करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन बालकांना वाचविण्यासाठी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचा पुढाकार

अकोला – राज्यात कोरोनामुळे बालक व युवकांना कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्यासाठी आज महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. भविष्यात परिस्थिती खूप वाईट होऊन यामुळे प्रत्येकाच्या आयुष्य वेदना दाई असू शकते, अशी शक्यता सर्वांनीच वर्तविली आहे.

येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 18 वर्षाखालील बालकांमध्ये विषाणूंचे संक्रमण मोठ्या प्रमाणात असू शकते असे सुद्धा सांगण्यात येत आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत 45 च्या वरील वृद्ध रुग्णाची मृतक संख्या सर्वांच्या डोळ्याला टोचणारी होती. परंतु करोनाच्या तिसऱ्या लाटेत मात्र, 18 वर्षाखाली बालकं आणि युवा सर्वात जास्त संक्रमित होणार आहेत असे वर्तविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने त्यांना जर योग्य उपचारात मिळाले नाहीत तर प्रत्येकाच्या परिवाराला मोठ्या जीवित हानीचा सामना करावा लागणार आहे.

या तिसऱ्या लाटेची येणारी परिस्थिती बघता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेउन अकोला जिल्ह्यातील नामवंत बालरोग तज्ञ आणि लेबेन लॅबोरेटरीचे संचालक यांच्याशी चर्चा करून प्रत्येकाला या तिसऱ्या लाटेपासुन कसे वाचविता येईल यावर चर्चा केली. या चर्चेत 18 वर्षा खालील बालकांच्या व युवांच्या उपचाराची एक निश्चित दिशा असावी आणि या तिसऱ्या लाटेच्या परिस्थितीत उपचारात आलेली 0 ते २ वर्षाच्या खालील बालकांच्या स्तनपान उपयोजना कशा प्रकारे असेल तसेच संक्रमित बालकांपासून असंक्रमित मातेची सुरक्षा उपयोजना, संक्रमित झालेल्या युवकांना व बालकांना बेड ,ऑक्सिजन , व्हेंटिलेटर , आणि अन्य उपचारात लागणारी व्यवस्था कमी पडणार नाही,
तसेच उपचारात येणाऱ्या औषधीचा गैर परिणाम रोखणे या व विविध विषयांवर जिल्ह्यातील नामवंत बाल रोग तज्ञांशी बाळासाहेब आंबेडकर यांनी चर्चा केली.

या वेळी उपस्थित बालरोग तज्ज्ञांनी अतीशय महत्वाच्या उपाययोजना सुचविल्या ज्या ऍड बाळासाहेब आंबेडकर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना अवगत करतील. यावेळी उपस्थित बाल रोग तज्ज्ञांनी नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करतील असे आश्वाशीत केले .

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, डॉ एन के माहेश्वरी, डॉ अविनाश तेलगोटॆ, डॉ हर्षवर्धन मालोकार, डॉ धर्मेंद्र राऊत, डॉ पार्थसारथी शुक्ल, डॉ पराग डोईफोडे, डॉ विनित वरठे, डॉ मनोज ठोकळ अध्यक्ष आयएपी, डॉ शिरिष देशमुख, डॉ विजय आहुजा, डॉ नितिन गायकवाड, डॉ राहुल कावळे, डॉ चौधरि, डॉ अभिजीत अडगावकर, डॉ विजय चव्हाण, डॉ सुरज ईप्पर , डॉ ऱितेश श्रीवास्तव, डॉ देशमुख, डॉ मोहसिन खान, डॉ जुबेर अहमद, डॉ अजय सुरवाळे, डॉ आसिफ, डॉ पाडिवाल, तसेच अकोल्यातील औषधी निर्माण करणारी लेबीन कंपनीचे संचालक हरीश भाई शहा यांच्या शी उपचारात लागणाऱ्या औषधी दर्जा आणि पुरवठा प्रमाण या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी रुग्णकल्याण समिती सदस्य पराग गवई, प्रदिपभाउ वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, डॉ प्रसन्नजित गवई, सभापती पंजाबराव वढाळ, सभापती अकाश शिरसाठ ऍड आशिष देशमुख, पांडे गुरुजी, मनोहर पंजवानी, संकेत शिरसाट उपस्थित होते.

-प्रकाश इंगळे

प्रकाश इंगळे यांच्या fb वॉल वरून सभार

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

आरक्षण लाभार्थींनी शासन कर्ती जमात बनावे !

शनी मे 22 , 2021
Tweet it Pin it Email 7 मे 2021 शासनाने काढलेल्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधातील आदेश GR चा विरोध सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी वर्गांच्या संघ,संघटना,असोशियशन,फेडरेशन यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तहसीलदार,जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांना लॉक डाऊन जमाव बंदीचे आदेशाचे काटेकोरपणे पालन करून निवेदन दिले,जे कर्मचारी व ज्या कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि जे कर्मचारी व […]

YOU MAY LIKE ..