान?.रमजानचा महिना आणि ईद-उल-फित्राच्या सणाला सर्व समाजाला वाचकांना माझ्या व माझ्या ambedkaree.com ला हार्दिक शुभेच्छा !!!.

सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई,

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

राज्यसभा टीवी द्वारा संविधान पर 1 से 10 एपिसोड

बुध एप्रिल 29 , 2020
Tweet it Pin it Email राज्यसभा टीवी द्वारा संविधान पर 1 से 10 एपिसोड ******************************** Dr. Y. P. S. NIRALA: Pin it Email https://www.ambedkaree.com/ramajanfightwithcovind19/#RkJfSU1HXzE1NzQ भारत सरकार की राज्यसभा टीवी द्वारा संविधान पर 1 से 10 एपिसोड बनाया गया है। इसमे संविधान कैसे बना है संविधान सभा की कार्यवाही को फिल्माया […]

YOU MAY LIKE ..