पन्हाळेकाजी येथे २९ लेण्यांचा प्राचीन समूह शतकानुशतकं आपले गतवैभव सांभाळत उभा आहे

कोटजाई व धाकटी नद्यांच्या संगमावर दापोलीतील पन्हाळेकाजी येथे २९ लेण्यांचा प्राचीन समूह शतकानुशतकं आपले गतवैभव सांभाळत उभा आहे. दापोली तालुक्यात डोंगराळ भागांतून २० कि.मी. प्रवास केल्यावर दापोली– दाभोळ रस्त्यावर नानटे गावाजवळ पन्हाळेकाजी या लेण्यांचा अप्रतिम आविष्कार पाहायला मिळतो. हा लेणी समूह खोदण्याची सुरुवात दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात झाली असून ती पुढे अनेक शतकं चालू असावी असे मानले जाते.

पन्हाळेकाजी ही प्राचीन लेणी १९७० साली दाभोळचे इतिहासप्रेमी श्री. अण्णा शिरगांवकर यांच्यामुळे प्रकाशझोतात आली. पन्हाळेकाजी गावांत त्यांना १२ व्या शतकातील ताम्रपट सापडला ज्याच्या अनुषंगाने हे ठिकाण शोधण्यात आले. आता हे ठिकाण पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असून एकूण २९ गुंफा असलेली ही लेणी व त्यातील अप्रतिम शिल्पकलेचा नमुना पाहाण्यासाठी हातात भरपूर अवधी हवा.

येथील नोंद घेण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे हीनयान बौध्द पंथ, वज्रयान पंथ आणि नाथ पंथ अशा विविध पंथांतील शिल्पांबरोबरच गणपती, लक्ष्मी, शिव, सरस्वती आदी देवतांच्या मूर्तीही इथे आढळतात. गेल्या हजार वर्षांचा आपला गौरवशाली इतिहास जपणारी पन्हाळेकाजी लेणी हे अतिशय शांत व रमणीय ठिकाण पर्यटकांना एका वेगळ्याच विश्वाची अनुभूती देऊन जातं

माहिती – रत्नागिरी टुरिझम

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

कल्याण पूर्वेतील "द शिल्ड" या स्वयंसेवी संस्थेने राबवला अनोखा उपक्रम....!

मंगळ जून 18 , 2019
Tweet it Pin it Email Free education होय ……! कल्याण पूर्वेतील शिल्ड या स्वयंसेवी संस्थेने राबवला अनोखा उपक्रम….! जून महिन्यात वर्षी १७ जून ला शाळा सुरू झाल्या या पहिला दिवशी,जानेवारी पासुन कल्याण डोंबिवली मधील वस्त्यान मध्ये गोर गरीब मुल ज्यांचं पैसे नसल्या मुळे शिक्षण थांबलं होतं त्या सर्व ३० मुलं […]

YOU MAY LIKE ..