आंबेडकरी वारस्याला कलंकित करण्यासाठीच डॉ. आनंद तेलतुंबडे हे हिंदूत्ववाद्यांचे सॉफ्ट टार्गेट… = प्रकाश आंबेडकर

आंबेडकरी वारस्याला कलंकित करण्यासाठीच डॉ. आनंद तेलतुंबडे हे हिंदूत्ववाद्यांचे सॉफ्ट टार्गेट…
= प्रकाश आंबेडकर
==========================


आम्ही, बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील लोक, डॉ. आनंद तेलतुंबडे, जे १९८३ पासून आमच्या परिवाराचे सदस्य आहेत, त्यांना दिल्या जाणाऱ्या त्रासाने चिंतीत आहोत. जेव्हा ऑगस्ट २०१८ मध्ये पुणे पोलिसांनी आता कुप्रसिद्ध झालेल्या एल्गार परिषद प्रकरणासंबंधात त्यांच्यावरती आरोप लावले, तेव्हा आम्ही निराश झालो असलो तरी आम्हाला शाश्वती होती की, एक तर पुणे पोलिसांना त्यांची चूक लक्षात येईल किंवा कोर्टात हे प्रकरण पोहोचल्यावर कोर्टच हा खटला फेटाळून लावेल. मागील दोन वर्ष आम्ही या समजुतीमध्ये काढली. मात्र काही दिवसांपूर्वी जेव्हा उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली व ज्या जलदगतीने केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास संस्था NIA कडे वळवला, त्यावरून स्पष्ट होत आहे की, सत्ताधाऱ्यांची अशी इच्छा आहे की, त्यांच्या आयुष्यातील काही वर्ष विनाकारण तुरुंगवासात विफल खर्ची व्हावीत. आम्ही आता या आशेवर जगत आहोत, की ४ आठवड्यांच्या मिळालेल्या मुदतीदरम्यान सुप्रीम कोर्टात जेव्हा त्यांची याचिका मांडली जाईल, तेव्हा त्यांना न्याय मिळेल.

आम्ही स्पष्ट करू इच्छितो की डॉ. आनंद तेलतुंबडे हे आंबेडकर परिवाराचे सदस्य आहेत व कदाचित त्यामुळेच सत्तेतील भारतीय जनता पक्षाचे सरकार त्यांना परिवारातील सर्वात सौम्य घटक समजून परिवारावर निशाणा साधू पाहत आहेत. आम्ही हेदेखील स्पष्ट करू इच्छितो की, त्यांचे विचार सकृतदर्शनी पारंपरिक पद्धतीने आंबेडकरी वाटत नसली तरी ते हाडाचे आंबेडकरवादी आहेत व त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या अन्वयार्थसाठी जीवित असलेल्या कोणत्याही व्यक्तींपेक्षा जास्त योगदान दिले आहे.

आज सर्वानाच माहित असल्याप्रमाणे, डॉ. तेलतुंबडे यांनी एका श्रमिक परिवाराच्या हलाखीच्या परिस्थितून पुढे येत आपल्या क्षमतेच्या जोरावर VNIT, IIM इ. सारख्या संस्थांमध्ये विद्वत्ता गाजवून नाव कमावलं आहे व सायबरनेटिक्स सारख्या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. आज ते या देशात जगात प्राविण्य मिळालेल्या काही नावांमध्ये गणले जातात.

तसेच त्यांचे ४ दशकांचे कॉर्पोरेट करियरदेखील त्यांच्या कामाचा पुरावा म्हणून उपलब्ध आहे. त्यांनी यादरम्यान भारत पेट्रोलियम कंपनीचे कार्यकारी संचालक व पेट्रोनेट इंडिया लिमिटेड मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर व मुख्य कार्यकारी अधीकारी अशी सर्वोच्च पदे भूषवली आहेत. त्यांना त्यांच्या व्यावसायिक कालखंडात अनेक उच्च पदे भूषवली आहेत व त्यांना त्यांच्या कामामधील प्रावीण्यासाठी अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत.

