बहिष्कृत समाज प्रसार माध्यमातही बहिष्कृत

बहिष्कृत समाज प्रसार माध्यमातही बहिष्कृत एक विशिष्ट समाजाची प्रसार माध्यमावर मत्तेदारी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1938 ला म्हणाले होते शूद्रांकडे कुठलेही प्रसार माध्यम नाही, “Untouchables have no press”. स्वातंत्र्याला 70 वर्षाहून अधिक काळ उलटून गेला आहे, परंतु प्रसार माध्यमांत बहिष्कृत जातींच्या प्रतिनिधित्वात फार काही समाधानकारक परिस्थिती असल्याचे दिसून येत नाही.

2 ऑगस्ट 2019 रोजी प्रकाशित झालेल्या Oxfam India या प्रतिष्ठित संस्थेचा एक शोध अहवाल Who tells our stories matters या शीर्षकाखाली प्रसिध्द झाला होता. या रिपोर्ट मध्ये भारतीय न्यूज रूम मध्ये उपेक्षित जातींच्या प्रतिनिधीत्वावर सखोल चिकित्सा केलेली आहे. या अहवालाच्या अगदी सुरुवातीला सुदीप्तो मंडल म्हणतात “दहा वर्षांहून अधिक काळ देशभर शोध घेतल्यानंतरही मला इंग्रजी माध्यमात काम करणारे फक्त आठ दलित पत्रकार सापडले आहेत. त्यापैकी केवळ दोघांनीच आपल्या सामाजिक जीवनात आपण दलित असल्याचे कबुल करण्याचा धोका पत्करला आहे.” प्रसार माध्यमं हे आधुनिक काळातील शक्तीस्थान मानता येईल. यातून विचारांना वळण देता येतं, नवीन विचार समाजापुढे आणता येतो. एखाद्या समाजाची प्रगती, अधोगती, त्यावर होणार अन्याय प्रसार माध्यमातून देशापुढे मांडला जात असतो. मग त्यातून उद्भवलेल्या प्रश्नांवर शासन व इथला बुद्धिजीवी वर्ग उत्तरं शोधायला लागतात. करिता इतर शासकीय अशासकीय संस्थांप्रमाणे प्रसार माध्यमांमध्ये ही सर्व समाज घटकांचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे.

एखादा देश जर सर्वांगाने प्रगतीच्या वाटेवर जाण्यास इच्छुक असेल तर त्या देशाला त्या मधील विविध समाज घटकांची प्रगती लक्षात घ्यावी लागेल. एक विशेष समाज घटकाची प्रगती म्हणजे सर्व देशाची प्रगती होऊ शकत नाही.
प्रसार माध्यमात सर्व समाज घटकांचा अंतर्भाव आहे का? बहिष्कृत जातींना योग्य ते प्रतिनिधित्व आहे का? tv आणि वर्तमानपत्रा बहिष्कृत जातीचं काय प्रतिनिधित्व आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला oxfam च्या अहवालात सापडतील. यामधील निदर्शनास आलेले ठळक निष्कर्ष खलील प्रमाणे आहेत.


1. संशोधकांनी केलेल्या 121 न्युज रूम च्या अभ्यासानंतर ज्यामध्ये TV न्युज चॅनल्स, मासिके (मॅगझीन), न्युज ववेबसाइट्स चा समावेश आहे. असे आढळून आले की या 121 पैकी 106 न्युज रूम च्या नेतृत्व पदी म्हणजेच मुख्य संपादक, व्यवस्थापकीय संपादक (managing editor), कार्यकारी संपादक, ब्युरो प्रमुख, इनपुट/आउटपुट संपादक हे उच्च वर्णीय जातीचे आहेत. यामध्ये प्रमुख पदी कुणीही अनुसूचित जाती/जमातीचा नाही.

2. TV वर होणाऱ्या प्रमुख वादविवाद (debate) प्रोग्रॅम मधील 4 पैकी 3 अँकर (मध्यस्थ) हे उच्च वर्णीय आहेत, यामध्ये कुणीही दलित, अदिवासी अथवा OBC नाहीत.

3. TV वर प्रसारित होणाऱ्या वादविवाद कार्यक्रमांमध्ये आमंत्रित पॅनेलिस्ट (विषयतज्ञ) मध्ये 70% विषयतज्ञ हे उच्च वर्णीय असतात.

4.इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या एकूण लेख/निबंधां पैकी फक्त 5% लेख हे दलित, आदिवासी लिखित असतात. हिंदी वर्तमानपत्रांमध्ये हे प्रमाण 10% इतकं आहे.

5. हिंदी व इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जाती संबंधी विषयांवर लिखाण करणाऱ्यांपैकी निम्मे (50%) हे उच्च वर्णीय आहेत.

6. वर्तमानपत्रांमध्ये लेखकाच्या नावासह छापल्या जाणाऱ्या (bylined articles) लेखांपैकी 72% हे उच्च वर्णीय लिखित आहेत.

7. संशोधकांच्या विचाराधीन असलेल्या 12 मासिका (मॅगझीन) मध्ये 972 पैकी फक्त 10 लेख जे जाती विषयाशी निगडित लिखित आहेत, हे त्या मासिकाच्या मुख पृष्ठांवर जागा मिळवू शकले.


(प्रशांत भवरे, 11 जानेवारी 2020)
(वाचा, विचार करा, share करा)

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

ऐका सत्य नारायणाची(आगळी) कथा sss

मंगळ जानेवारी 21 , 2020
Tweet it Pin it Email ऐका सत्य नारायणाची(आगळी) कथा sss ********************** ◆ दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@gmail.com Pin it Email https://www.ambedkaree.com/bahishkrutsamaj/#SU1HXzIwMjAwMTI डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर 1935 मध्ये येवला येथे धर्म परिवर्तनाची ऐतिहासिक घोषणा केली होती। अन समतानंद अनंत हरी गद्रे यांना जणू विजेचा शॉकच बसला होता। आपला हिंदू धर्म खरोखर […]

YOU MAY LIKE ..