एक संवेदनशील व्यक्ती म्हणून त्यांनी शोषितांच्या हक्कासाठी अनेकदा संघर्ष केला आहे व नुकसान सोसले आहे. या देशातलील नागरी हक्कांसाठी ते कायम आघाडीवर राहिलेले आहेत. ते महाराष्ट्रस्थित CPDR अर्थात Centre for Protection of Democratic Rights सारख्या संस्थेचे सभासद म्हणून व २०१६ मध्ये या संस्थेचे महासचिव म्हणूनही त्यांनी जवाबदारी बजावली आहे. यादरम्यान त्यांनी अनेकविध लेख लिहिले, पुस्तके लिहिली , ज्यांचे अनुवाद अनेक भाषांमध्ये झाले आहेत. गेली किमान दोन दशके त्यांची ओळख देशातील आघाडीचे “पब्लिक थिंकर” लोकविचारक म्हणून व जगभर नावाजलेले अभ्यासक म्हणून झाली आहे. अनेक विदयापीठांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना मानद पदव्या देऊ केल्या आहेत.

त्यांच्या कॉर्पोरेट अनुभवानंतर त्यांना IIT खरगपूर सारख्या अग्रणी संस्थेत व्यवस्थापन विषय शिकवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. ते अनेक वर्ष त्यांनी जिथून शिक्षण घेतलं त्या IIM अहमदाबाद येथे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून घालवली. त्या नंतर गोव्यातील Goa institute of management या विख्यात संस्थेत त्यांनी देशातील पहिल्याच बिग डेटा विश्लेषणविषयक कोर्सचे संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी senior professor म्हणून आमंत्रित केले. त्यांनी 2018 मध्ये या संस्थेत देशातील पहिला “बिग डाटा अनालीटिक्सचा” कोर्स सुरू केला व त्याचे संचालन केले आहे. त्यांच्या या योगदाना बद्दल त्यांना देश विदेशातील अनेक पुरस्कारांनी गौरणवीत करण्यात आले आहे.

अशा व्यक्तीला खोट्या एल्गार परिषद प्रकरणात गोवण्यात आले आहे, ज्या परिषदेला ते उपस्थितदेखील नव्हते. जेव्हा त्यांना पोलिसांनी बेकायदेशीररीत्या अटक केली तेव्हा जगभरातुन त्याचा निषेध झाला. एल्गार परिषदेच्या तपासयंत्रणेनेच स्वतःचे हसू केले आहे. या खटल्याचा आधार असे संगणक आहेत ज्यांच्या माहितीवरील विशिष्ट कोडिंग नसल्याने त्याच्याशी पोलिसांकडून छेडछाड होऊ शकते यावरूनच पोलिसांचे दावे सुरुवातीलाच खोडले गेले पाहिजे होते. आमची अपेक्षा आहे की , याची खटल्याच्या सुनावणीदरम्यान चौकशी होईल व UAPA सारख्या कायद्याच्या गैरवापराचीदेखील चौकशी होईल, त्याअंतर्गत निर्दोष व्यक्तींनाही अकारण अनेक वर्ष तुरुंगवास भोगावा लागतो. हेदेखील लक्षात घ्यायला हवे की या खटल्यातील इतर आरोपींप्रमाणे त्यांच्याकडून काहीच आक्षेपार्ह सापडलेले नसून त्यांची आधीच उच्च न्यायालयाच्या आदेशावरून दोन दिवसांची कठोर चौकशी आधीच झालेली आहे. मात्र या खटल्याला अनैतिक उद्दिष्टांचा दर्प आहे.

त्यांना इतरांप्रमाणे अटक झाल्यास आम्हाला त्यांची जीवितहानी, परिवाराला होणारा त्रास याबाबत भीती व चिंता वाटत आहे. आम्ही सर्व आंबेडकरी जनतेला आव्हान करतो की, त्यांनी बाबासाहेबांच्या परिवारावराच्या या हल्ल्याला व डॉ.बाबासाहेबाच्या वारस्याला कलंकित करणाऱ्या या हिंदुत्ववादी यंत्रणेचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी संपूर्ण देशभर आवाज उठवावा, असे आम्ही आव्हान करतो !!

प्रकाश यशवंतराव आंबेडकर
भीमराव यशवंतराव आंबेडकर
आनंदराज यशवंतराव आंबेडकर
रमा आनंद तेलतुंबडे

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

एबीपी माझा:चूक कबूल न करण्याचा अर्थ काय होतो ?

शनी एप्रिल 18 , 2020
Tweet it Pin it Email एबीपी माझा:चूक कबूल न करण्याचा अर्थ काय होतो? ******************* ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ‘काँग्रेस का हाथ, पाकिस्तान के साथ’ अशा विखारी बातम्या देणारी गोदी मीडियाची सुपारीबाज पत्रकारिता वृत्तवाहिन्यांच्या प्रेक्षकांना आता सरावाची झाली आहे। त्यात नवल असे काही नाही। पण एबीपी माझा या वृत्तवाहिनीने ‘पर […]

YOU MAY LIKE ..